Fact Check : हा योगा आहे का, काय आहे याचे सत्य?

False सामाजिक

योगाचा नवीन प्रकार, असा दावा करत सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Kapil Danej यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हा नक्की योगा आहे का? असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला पडले. या व्हिडिओच्या खालीच कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने हा व्हिडिओ पुण्यातील मोशी येथील असल्याची माहिती दिली आहे. अनेकांनी योगाचा हा नेमका कोणता प्रकार आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका योग शिक्षकाने असा कोणताही योग नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकाने हा सिंहासन योग असून त्याचा उपयोग स्किन टाईट करण्यासाठी होतो, असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नीट पाहिला असता आम्हाला Woodsvile असे लिहिले असल्याचे दिसून आले. 

वूडसविल्ले नेमके कुठे आहे हे गुगलच्या सहाय्याने आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वूडसविल्ले हे पिंपरी-चिंचवड परिसरात मोशी-चिखली या गावांजवळ असल्याचे आम्हाला दिसून आले. 

गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या सहाय्यानेही आम्ही या ठिकाणापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. 

हा व्हायरल व्हिडिओ आम्ही युटूयूब आणि गुगलवर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साम टीव्हीने या महिलांची  प्रत्यक्ष मुलाखत घेतल्याचे दिसून आले. या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक हास्यक्लब असून याला त्या हास्यक्लब योगा असे म्हणतात. केवळ हसण्यास यावे या उद्देशाने त्या अशी कृतीत यातून त्यांना असणारा डोकेदुखी, Acidity, गुडघेदुखी याचा त्रास बंद होत असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. ताणतणावापासून मुक्तता, शरीरला फायदा, उत्साह हे या हास्याचे फायदे असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. यामुळे आतडी मजबूत होतात, असा दावा मात्र या महिलांनी केलेला नाही.

निष्कर्ष

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी-चिखली परिसरातील वूडसविल्ले या सोसायटीतील महिलांचा हा व्हिडिओ आहे. या हास्यक्लबमधील या प्रकारामुळे उतारवयात होणारे डोकेदुखी, Acidity, गुडघेदुखी, ताणतणाव यापासून मुक्तता मिळविण्यास फायदा होत असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. आतडी मजबूत होतात, असा दावा या महिलांनी केलेला नाही. त्यामुळे हा हास्यक्लबमधील हसण्यासाठीचा एक प्रकार आहे. यामुळे आरोग्यास फायदा होत असला तरी आतडी मजबूत होतात, असा ठाम दावा करता येत नाही. असा कोणताही प्रकार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य राहील. या पोस्टमधील दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact Check : हा योगा आहे का, काय आहे याचे सत्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False