हर्षवर्धन पाटील यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, असा फलक हातात घेतलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  

Harshwardhan Patil.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट

तथ्य पडताळणी

माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माझं चुकलं मी भाजपात गेलो, असे काही वक्तव्य केले आहे का? याचा शोध घेतला. तेव्हा असे कोणतेही वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त दिसून आले नाही. इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन केल्याचे वृत्त पोलीसनामा या संकेतस्थळाने 22 मे 2020 रोजी प्रसिध्द केल्याचे मात्र दिसून आले. या वृत्तात हर्षवर्धन पाटील यांचे एक छायाचित्र असून त्यात त्यांनी हातात एक फलक घेतला असून त्यावर केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने शेतकरी, मजुरांसाठी पॅकेज जाहीर करावे, असे म्हटले आहे. 

Policnama.png

पोलीसनामा / संग्रहित

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या व्हेरिफाईड फेसबुक पेजला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी 22 मे 2020 रोजी कोरोना महामारीमुळे राज्यावर ओढावलेले संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाविकासआघाडी सरकारचा निषेध, अशा ओळींसह ‘महाराष्ट बचाव’ या भाजपच्या आंदोलनातील त्यांचे आणि त्यांचे सुपूत्र राजवर्धन यांचे सहभागाचे छायाचित्र दिसून आले. 

संग्रहित

हर्षवर्धन पाटील यांच्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावरही 22 मे 2020 रोजी रोजी हेच छायाचित्र याच माहितीसह दिसून आले.

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, हर्षवर्धन पाटील यांच्या मूळ छायाचित्रात फेरबदल करुन समाजमाध्यमात व्हायरल झालेले छायाचित्र तयार करण्यात आले आहे. या दोन्ही छायाचित्राची तुलना आपण खाली पाहू शकता.

2020-05-26.png

निष्कर्ष

हर्षवर्धन पाटील यांचे माझं चुकलं मी भाजपात गेलो, असा फलक असलेले छायाचित्र हे एडिट केलेले असून बनावट आहे.

Avatar

Title:हर्षवर्धन पाटील यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False