
आनंदाची बातमी.. एक्झिट पोल पाहता मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता.. अशी माहिती MNS For Maharashtra या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या माहितीसोबतच एक ग्राफिकही पोस्ट करण्यात आले आहे. या ग्राफिक्समध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे नाव दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने खरोखरच असा एक्झिट पोल घेतला आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा विधानसभा निवडणूकीपुर्वी घेण्यात आलेला 21 सप्टेंबर 2019 रोजी प्रसारित करण्यात आलेला एक्झिट पोल आम्हाला दिसून आला.
या सर्वेक्षणात मनसेच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याचा अंदाज खरोखरच एबीपी माझाने वर्तवला आहे का हे आम्ही शोधले. त्यावेळी आम्हाला मनसेला मिळणार असलेली अंदाजित टक्केवारी खालीलप्रमाणे दर्शवल्याचे दिसून आले. यात मनसेला 2019 मध्ये केवळ 02 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनसेला 2014 मध्येही केवळ 3.2 टक्के मते मिळाल्याचे यात स्पष्टपणे दर्शवले आहे.
मनसेला मिळणार असलेली अंदाजित जागा एबीपी माझाने खालीलप्रमाणे दर्शवल्याचे दिसून आले.
कोणत्या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किती फरक पडेल? यात भाजपला 2014 मध्ये 27.8 टक्के मते मिळाल्याचे दिसून येते. भाजपची ही मते वाढून 2019 मध्ये 31.1 टक्के होणार असल्याचे यात दिसून येत आहे. एबीपी माझाचे हे मूळ ग्राफिक्स आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
एबीपी माझाने एक्झिट पोलमध्ये मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवलेली नाही. मनसेच्या मताच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
