CAA Protest: शर्टवरून बँडेज बांधलेल्या या आंदोलनर्त्यांच्या फोटो मागचे सत्य काय?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) सुरू असलेल्या आंदोलनांनी देश ढवळून निघालेला आहे. आंदोलकांनी अनेक नव्या आणि लक्षवेधक पद्धतीने आपला विरोध व्यक्त केला आहे. अशाच एक प्रदर्शनातील फोटो सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहेत. यामध्ये आंदोलनकर्ते एका डोळ्याला पट्टी आणि हाताला बँडेज बांधलेले दिसतात. सोशल मीडियामधील अनेक युजर्सने आंदोलनकर्त्यांनी एका हिजाबवरून डोळ्याला पट्टी आणि शर्टवर बँडेज बांधल्याकडे निर्देश करीत प्रदर्शनकर्त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

हे फोटो नेमके कशाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्ज केले. तेव्हा कळाले की, हे फोटो दिल्लीमध्ये 29 डिसेंबर रोजी केलेल्या आंदोलनाचे आहेत. ओरिसा पोस्टच्या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा डोळा निकामी झाला. या अमानुष मारहाणीचा विरोध म्हणून जामियातील विद्यार्थ्यांनी डोळा आणि हाताला पट्टी बांधुन असे अनोखे आंदोलन केले होते. 

पत्रकार झहिर अब्बास यांनी या आंदोलनातील अनेक फोटो आणि व्हडियो शेयर केले होते. सदरील पोस्टमधील फोटोदेखील त्यांनी ट्विट केल्याचे आढळले. ते तुम्ही खाली पाहू शकता. 

या आंदोलनाविषयी अधिक माहिती घेतली असता एनडीटीव्ही वेबसाईटवर एक बातमी आढळली. यानुसार, 15 डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामध्ये मोहम्मद मिन्हाजुद्दिन नामक विद्यार्थ्याच्या एका डोळ्याला मार लागला व त्याला दृष्टी गमवावी लागली. पोलिस मारहाणीचा विरोध करण्यासाठी जामियाचे विद्यार्थी, सामान्य नागरिक, महिला, लहान मुलांनी डोळा आणि हातावर प्रतिकात्मक पट्टी बांधली होती. हा फोटो त्यातील आहे. या विद्यार्थ्यांनी मारहण झाल्याचा बनाव केला नव्हता.

मूळ फोटो येथे – द टेलिग्राफ

निष्कर्ष

दिल्ली पोलिसांच्या मारहाणीमध्ये जामिया विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने डोळा गमवल्यानंतर लोकांनी डोळा व हाताला पट्टी बांधून असे प्रतिकात्मक आंदोलन केले होते. हे त्यातील फोटो आहेत. या फोटोंना आंदलोकांनी केलेला बनाव म्हणून दाखवण्यात येत आहे.

Avatar

Title:CAA Protest: शर्टवरून बँडेज बांधलेल्या या आंदोलनर्त्यांच्या फोटो मागचे सत्य काय?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •