कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुरखा घालून दगडफेक केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

False राजकीय | Political

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. अशाच व्हायरल दाव्यामध्ये म्हटले आहे की, काँग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायाला बदनाम करण्यासाठी बुरखा घालून पोलिसांवर दगडफेक केली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. तेलगंनामधील जुनी घटना चुकीच्या दाव्यासह व्हायरल आहे.

काय आहे दावा ?

या व्हिडिओमध्ये दिसते की, पोलिसांनी एका बुरखा घातलेल्या पुरुषाला पकडलेले आहे. 

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहिले की, “एका राज्याचा पराभव पचवू न शकणारे भाजपवाले अजून किती खालच्या थराला जातील हे लोकं भाजपचे काही पदाधिकारी मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी स्वत बुरखा घालून पोलीसांवर दगडफेक करताना पकडले गेले.”  

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स ईमेज केल्यावर कळाले की, गेल्या तीन वर्षांपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. ईटीव्ही आंध्र प्रदेश वृत्तवाहिनीने 8 ऑगस्ट 2020 रोजी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. त्यात म्हटले की, “आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यात अवैधरित्या दारू नेणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.”

संपूर्ण बातमी आपण खाली पाहू शकतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, बंगळुरू कडून आंध्र प्रदेशातील बेथमचेरला शहराजवळ दारू तस्करीची सूचना मिळताच पोलिसांनी पाच जणांना पकडले आणि तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.

कर्नुलचे तत्कालीन पोलिस अधीक्षक फकीरप्पा कागिनेल्ली यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, “हा व्हिडिओ आंध्र प्रदेश आणि तेलंगनाच्या सीमेजवळचा आहे, एका तस्कराने बुरखा घातला होता. परंतु व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला ही पकडण्यात आले होते.”

पोलिस अधीक्षक फकीरप्पा कागिनेल्ली ट्विट करत व्हायरल दाव्याचे खंडन कले आहे.

तसेच फॅक्ट क्रेसेंडोने कर्नुलच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुख्य निरीक्षक लक्ष्मी दुर्गाई यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितल की, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती तेलंगना कडून आंध्र प्रदेश प्रवास करत होता. जेव्हा त्याची झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांनी त्याच्या कडून कडे 78 दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणात 7 जणांना ताब्यात घेतले होते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हिडिओ कर्नाटक किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा नाही. तीन वर्षांपूर्वी तेलंगना पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीना पकडतानाचा हा व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुरखा घालून दगडफेक केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False