भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ओळखला जातो. राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या या महामार्गावरील एक व्हिडिओ Ebrahim Sarkhot यांनी कोकण माझा लय भारी या पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडो या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

मुंबई-दिल्ली महामार्गावर पनियाडा मोड या ठिकाणी हा अपघात घडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ अधिक बारकाईने पाहिला त्यावेळी या व्हिडिओतील वाहने डावीकडून जाताना नव्हे येताना दिसत असल्याचे आमच्या लक्षात आले. आपण हे खाली पाहू शकता.

त्यानंतर आम्ही या व्हिडिओतील काही छायाचित्रे घेत ती रिव्हर्स सर्च केली. तेव्हा आम्हाला खालील परिणाम प्राप्त झाला.

ARCHIVE

या परिणामाच्या आधारे आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. चीनच्या एका संकेतस्थळावर आम्हाला या अपघाताचा हा व्हिडिओ दिसून आला. हा अपघात 30 मे 2019 रोजी चीनच्या हेबई प्रांतात हेन्गशुई शहरातील  बाओहेन्ग रोडवर झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

ARTICLE LINK | ARCHIVE

या अपघाताचा चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

https://youtu.be/oloZFqkImnQ

VIRAL TAB NEWS | ARCHIVE

https://youtu.be/VB3P5qDqkZs

चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या या बातम्यांवरुन आणि व्हिडिओतील काही दृश्यांवरुन हे स्पष्ट होत आहे की हा व्हिडिओ मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील नसून चीनमधील आहे.

निष्कर्ष

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील हा व्हिडिओ नसून तो चीनमधील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : हा अपघात मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाही

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False