Fact check : आइसलॅंडमधील मुलीशी लग्न केल्यास महिन्याला 3 लाख रुपये मिळतात का?

False आंतरराष्ट्रीय राजकीय

गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा या फेसबुकवरील ग्रुपवरुन सध्या बॅग भरा आणि चला आइसलॅंडला कायमचे येथील मुलीशी लग्न करा, 3 लाख महिना मिळवा अशी माहिती व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

आइसलॅंड सरकारने एक योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत या देशातील मुलीशी लग्न केल्यास तेथील सरकार तुम्हाला दर महिन्यात 3 लाख रुपये पगार म्हणून देणार आहे. तसेच त्या देशाचे नागरिकत्व मोफत देण्यात येईल असे या पोस्टमध्ये पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आम्ही आइसलॅंड सरकारच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी अशी कोणतीही योजना दिसून आली नाही.

अक्राईव्ह

आइसलॅंड मॉनिटर या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त देताना सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. आइसलॅंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत केलेला खुलासाही या वृत्तात देण्यात आला आहे.

अक्राईव्ह

आइसलॅंड मॉनिटरने 2016 मध्येही याबाबतचे वृत्त दिल्याचे दिसून येते. मराठी भाषेत ही खोटी माहिती 2018 पासून व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. साम या मराठी वृत्तवाहिनीनेही ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे यांनी एखाद्या देशाला बदनाम करण्याचाच या प्रयत्न असल्याचे आणि ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष

आइसलॅंडमधील मुलीशी लग्न केल्यास महिन्याला 3 लाख रुपये मिळतात ही पोस्ट असत्य असल्याचे आइसलॅंड सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतही आइसलॅंड सरकारची अशी कोणतीही योजना असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

Avatar

Title:Fact check : आइसलॅंडमधील मुलीशी लग्न केल्यास महिन्याला 3 लाख रुपये मिळतात का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False