ऋषी कपूर यांची निधनापूर्वीच्या रात्री काढलेली ही क्लिप नाही; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी मुंबई येथे निधन झाले. निधनाच्या आदल्या रात्री रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेली शेवटची क्लिप म्हणून एक व्हिडियो पसरत आहे. ऋषी कपूर यांची ही खरोखरच शेवटची क्लिप आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा हा व्हिडियो नेमका कधीचा आहे, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडियोतील एक द्दश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी दैनिक दिव्य मराठीच्या संकेतस्थळावरील 30 एप्रिल 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात हा व्हिडियो सुमारे दोन महिने जुना असून तो सध्या व्हायरल होत असल्याचे म्हटले आहे.

Divya Marathi.png

दिव्य मराठी / Archive

त्यानंतर युटूयूबवर 3 फेब्रुवारी 2020 रोजी धीरजकुमार सानू यांनी अपलोड केलेला एक व्हिडियो दिसून आला. हा तोच व्हिडियो असल्याचे दिसून आले. जो त्यांच्या शेवटच्या रात्रीचा व्हिडियो म्हणून व्हायरल होत आहे. 

Archive

धीरजकुमार सानू यांनी हा व्हिडियो व्हायरल होऊ लागल्यावर स्वत: पुढे येत याबाबत स्पष्टीकरण दिले. ऋषी कपूर फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील एका दवाखान्यात उपचार घेत होते. तेव्हा धीरजकुमार याने हा व्हिडियो चित्रित केला होता. धीरजकुमार दिल्लीतील त्या दवाखान्यात काम करतो. 

Archive

ऋषी कपूर हे दिल्लीतील रुग्णालयात का दाखल होते, याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने 4 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्याचेही दिसून येते. 

निष्कर्ष

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वीच्या अखेरच्या रात्रीचा हा व्हिडियो असल्याचा दावा असत्य आहे. हा व्हिडियो जुना म्हणजेच दोन महिन्यापूर्वीचा आहे. ते दिल्लीतील एका दवाखान्यात उपचार घेत असतानाचा हा व्हिडियो आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:ऋषी कपूर यांची निधनापूर्वीच्या रात्री काढलेली ही क्लिप नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •