भाजप नेते विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला राज ठाकरे प्रचारसभांबद्दल पत्र लिहिले का?

True राजकीय

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात लोकसभा 2019 अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या होणाऱ्या प्रचारसभांबद्दल पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे, असा उल्लेख केलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट संदीप कुलकर्णी या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लोकसभा 2019 अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे ज्या प्रचारसभा घेत आहेत त्या संदर्भात पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे. काय खरेच विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले का याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने केलेली ही सत्य पडताळणी.

या विषयासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर विनोद तावडे गेव्ह अ लेटर टु इलेक्शन कमिशन असे सर्च केले. या संदर्भात विविध माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

वेब दुनियाअर्काईव्ह

इंडियन एक्सप्रेसअर्काईव्ह

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिहिले आहे. या पत्रामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या लोकसभा 2019 प्रचार सभांसंदर्भात आक्षेप नोंदवला आहे असा दावा करण्यात आला आहे. संशोधनाअंती फॅक्ट क्रिसेंडो टीमला हे आढळून आले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र हे महाराष्ट्राचे भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच लिहिलेले आहे. तसेच हे पत्र त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार सभांसंदर्भात निवडणूक आयोगाला लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील पत्र हे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे हे तथ्य खरे आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट भाजप नेते विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला राज ठाकरे प्रचारसभांबद्दल पत्र लिहिले हे तथ्य खरे आहे.

Avatar

Title:भाजप नेते विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला राज ठाकरे प्रचारसभांबद्दल पत्र लिहिले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: True