वृत्तपत्र कात्रणातील हा फोटो तृप्ती देसाई यांचा नाही, वाचा सत्य

False राजकीय | Political सामाजिक

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याविषयी म्हणून एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. तृप्ती देसाई ही महिला नाही आहे ही लेस्बिअन आहे ही समलैंगिक आहे एके काळी JNU मधे ही लेस्बिअन कपल समारंभात ही भाग घेत असत तिचा हा फोटो न्यूज पेपर मधला, अशी माहिती देत राहुल पोटे यांनी वृत्तपत्राचे हे कात्रण पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे छायाचित्र तृप्ती देसाई यांचेच आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे. 

Trupti Desai Fake Newspaper cutting claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी इंडिया इन आऊट या संकेतस्थळावर 14 नोव्हेंबर 2014 रोजी प्रसिध्द झाले असल्याचे आम्हाला दिसून आले. दिल्ली येथील झेंडेवाला मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ 8 नोव्हेंबर 2014 रोजी उजव्या विचारसरणीच्या संस्कृती रक्षकांच्या छळाविरोधात किस ऑफ लव्ह या चळवळीच्या उपक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळचे हे छायाचित्र आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

screenshot-indiainout.com-2020.02.21-10_59_38.png

इंडिया इन आऊट संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर bastamag.net या संकेतस्थळावरील 16 डिसेंबर 2014 रोजीचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तातही हे भारतातील किस ऑफ लव्ह कॅम्पेनमधील छायाचित्र असल्याचे म्हटले आहे. इंडिया टूडे या इंग्रजी मासिकाच्या संकेतस्थळानेही 8 नोव्हेंबर 2014 रोजी आपल्या संकेतस्थळावर हे छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे. यातही किस ऑफ लव्ह चळवळ अंतर्गत आयोजित कार्यक्रमातील दिल्लीतील रस्त्यावरील हे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे. 

delhi.png

इंडिया टूडेचे मुळ वृत्त 

screenshot-www.bastamag.net-2020.02.21-12_02_32.png

bastamag.net / Archive

तृप्ती देसाई (संग्रहण) अशा आंदोलनात भाग घेतलेला नाही. यातुन हे स्पष्ट झाले की, हे छायाचित्र तृप्ती देसाई यांचे नाही. ते दिल्लीतील किस ऑफ लव्ह चळवळीतील आंदोलनाचे छायाचित्र आहे. अनेक भारतीय आणि परदेशी माध्यमांनी ते 2014 मध्ये प्रसिध्द केलेले आहे. वृत्तपत्राचे हे बनावट कात्रण विनोदनिर्मितीसाठी वृतपत्र कात्रण बनविणाऱ्या संकेतस्थळांच्या सहाय्याने बनवलेले असावे.

निष्कर्ष

हे छायाचित्र 2014 मधील दिल्लीतील किस ऑफ लव्ह चळवळीतील आंदोलनाचे आहे. तृप्ती देसाई यांचे हे छायाचित्र नाही. हे वृत्तपत्राचे कात्रणही बनावट आहे.

Avatar

Title:वृत्तपत्र कात्रणातील हा फोटो तृप्ती देसाई यांचा नाही, वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False