केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

MODI DEGREE: नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद संपता संपत नाही. त्यांच्या पदवीच्या अधिकृततेविषयी शंका उपस्थित करणारे आक्षेप आणि आरोप अधुनमधून केले जातात. अशाच एका नव्या दाव्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पदव्युत्तर पदवीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे, असे म्हटले आहे.  1983 साली मोदींच्या एम. ए. पदवीवर सही करणारे कुलगुरू प्रा. के. एस. शास्त्री दोन वर्षे आधीच म्हणजे 1981 सालीच निवृत्त […]

Continue Reading

हैदराबादमधील जुना व्हिडिओ संभाजीनगरमध्ये दंगेखोरांच्या अटकेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दोन गटांतील भांडणाचे पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. शहरातील किराडपुरा भागात उफाळलेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून 17 वाहनांची जाळपोळ झाली. शहर पोलिसांनी सुमारे 500 जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे दाखल केले असून दोषींचे अटकसत्र सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिस काही लोकांना रस्त्यावरून फरफटत ओढून […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी 2013 साली खरंच खासदारकी वाचविणारा अध्यादेश फाडला होता का? वाचा सत्य

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या वक्तव्यामुळे गेल्या आठवड्यात मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. लोकसभा सचिवालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, लोकप्रतिनिधी कायद्याचे (1951) कलम 8 आणि संविधानातील कलम 102(1) अंतर्गत राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा कागद फाडणारा एक […]

Continue Reading

तुर्कीमध्ये भूकंपानंतर भ्रष्ट बिल्डर्सना सरकारने खुलेआम गोळ्या घातल्या का? वाचा सत्य

तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भीषण भूकंपामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकामागून एक आलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे हजारो इमारती कोसळल्या.  सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैनिक सामान्य लोकांना खुलेआम गोळ्या घालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तुर्कीमध्ये इमारतींमध्ये भूकंपविरोधक साहित्य वापरण्याऐवजी त्याजागी वाहनांचे टायर्स (चाक) वापरणाऱ्या […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नितीन गडकरींच्या नावावर खोटे विधान व्हायरल; वाच सत्य

बहुचर्चित कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रसाने यांचा पराभव केला. यासह गेल्या 28 वर्षांपासून बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपला गमवावी लागली. प्रतिष्ठेची बनलेल्या या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर येत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ लागली. या पोस्टमध्ये गडकरी यांनी कथितरीत्या […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणूक: एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणूक आयोगबद्दल खोटे विधान व्हायरल

बहुचर्चित कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रस्सीखेच आज अखेर संपली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबापेठतून विजयी झाले. तत्पूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक वादग्रस्त विधान व्हायरल होऊ लागले.  सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने त्यांना कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल असे सांगितले. […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबला आपला भाऊ म्हटले? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘औरंगजेब’ला त्यांचा भाऊ म्हणून संबोधतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्यावर मुघल सम्राटाचे कौतुक केले म्हणून टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, अर्धवट क्लिप व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबविषयी […]

Continue Reading

मुस्लिम खेळाडुंनी टिळा न लावल्याच्या व्हिडिओला विनाकारण दिला गेला धार्मिक रंग; वाचा सत्य

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला नागपूर येथे 9 फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ तीन फेब्रुवारीलाचा नागपूर येथे दाखल झाला. या बहुप्रतिक्षेत सामन्याला मात्र एका वेगळ्याच्या वादाची किनार लागली आहे.  भारतीय संघ नागपुरच्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर तेथील स्टाफने त्यांचे टिळा लावून स्वागत केले. याप्रसंगाचा व्हिडिओ शेअर करून अनेकांनी संघातील दोन मुस्लिम […]

Continue Reading

Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना […]

Continue Reading

नटराज कंपनी घरबसल्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी देत नाही; फसव्या जाहिराती व्हायरल

सोशल मीडियावर सध्या घरी बसून हजारो रुपये कमविण्याची संधी देणाऱ्या जाहिराती व्हायरल होत आहेत. यात दावा केला जात आहे की, नटराज कंपनीद्वारे घरी बसून पेन/पेन्सिल पॅकिंग करण्याचे काम देण्यात येत आहे. यासाठी आगाऊ 15 हजार आणि मासिक 30 हजार रुपये पगार मिळणार, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

दोन महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही; तो तर उत्तर प्रदेशमधील आहे

न्यायालय परिसरात महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ही घटना महाराष्ट्रातील असून, महिला न्यायाधीशाने सदरील महिला वकिलाच्या होणाऱ्या पतीला जामीन नाकारला म्हणून या दोघींमध्ये हाणामारी झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.  आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

COVID-19: कोविडचा XBB सबव्हेरिएंट पाचपट जास्त घातक आहे का? वाचा सत्य

सुमारे एक वर्षाच्या विश्रामानंतर कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-7 सब-व्हेरिएंट तर सिंगापुरमध्ये XBB सब-व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही कोरोना लाटेचा संभाव्य धोका ओळखता खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंटविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, XBB सब-व्हेरिएंट आधीच्या […]

Continue Reading

एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हायरल क्लिपमध्ये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मागे ढकलताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर […]

Continue Reading

चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो शाहरुख खान औरंगाबादमध्ये दाखल झाला म्हणून व्हायरल

अभिनेता शाहरुख खान चार वर्षांच्या खंडानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पुढील वर्षी शाहरुखचे पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पैकी ‘जवान’ सिनेमाचे औरंगाबादजवळील बिडकीन येथे चित्रिकरण सुरू आहे.  सोशल मीडियावर बिडकीन येथे शाहरुख खानच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही उत्साही चाहत्यांनी तर शाहरुख तेथे पोहचला असा फोटोसुद्धा शेअर केला […]

Continue Reading

हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे

इंडोनेशियामध्ये 21 नोव्हेंबर रोजी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 268 लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ज्वालामुखी उद्रेकानंतर आलेल्या कथित भूकंपाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियामधील सुमात्रा येथे पाण्याच्या आत झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा आहे. यात पाण्याच्या आतून बाहेर पडणारा ज्वालामुखी किनाऱ्यावर येताना दिसतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याचे समर्थन करणारा ‘तो’ तरुण मुस्लिम नाही; त्याचे नाव विकास कुमार

वसईतील श्रद्धा वालकर (26) या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण गाजत असतानाच या खूनप्रकरणी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण स्वतःचे नाव राशीद खान असे सांगतो. हा व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यांसह शेअर केला जात आहे की, मुस्लिम युवक श्रद्धाच्या मारेकऱ्याची बाजू घेत आहे. […]

Continue Reading

RBI ला न विचारताच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, असे रघुराम राजन म्हणाले का? वाचा सत्य

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेशी प्रदीर्घ सल्लामसलत करूनच नोटंबदीचा निर्णय घेण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर आरबीआय माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे केंद्राला खोटे ठरवणारे एक कथित विधान व्हायरल होत आहे. यात रघुराम राजन कथितरीत्या म्हणतात की, नोटबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा मी गव्हर्नर होतो आणि आरबीआयला विचारात न घेताच […]

Continue Reading

आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य

सोन्याचे विमान, सोन्याचा पलंग, नोटांचा ढीग, हिऱ्यांनी मढवलेला जिना आणि मातीच्या कबरीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहेत की, इतक्या अफाट संपत्तीचा मालक असलेला कुवैतमधील अब्जाधीश शेवटी रिकाम्या हातानेच जग सोडून गेला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, इंटरनेटवरील एकमेकांशी काहीही […]

Continue Reading

FAKE NEWS: मुस्लिमांनी खरंच कोर्टात मान्य केले की थुंकल्याशिवाय हलाल पूर्ण होत नाही?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदयाने उच्च न्यायालयात मान्य केले की, अन्नात थुंकल्याशिवाय ते अन्न हलाल प्रमाणित होत नाही. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले की, तमिळनाडू उच्च न्यायालयात एका केसच्या सुनवाईत अशी कबुली देण्यात आली. या पोस्टच्या माध्यमातून मुस्लिम हॉटेलविक्रेत्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये मुंडे यांचा फोटो घेऊन चालले. या फोटोवरून […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

हे अरुणाचल प्रदेशमधील पंचतारांकित इटानगर विमानतळ नाही; वाचा या व्हिडिओचे सत्य

एका आकर्षक बनावटीच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे सुरू होणारे नवे विमानतळ आहे. विशेष म्हणजे या विमानतळासाठी पारंपारिक बांबूचा वापर करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

चीनमधील ‘ड्रॅगन परेड’चा व्हिडिओ केरळमधील नौका दीपोत्सवाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

दिव्यांनी उजाळलेल्या नौकांचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, केरळमध्ये नुकतेच 240 होड्यांवर अशी रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ केरळमधील नाही.  काय आहे दावा? दिव्यांच्या रोषणाईने नटलेल्या होड्यांचा हा व्हिडिओ […]

Continue Reading

इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीन नोव्हेंबर रोजी एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर सोशल मीडियवार इम्रान खान यांचे जखमी फोटो शेअर करण्यात येऊ लागले.  दावा करण्यात येत आहे की, इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आणि सुमित्रा महाजन येणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, ही निव्वळ […]

Continue Reading

सुधा मुर्ती मुंबई-बंगळुरू रेल्वेत विनातिकिट प्रवास करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्या बालपणाविषयक एक करुणादायी मेसेज व्हायरल होत आहे. लहानपणी मुंबई-बंगळुरू रेल्वेतून त्या विनातिकिट प्रवास करत असताना एका मायाळू प्राध्यापिकेने त्यांची मदत करत त्यांना शिकण्यासाठी मदत केली, असे या व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताविषयी केलेले एक कथित विधान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, सुनक यांच्या नावाने खोटे विधान […]

Continue Reading

एलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवल्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी येताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी केली. यानंतर सोशल मीडियावर वावड्या उठू लागल्या की, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवली. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रक काढून स्वतः माहिती दिली, असा देखील दावा करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी दीप प्रज्वलन करून पंतप्रधान कार्यालयात प्रवेश केला का? वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी दारात दीप प्रज्वलन केले, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुनक दारात दिवे ठेवताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर […]

