राहुल गांधी यांचा डाव्या हाताने सलामी देतानाचा फोटो FAKE आहे. वाचा सत्य

False राजकीय | Political

राहुल गांधी सध्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून वादात सापडले आहेत. स्मृती ईराणी यांनी यावरून त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. यामध्ये राहुल गांधी डाव्या हाताने सलामी देताना दिसतात. या फोटोवरून त्यांच्यावर पुन्हा टीका करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्य पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

राहुला गांधी यांना डाव्या हाताने सलामी देताना दाखवणाऱ्या या फोटोसोबत उपरोधाने म्हटले की, “हाच तो महान नेता आहे ज्याला एवढेदेखील माहित नाही की, सलामी कोणत्या हाताने देतात. आणि याला देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे.” (भाषांतर)

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. अनेकांनी हा फोटो एडिट केला असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे फोटोबाबत साशंकता आहे. सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, मूळ फोटोला होरिझोंटल फ्लिप (Mirror) करून हा फोटो तयार करण्यात आला आहे.

आऊटलूक मॅगझीननुसार हा फोटो राहुल गांधी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात 65 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंड्याला सलामी देतानाचा आहे. या फोटोत ते उजव्या हाताना सलामी करताना स्पष्ट दिसतात.

मूळ फोटो येथे पाहा – आऊटलूकइंडिया टुडे

टाईम्स ऑफ इंडिया आणि एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, 15 ऑगस्ट 2015 रोजीचा हा फोटो आहे. सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत गेल्या होत्या. राहुल गांधीदेखील त्यांच्यासोबत तेथे होते. सर्जरी झाल्यानंतर राहुल गांधी भारतात परत आले होते. त्यानंतर त्यांना पक्ष मुख्यालयात झेंडावंदनास हजेरी लावली होती. हा फोटो यावेळी काढण्यात आला होता.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाएनडीटीव्ही

निष्कर्षः 

यावरून हे सिद्ध होते की, राहुल गांधी यांच्या मूळ फोटोशी छेडछाड करून ते डाव्या हाताने सलामी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मूळ फोटोत राहुल गांधी उजव्या हाताने सलामी देत आहेत. तुमच्याकडेदेखील असे संशयास्पद मेसेज असल्यास त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (9049043487) क्रमांकावर पाठवा.

Avatar

Title:राहुल गांधी यांचा डाव्या हाताने सलामी देतानाचा फोटो FAKE आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False