मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा हा फोटो नाही. वाचा कोण आहे हा RSS कार्यकर्ता

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कर्नाटकातील मंगळुरू विमानतळावर सोमवारी (दि. 20) एक बेवारस बॅग आढळूली होती. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ सापडला. या प्रकरणी बुधवारी (दि. 22) आदित्य राव नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

दरम्यान, सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तोच मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणारा आदित्य राव आहे. फेसबुकवर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

संघाच्या गणवेशातील दोन व्यक्तींचा फोटो शेयर करून त्यातील एकाकडे निर्देशित करून म्हटलेय की, हा देशभक्त पाहिलाय ना…? याचं नाव आहे आदित्य राव…! मंगलोर विमानतळावर बाँब ठेवल्याच्या आरोपात पोलिसांनी याला अटक केलीय. यापूर्वीही याला बंगलोर विमानतळावर बाँब ठेवताना पकडलाय…!

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

मंगळुरू विमानतळावरील बॉम्बप्रकरणी आता अटकेत असलेल्या आदित्य रावचा फोटो मीडिया वेबसाईटवर उपलब्ध आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत तुम्ही तो पाहू शकता. हा फोटो शेयर होत असलेल्या संघाच्या कार्यकर्त्याच्या फोटोंमध्ये साम्य नाही. पीटीआयनुसार, आदित्यला बंगळुरू विमानतळावर नोकरी न मिळाल्याचा राग मनात थरून त्याने हा बॉम्ब विमानतळावर ठेवला होता. आदित्य मणिपाल (दक्षिण कर्नाटक) येथील रहिवासी असून, तो अभियांत्रिकी आणि एमबीए पदवीधर आहे. यापूर्वी त्याला बंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या खोटा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियास्क्रोल

मग व्हायरल फोटोतील संघाचा कार्यकर्ता कोण आहे?

सदरील फोटोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, फोटोतील ज्येष्ठ व्यक्ती (डाव्या बाजूचा) कर्नाटकमधील लोकप्रिय संघ पदाधिकारी कल्लाडका प्रभाकर भट्ट आहे. परंतु, दुसरा व्यक्ती कोण याची माहिती मिळाली नाही.

ती जाणून घेण्यासाठी मग मंगळुरू पोलीस अधीक्षक कार्यालयाशी ‘फॅक्ट क्रेसेंडो’ने संपर्क साधला. तेव्हा पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटोतील संघाचा कार्यकर्त्या संशयित आदित्य राव नाही. त्या फोटोतील व्यक्तीचे नाव संदीप लोबो आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो संशयित म्हणून फिरवला जात आहे. याविरोधात त्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोलिसांकडे रीतसर तक्रारदेखील दिल्याचे पोलिसांनी कळविले.

यानुसार अधिक शोध घेतल्यावर निखारा न्यूज वेबसाईटवरील एक बातमी आढळली. यानुसार, पुत्तुर येथील संदीप लोबो नावाच्या व्यक्तीने त्याच्याविरोधात अफवा पसरविणाऱ्यांविरोधात बुधवारी तक्रार दिली. 

संदीप लोबो नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट सापडले. यामध्ये त्याने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती दिली आहे. कन्नड भाषेतील पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “माझा फोटो शेयर करून माझे नाव मंगळुरू विमानतळ बॉम्ब प्रकरणी जोडण्यात येत आहे. याविरोधात मी पुत्तुर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. माझ्या नावे चुकीचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मी मागणी केली आहे.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

लोबो यांनी प्रभाकर भट्ट यांच्यासोबतचा आसएसएस शिबीरातील एक फोटोतील शेयर केला होता. लोबो हे पुत्तुर येथील रहिवासी असून, भाजपशी निगडित आहेत.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

बूमलाईव्हने या आधी याचे फॅक्ट-चेक केले आहे.

सशंयित आदित्या राव आणि संदीप राव यांच्या फोटोंची तुलना खाली पाहू शकता.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोतील RSS कार्यकर्ता मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेतील संशयित आदित्य राव नाही. त्याचे नाव संदीप लोबो असून, तो कर्नाटक भाजपशी निगडित आहे. त्याच्या फोटोविषयी चुकीचा दावा करणाऱ्यांविरोधात त्याने पोलिसांकडे तक्रारदेखील दिली आहे. त्यामुळे पोस्टमधील दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा हा फोटो नाही. वाचा कोण आहे हा RSS कार्यकर्ता

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •