राजीव गांधी यांचा हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजन करतानाचा नाही. वाचा सत्य

False राजकीय

आयोध्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, 9 नोव्हेंबर 1989 रोजी राजीव गांधी यांच्या हस्ते राम मंदिराची शिलान्यास व भूमीपूजन कार्यक्रमाचा हा फोटो आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजनाचा नसल्याचे समोर आले. 

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा फोटो आयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा नाही.

हा फोटो नवी दिल्ली येथे 1989 साली राजीव गांधी यांनी रशियातील हरेकृष्ण भक्तसमुदायाची घेतलेल्या भेटीचा आहे. विकिमीडिया आणि स्वतः काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर असे सांगण्यात आले आहे.

अर्काइव्ह

पोस्टमधील दुसऱ्या फोटोलादेखील रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, तोसुद्धा 1989 सालातील राम मंदिर भूमीपूजनाचा नाही.

टाईम्स ऑफ इंडिया व बीबीसी हिंदीच्या बातमीनुसार, हा फोटो 2002 साली आयोध्येत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि परमहंस रामचंद्र दास यांनी केलेल्या शिलादान कार्यक्रमातील आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालय व तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विरोध असूनही विश्व हिंदू परिषदेने 15 मार्च 2002 रोजी आयोध्येत राम मंदिरासाठी शिलादान केले होते. 

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाबीबीसी हिंदी

मग 1989 मधील भूमीपूजनाचे काय?

हे सत्य आहे की, राजीव गांधी पंतप्रधान असताना 9 नोव्हेंबर 1989 रोजी आयोध्येत राम मंदिराच्या वादग्रस्त जागेजवळ भूमीपूजन करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, राजीव गांधी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पोस्टमधील दोन्ही फोटो 1989 साली झालेल्या राम मंदिर भूमीपूजनाचे नाहीत. 1989 साली झालेल्या भूमीपूजन कार्यक्रमाला राजीव गांधी उपस्थित नव्हते.

Avatar

Title:राजीव गांधी यांचा हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजन करतानाचा नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False