Continue Reading

भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकविल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? वाचा सत्य

भारतात कोणीही जर पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर त्या व्यक्तीवर कोणतीही सुनवाई न करता थेट देशद्रोहाचा खटला चालविण्याचा गृह मंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतला, असा मेसेज व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, गृह मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. […]

Continue Reading

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील विराट गर्दीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे सत्य काय?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे. विविध राज्यातून जात असेलेल्या या यात्रेबद्दल सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत.  याच संदर्भात विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांच्या कर्नाटकमधील सभेला जमलेल्या गर्दीचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

दिवाळीत चीनचे विषारी फटाके न खरेदी करण्याचे गृहमंत्रालयाने आवाहन केलेले नाही

एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

या फोटोत राहुल गांधींसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी मुलगी नाही; वाचा सत्य

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर विविध दाव्यासह व्हायरल होत आहेत. अशाच एका फोटोत राहुल गांधी यांच्यासोबत एक मुलगी दिसत आहे.  युजर्स दावा करत आहेत की, या मुलीचे नाव “अमूल्या लियोना” असून सीएए आंदोलनादरम्यान तिने हैदराबादमध्ये भर स्टेजवरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. अशा मुलीसोबत राहुल […]

Continue Reading

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना राजस्थानमध्ये झाली; गुजरातमध्ये नाही

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. असाच एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये या पुतळ्याची विटंबना झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा […]

Continue Reading

भारतासाठी एका कॉलवर रक्त मिळवण्याची 104 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली नाही

सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की, संपूर्ण भारतासाठी ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेकरिता 104 क्रमांक सुरू करण्यात आला आहे. रक्ताची गरज असल्यास भारतात कुठूनही या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. 104 हा क्रमांक […]

Continue Reading

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर? WHO च्या नावाने फेक बातमी व्हायरल

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे येत्या दोन वर्षांत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिल्याचे बातमीच्या कात्रणामध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा कोणताही […]

Continue Reading

सांगलीमध्ये कथित ‘बच्चा चोर’ साधूंवरील हल्ल्याचा म्हणून मध्य प्रदेशमधील व्हिडिओ व्हायरल

सांगली जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली. यानंतर 14 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर साधूंना मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.  अशाच एका व्हिडिओमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या काही जणांना काठ्यांनी मारले जात आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सांगली […]

Continue Reading

Fake News: केवळ मोदीच देशाचा विकास करू शकतात अशी बीबीसीचे पत्रकार मार्क टुली यांनी स्तुती केली का?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात काँग्रेस ने उभे केलेल्या सर्व विषारी सापांना संपवण्याचे काम सुरू केले आहे. या कामी हिंदूंनी त्यांना साथ द्यावी”, असे बीबीसीचे पत्रकार मार्ट टुली यांनी कथितरीत्या एका लेखात म्हटल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

नेपाळच्या संसदेत नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, नेपाळच्या संसदेत तेथील खासदाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. सोबत एका नेत्याचा भाषण करतानाचा व्हिडिओ दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. हा व्हिडिओ नेपाळचा नसून, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेतील  आहे.  […]

Continue Reading

‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ असा व्हिडिओ डाऊलोड केल्यावर फोन फॉरमॅट होतो का? वाचा सत्य

‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ नावाचा व्हिडिओ स्वीकारू नका कारण त्यात मोबाईल फॉरमॅट करणारा व्हायरस आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ 9266600223 या क्रमांकावरून येत असल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. असा कोणताही व्हायरस […]

Continue Reading

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये अर्धांगवायूच्या गोळ्या सापडल्याचा व्हिडिओ फेक; विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

ल्युपो/लुप्पो नावाच्या कंपनीच्या केकमध्ये लहान मुलांना अर्धांगवायू होईल अशा गोळ्या सापडल्या, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केकमध्ये पांढऱ्या गोळ्या निघाल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही. तसेच तो खोडसाळपणे कोणीतरी तयार केला होता.  काय […]

Continue Reading

अत्तर विकण्याच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज फेक; वाचा सत्य

मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा लोकांपासून सावधान राहावे, असा सल्ला मुंबई पोलीसांनी दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई […]

Continue Reading

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नोकर भरतीचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य 

मुंबई अग्निशमन दलामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकर भरती सुरू झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये 774 अग्निशामकांची सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटल आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई अग्निशमन दलामध्ये […]

Continue Reading

ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून भारताचे नाव INDIA ठेवण्यात आले नाही; वाचा सत्य

नुकतेच भारताने 75 वा स्वातंत्र्या दिन साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाबरोबरच भारताचे इंग्रजी नाव (India) कसे पडले याविषयी एक रंजक मेसेजदेखील व्हायरल झाला. व्हायरल मेसेजनुसार, भारत ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून त्याला INDIA (Independent Nation Declared In August) असे म्हणतात. सोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ही माहिती दिल्याचा दाखला दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला का? जुना व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्याची बातमी व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आपल्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत फडणवीसांना राजीनामा देण्याची मागणी करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading