पार्थ पवार यांनी मित्राच्या कारची तोडफोड केल्याची ही बातमी कधीची?

Mixture राजकीय

सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या बाबतीत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली असा दावा करण्यात आला आहे. फेसबुकवर विनायक आंबेडकर या नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

फेसबुकअर्काईव्ह

फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने मित्राची कार फोडली अशी बातमी दिली आहे. त्या बातमीची तारीख मुंबई, 30 (प्रतिनिधी) असे लिहिलेले आहे. बातमीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्याच्या मित्रांनी गाडीचे नुकसान केल्याचा आरोप कारमालक नदीम मेनन याने केला आहे.

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये देण्यात आलेल्या बातमीचे शीर्षक उपमुख्यमंत्र्यांच्या असे लिहिले असल्याने ही बातमी जुनी आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते. ही बातमी कधीची आहे हे जाणण्यासाठी आम्ही गुगलवर सर्च केले. त्यानंतर याविषयी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे.

Mumbai Mirror l अर्काईव्ह

मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये 30 जून 2013 रोजी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याबद्दल बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भात मुंबई येथील एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कलम 427 (मालमत्तेचे नुकसान) – complaint under section 427 (damaging property) and 506 (intimidation) असे म्हटले आहे.

Mumbai Mirror l अर्काईव्ह

झी 24 तासअर्काईव्ह  

पोस्टमध्ये पार्थ पवार यांनी मित्राच्या कारची तोडफोड केली म्हणून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे असे म्हणण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कोड ऑफ कडक्ट या विभागात (NC and Non NC) म्हणजेच दखलपात्र आणि अदखलपात्र या प्रकारात मोडणाऱ्या गुन्हा संदर्भात माहिती शोधली. या वेबसाईटवर कोड ऑफ कडक्टमध्ये कोणताही उल्लेख आढळून येत नाही.

निवडणूक आयोगअर्काईव्ह

पार्थ पवार यांच्या नावावर गुन्हा दाखल झालेला आहे का याबद्दल मावळ मतदार संघातून लोकसभा 2019 साठी त्यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे कोणत्या गुन्ह्याची नोंद आहे का हे तपासले. त्यानुसार पार्थ पवार यांच्या नावावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हे समोर आले आहे.

निवडणूक आयोग – पार्थ पवार अफेडिव्हेट (निवडणूक अर्ज)अर्काईव्ह

याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने मुख्य निवडणूक अधिकारी – महाराष्ट्र  यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी श्रीमती मोनिका सुरजपाल सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिली.

“जर पार्थ पवार यांच्या निवडणूक अर्जामध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसेल तर व्हायरल पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या घटनेची केवळ तक्रार देण्यात आली असेल. तसेच या घटनेबद्दल नंतर कालांतराने तक्रार मागे घेण्यात आली असेल. त्यामुळे जर निवडणूक आयोगाकडे भरण्यात आलेल्या अर्जामध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसेल तर व्हायरल होणारी घटना किरकोळ स्वरुपाची आहे.”

मुख्य निवडणूक अधिकारी – महाराष्ट्र संपर्कअर्काईव्ह

निष्कर्ष :  पार्थ पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती हे जरी सत्य असेल तरीही विद्यमान परिस्थितीत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन दिसून येत आहे. ही तक्रार कदाचित नंतर मागेही घेण्यात आली असावी. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:पार्थ पवार यांनी मित्राच्या कारची तोडफोड केल्याची ही बातमी कधीची?

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture