नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Missing Context राजकारण | Politics

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दोन्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये एक गुप्त बैठक झाली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो तीन वर्षांपूर्वी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये सोनिया गांधी यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि इतर भाजप सदस्य आहेत. हा फोटो शेअर करून अंदाज लावला जात आहे की, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये गुप्त बैठक झाली. 

मूळ पोस्ट — फेसबुक

मूळ पोस्ट — ट्विटर

तथ्य पडताळणी 

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळले की, हा फोटो तीन वर्षांपूर्वीचा आहे.

द ट्रिब्यून वृतसंस्थाच्या बातमीनुसार, 1 ऑगस्ट 2021 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू होता. त्यामुळे 17 दिवस कामात सतत व्यत्यय येत राहिल्याने लोकसभेचे कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले होते. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मग केंद्र सरकार आणि विरोध पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाली होते. व्हायरल होत असलेला फोटो या बैठकीचा आहे. 

ओम बिर्ला यांनी बैठकीचा एक व्हिडिओ ट्विटदेखील केला होता. कॅप्शनमध्ये ते लिहिताता की, ”लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी भविष्यात लोकहितासाठी सभागृहात चर्चा आणि संवादाला प्रोत्साहन द्यावे आणि त्यातील त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन केले.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, कॉंग्रसे अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप नेते यांच्यातील गुप्त बैठकचा हा फोटो नाही. तीन वर्षांपूर्वीचा पावसाळी अधिवेशनाचा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Missing Context


Leave a Reply