इराणने रोनाल्डोला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

False राजकीय | Political

अर्धांगवायू असलेल्या एका इराणी महिलेने जेव्हा पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो रेखाटलेले चित्र रोनाल्डोला भेट दिले त्यावेळी त्यांने या महिलेचे कौतूक करताना मिठी मारली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, रोनाल्डोने या अविवाहीत महिलेला मिठी मारल्यामुळे इराणमध्ये त्याला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की,“इराणने हमीदा या महिलेने (जी 85% अर्धांगवायू आहे आणि ती तिच्या पायांनी चित्र रेखाटते तसेच रोनाल्डोची चाहती आहे) रोनाल्डोचे चित्र काढले आणि ते चित्र तिने रोनाल्डोला भेट दिले त्यावेळी त्याने मिठी मारली. जेव्हा रोनाल्डो पुन्हा इराणला जाइल तेव्हा त्याला 99 फटके मारण्याची शिक्षा दिली जाणार आहे.”  

 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंडियन एक्स्प्रेसने 21 सप्टेंबर रोजी प्रसारीत केलेल्या वृत्तानुसार 19 सप्टेंबर रोजी अल नासर आणि इराणच्या पर्सेपोलिस फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्यापूर्वी तेहरानमधील अल नासर संघाच्या मुख्यालयात रोनालडोने ‘फातिमा हमामी’ यांची भेट घेतली होती.

या भेटीमध्ये हमामीने रोनाल्डोचे बनवले दोन्ही चित्रे त्याल्या दाखविले होते. या बदल्यात रोनाल्डोने तिला 7 क्रमांकाचा अल-नासर टी-शर्ट स्वाक्षरी करून दिला होता.

मूळ पोस्ट – इंडियन एक्स्प्रेस

सदरील माहितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, स्पेनमधील इराणी दूतावासाने ट्विट करत व्हायरल दाव्याचे खंडन केले आहे.

ट्विट स्पॅनिशमध्ये लिहिलेले आहे की, “इराणमधील कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडापटूविरुद्ध न्यायालयाचा कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. ही निराधार बातमी आहे. रोनाल्डो 18 आणि 19 सप्टेंबर रोजी सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. तेव्हा त्याचे खूप चांगले स्वागत करण्यात आले. फातिमा हमामी यांच्याशी झालेल्या भेटीचे तेथील क्रीडा अधिकाऱ्यांनी कौतुक केले.”

फातिमा हमामी

फातिमा हमामी नसराबादी ही इराणमधील एक चित्रकार असून तिच्या शरीरातील 85% भाग निकामी आहे. विशेष म्हणजे फातिमा पायाने चित्र काढते.

रोनाल्डोसोबत भेटीचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला होता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. रोनाल्डोला इराणकडून कोणतीही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. स्पेनमधील इराणी दूतावासानेदेखील व्हायरल दाव्याचे खंडन केले आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इराणने रोनाल्डोला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False