स्पेनमधील विमानतळावरील फोटो इटलीतील डॉक्टर दाम्पत्याचा म्हणून व्हायरल

Coronavirus False आंतरराष्ट्रीय वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या इटलीतील एका डॉक्टर दाम्पत्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या दाम्पत्याने 134 रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूपुर्वी त्यांनी इटलीतील रुग्णालयात एकमेकांचे चुंबन घेतले तेव्हाचे हे छायाचित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

screenshot-www.facebook.com-2020.03.25-10_21_19.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

या फोटोचे सत्य जाणून शिकण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात chicagotribune आणि medicalxpress या संकेतस्थळांनी दिलेल्या एक वृत्त दिसून आले. यानुसार हा फोटो स्पेनमधील आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आल्यानंतर स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावर गुरुवारी 12 मार्च 2020 रोजी एमिलो मोरेनाट्टी या असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने हे जोडपे चुंबन घेत प्रेम भावना व्यक्त करत असताना छायाचित्र काढले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपवरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादल्यावर घेण्यात आलेले हे छायाचित्र आहे.

screenshot-www.chicagotribune.com-2020.03.25-12_08_54.png

chicagotribune / Archive

त्यानंतर छायाचित्रकार एमिलो मोरेनाट्टी यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला खालील ट्विट दिसून आली. या ठिकाणीही त्यांनी हे छायाचित्र स्पेनच्या बार्सिलोना विमानतळावरील असल्याचे म्हटले आहे.

Archive

इटलीतील माध्यमांनी डॉक्टर जोडप्याच्या मृत्यूचे कोणतेही वृत्त दिल्याचेही आढळून येत नाही. यातून हे स्पष्ट झाले की, हे छायाचित्र इटलीतील रुग्णालयातील नसून ते स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावरील आहे.

निष्कर्ष

इटलीतील 134 रुग्णांवर उपचार करून मृत्यू झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचे हे छायाचित्र नाही. हे छायाचित्र इटलीतील रुग्णालयातील नसून ते स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावरील आहे.

Avatar

Title:स्पेनमधील विमानतळावरील फोटो इटलीतील डॉक्टर दाम्पत्याचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •