इंडोनेशियातील फोटो तामिळनाडूमधील मंदिरातील प्राचीन शिल्प म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

तामिळनाडूमधील पंचवर्णस्वामी मंदिरातील दोन हजार वर्षांपूर्वीचे शिल्प म्हणून दोन फोटो सोशल मीडियावर पसरविले जात आहेत. यामध्ये एक व्यक्ती सायकलसदृश्य वाहन चालविताना दाखविण्यात आली आहे. यावरून भारतात प्राचीन काळापासून सायकलचा आविष्कार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर अनेक युजर्सने सदरील दोन शिल्पांचे फोटो शेयर करून लिहिले की, तामिळनाडू मधील पंचवर्णस्वामी मंदिरात 2 हजार वर्षे पूर्वीचे एक शिल्प आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सायकल चालवीत असल्याचे दिसून येते. यामुळे 200 वर्षांपूर्वी इंग्रजांनी सायकलचा शोध लावला यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दोन छायाचित्रे आहेत. एक-एक करीत त्यांची पडताळणी करूयात.

फोटो क्र. 1

वरील छायाचित्राला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हे शिल्प तर भारतातील नाही. ट्रीप अ‍ॅडव्हायजर संकेतस्थळावरील माहितीनुसार हे शिल्प इंडोनेशियातील बाली बेटावरील मेडिवे करंग मंदिरातील आहे. फ्लिकरवरदेखील एक युजरने हा फोटो शेयर करून लिहिले की, या शिल्पामध्ये सायकल चालवणारा व्यक्ती नेदरलँडमधील कलाकार डब्लू. ओ. जे. न्युवेनकॅम्फ आहे. 

मूळ फोटो येथे पाहा – फ्लिकरगेटी इमेजेस

विकिपीडियावरील माहितीनुसार, बालीला भेट देणारा तो पहिलाच युरोपियन कलाकार होता. गेटी इमेजेस संकेतस्थळावरदेखील हा फोटो बालीमधील 1904 साली कोरण्यात आलेल्या शिल्पाचा आहे. यावरून हा फोटो तमिळनाडू येथील पंचवर्णस्वामी मंदिरातील नाही आणि ते दोन हजार वर्षांपूर्वीचेसुद्धा नाही.

फोटो क्र. 2

या फोटोसंबंधी इंटरनेटवर काही तथ्यपूर्ण माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे शिल्प तमिळनाडूमधील पंचवर्णस्वामी मंदिरातील आहे का हे तपासण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने तमिळनाडूमधील हिंदू धार्मिक व धर्मदाय विभागाशी संपर्क साधला. त्यांनी हा फोटो पंचवर्णस्वामी मंदिरातील नसल्याचे सांगितले. या मंदिरातील शिल्प वेगळे असल्याचीही त्यांनी माहिती दिली.  द हिंदूच्या माहितीनुसार, पंचवर्णस्वामी मंदिरात नुतनीकरणादरम्यान 1920 साली सायकल चालवितनाचे शिल्प कोरण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, सदरील पोस्टमधील दोन्ही फोटोंतील शिल्प तमिळनाडूमधील पंचवर्णस्वामी मंदिरातील नाही. तसेच ते दोन हजार वर्षांपूर्वीचेदेखील नाहीत. पैकी एक शिल्प (फोटो क्र. 1) इंडोनेशियातील बाली बेटावरील आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:इंडोनेशियातील फोटो तामिळनाडूमधील मंदिरातील प्राचीन शिल्प म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •