Altered Video: चित्रपटामधील संभाषण शरद पवारांच्या दिल्ली बैठकीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल

Altered राजकीय

सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये कटकारस्थान करत आहेत, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पवारांसह विरोधीपक्षांतील काही नेते मंडळी दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोलतो की, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला सत्ता धारी पक्षावरुन जनतेचा विश्वास हटवला पाहिजे आणि त्यासाठी जनतेत भिती निर्मण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवून आणावे लागतील, जेने करून जनता आपल्याला निवडून देतील, परंतु, यासाठी पाण्यासारखा पैसा लागेल म्हणून या करीत ही बैठक बोलवण्यात आली आहे.”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “पहा विरोधी पक्षाची नेते मंडळी शरद पवाराच्या दिल्ली येथील घरी मोदीच्या विरोधात कीती खालच्या पातळीवर गेलेली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओमधील एएनआयने शेअर केल्याचे दिसून येते. 

कॅप्शनच्या आधारे सर्च केल्यावर कळाले की, एएलआयने हा व्हिडिओ 22 जून 2021 रोजी अपलोड केला होता. परंतु, या व्हिडिओमध्ये कोणाचा आवाज ऐकू येत नाही. 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीच्या निवासस्थानी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि इतर मान्यवरांची बैठक.”

सदरील महितीच्या आधारे अधिक शोध घेतल्यावर लोकसत्ताची बातमी आढळली की, 6 ऑक्टोबर 2023 रोजी देशात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. तत्पुर्वी भाजपने उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जगदीश धनखड (सध्याचे उपराष्ट्रपती) यांची निवड केल्याचे जाहिर केले होती.

या पार्श्वभूमीवर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश, डी. राजा, टी. आर. बालू, रामगोपाल यादव, सीताराम येच्युरी इत्यादी नेत्यांची बैठक झाली. 

या बैठकीत उपराष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या नावाची निश्चिती करून त्याची घोषणा करण्यात येईल अशी चर्चा झाली होती.

शरद पवारांनी बैठकीनंतर ट्विट केलेल की, “ईव्हीएमद्वारे मतदान करण्याबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या चिंतेवर चर्चा करण्यासाठी आज माझ्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.”

तसेच व्हायरल व्हिडिओमधील आवाज 1984 सालच्या इंकलाब चित्रपटामधील कादर खान संभाषणाचा आहे. तो व्हिडिओ आपण येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, एएनआयने असा कोणताही व्हिडिओ शेअर केला नाही. हा व्हिडिओ बनावट असून हा आवाज चित्रपटामधील संभाषणाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:Altered Video: चित्रपटामधील संभाषण शरद पवारांच्या दिल्ली बैठकीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Altered