हे पत्रक आम आदमी पक्षाचे आहे का? वाचा सत्य

False राजकीय | Political

दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच समाजमाध्यमात एक पत्रक पसरत आहे. हे पत्रक आम आदमी पक्षाने जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे. हरिश पाटील यांनीही असे पत्रक पोस्ट केले आहे. हायलाईट केलेले वाक्य वाचा, मग हिंदुत्वाची व देशहिताची तमा बाळगणाऱ्या पक्षाला बहुमत का हवे ते ठरवा, असे त्यांनी म्हटले आहे. या पत्रकावर निवडणूक आयोग झोपलाय का? असा सवालही एकाने उपस्थित केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.01.23-19_28_45.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

या पत्रकाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, आम आदमी पक्षाच्या पोस्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

image3.png

आज तकने दिलेले वृत्त / Archive

त्यानंतर दैनिक जागरणच्या संकेतस्थळाने 23 ऑगस्ट 2017 रोजी दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. वृत्तानुसार या पत्रकाचा वाद भाजपने निवडणुक आयोगाकडे नेला आहे. केजरीवाल यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने केली आहे. 

image1.png

दैनिक जागरणच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर नवभारत टाईम्सने दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार इम्रान हुसेन यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की, त्यांच्या नावाने खोटी पत्रके वाटण्यात येत आहेत.

image2.png

नवभारत टाईम्सचे सविस्तर वृत्त / Archive

या संशोधनातून हे दिसून आले की, हे पत्रक सध्याचे नसून तीन वर्षापुर्वीचे म्हणजेच 2017 मधील आहे. याप्रकरणी इमरान हुसैन यांनी हे पत्रक बनावट असून कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दिली होती.

निष्कर्ष

हे पत्रक सध्याचे नसून तीन वर्षापुर्वीचे म्हणजेच 2017 मधील आहे. आम आदमी पक्षाने ते बनावट असल्याची दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:हे पत्रक आम आदमी पक्षाचे आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False