नैराश्य आल्यामुळे संदीप माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

प्रेरणादायी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले संदीप माहेश्वरी यांच्याविषयी एक बातमी व्हायरल होत आहे. लोकांना प्रेरणा देणाऱ्या माहेश्वरी यांनाच नैराश्याने ग्रासले आणि त्यांच्यावर ईलाज सुरू असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, ही अफवा आहे. 

काय आहे दावा?

एका वृत्तस्थळाच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर केला जात आहे. यामध्ये म्हटले की, ‘प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी झाले नैराश्यग्रस्त, बंगळूरूमध्ये सुरू आहेत उपचार’. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल होत असलेल्या ट्विटच्या स्क्रीनशाटचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, अकाउंटचे नाव ‘दैनिक खास्कर’ (Dainik Khaskar) आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राच्या लोगोशी आणि नावाशी साधर्म्य असलेले आहे बनावट ट्विटर अकाउंट आहे.

‘दैनिक खास्कर’च्या ट्विटर अकाउंटला भेट दिली असता आता ते डिलीट करण्यात आल्याचे आढळले.

कोणत्याही विश्वसनीय मीडिया वेबसाईटने संदीप माहेश्वरी यांच्या कथित नैराश्यासंबंधी बातमी दिलेली नाही.

मग आम्ही संदीप माहेश्वरी यांच्या युट्यूब चॅनेलला भेट दिली. तेथे त्यांनी या व्हायरल दाव्याचे खंडन करणारा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 

त्यात त्यांनी व्हायरल अफवा आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची मस्करी करीत खुलासा केली की, त्यांच्याबाबत अशा खोट्या वावड्या यापूर्वीसुद्धा उठल्या होत्या. परंतु, लोकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची पडताळणी करूनच त्यावर विश्वास ठेवावा.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, प्रेरक भाषण देणाऱ्या संदीप माहेश्वरी यांच्याविषयी चुकीची माहिती पसरविली जात आहे. ‘दैनिक खास्कर’ नामक व्यंगात्मक अकाउंटने अफवा पसरविली की, त्यांच्यावर नैराश्यामुळे उपचार सुरू आहेत.

Avatar

Title:नैराश्य आल्यामुळे संदीप माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •