Fact Check : ही महिला भारतीय लष्करात असल्याचा दावा किती सत्य

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

राजस्थानच्या वाळवंटात जीवघेण्या उष्म्यात एक महिला भारतीय लष्करात असणारी महिला पाहरा देत असल्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

राजस्थानच्या वाळवंटात जीवघेण्या उष्म्यात एक महिला भारतीय लष्करात असणारी महिला पाहरा देत असल्याचे छायाचित्र आम्ही बारकाईने पाहिले असता ते भारतीय लष्कराच्या गणवेषाशी मिळतेजुळते वाटत असले तरी तो भारतीय लष्कराचा गणवेष नसल्याचे लक्षात येते. गुगलवर आम्ही ही महिला नेमकी कोण आहे याचा आम्ही शोध घेतला.

या महिलेचे छायाचित्र असलेले ट्विट आम्हाला दिसून आले. ‘Allison Barrie’ या यूजरने हे ट्वीट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये BBC ची एक लिंक दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘Fighter + leader Asia Ramazan Antar ‘Angelina Jolie,’ killed fighting Islamic extremists’

बीबीसीचे वृत्त सविस्तर वाचल्यास लक्षात येते की, छायाचित्र दर्शविण्यात आलेली महिला भारतीय नाही. एशिया रमजान अंटर असे या महिलेचे नाव असून ती कुर्दिश आहे. अवघ्या 19 व्या वर्षी ऑगस्ट 2016 मध्ये उत्तर सीरियात तिची इसिसच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. एशिया YPG(Yekîneyên Parastina Gel) म्हणजेच People’s Protection Units ची ती सदस्य होती. हे संपूर्ण वृत्त आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

BBCNews | ArchivedLink

याशिवाय आम्हाला ‘TheTimes’ ने 9 सप्टेंबर 2016 मध्ये प्रकाशित केलेले एक वृत्त दिसून आले. ते एशियाच्या मृत्यूचे वृत्त होते.

ThetimesPost | ArchivedLink

निष्कर्ष

ही महिला भारतीय लष्करात असल्याचे कोणतेही पुरावे आढळत नाहीत. ही महिला कुर्दिश असून इसिसच्या दहशतवाद्याशी लढतालढता तिचा 2016 मध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:Fact Check : ही महिला भारतीय लष्करात असल्याचा दावा किती सत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •