किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे

Coronavirus False

लॉकडाऊनमुळे मानवी वर्दळ कमी झाल्याने वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. मासेमारीदेखील बंद असल्याने समुद्रातील मासे किनाऱ्यावर येत असल्याचा दावा करत अनेक व्हिडियो समोर आले. किनाऱ्यावर माशांचा खच साचल्याचा असाच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्यावर पापलेटचा पाऊस पडला, अशा दाव्यासह हा व्हिडियो शेयर होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडियो भारतातील नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

एका मिनिटांच्या व्हिडियो क्लिपमध्ये समुद्रकिनाऱ्यावर हजारो माशांचा खच साचलेल्याचे दिसते. अनेक लोक हे मासे गोळा करून घरी घेऊन जात आहेत. सोबत दावा केला जात आहे की, रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर असा पापलेटचा पाऊस झाला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

हाच व्हिडियो काही दिवसांपूर्वी गोव्यातील बेतीम किनाऱ्यावरील म्हणून शेयर झाला होता. त्यात म्हटले होते की, “मासेमारीचा हंगाम असून सुद्धा कोणीही बाहेर काढीत नाही. म्हणून मासे-बांगडे आणि पेडवे स्वतःहून बाहेर पडले स्थळ – बेतीम गोवा.”

Face-sd.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

एकच व्हिडियो वेगवेगळ्या ठिकाणांचा म्हणून शेयर होत आहे म्हणजे त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

तथ्य पडताळणी

इन-व्हिड टुलच्या माध्ममातून की-फ्रेम्सची निवड करून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो रायगड किंवा गोवा येथील तर नाहीच; पण तो भारतातीलसुद्धा नाही.

लॅटिन अमेरिकेतील प्रतिष्ठित न्यूजवेबसाईट इन्फोबे (Infobea) वर या व्हिडियोसंबंधी बातमी आढळली. 23 एप्रिल रोजीच्या या बातमीनुसार, मेक्सिकोमधील अकापुल्को शहराच्या किनाऱ्यावर हजारो मासे मृतावस्थेत वाहून आले होते. निसर्गाची ही कीमया पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हे मासे वाहनांमध्ये भरून नेले.

mexico-1.png

मूळ बातमी येथे वाचा – इन्फोबेअर्काइव्ह

टेटोव्हा न्यूजनेदेखील युट्युबवर हा व्हिडियो शेयर केलेला आहे. लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्ये विविध किनाऱ्यांवर अशाप्रकारे मृत मासे वाहून आल्याच्या घटना घडल्या होत्या. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

हे वाचाः पाण्याबाहेर उडी मारून मासे बाहेर पडत असल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे

सदरील व्हिडियो जगभर व्हायरल झाला आहे. एक्सप्रेस यूके वेबसाईटवरदेखील हा व्हिडियो प्रसिद्ध करून म्हटले की, मेक्सिकोच्या अकापुल्को किनाऱ्यावर हे मासे वाहत आले. तुर्कस्थानातील स्टार वेबसाईटनेदेखील हा व्हिडियो मेक्सिकोमधील असल्याचे म्हटले आहे.

Mexico.png

मूळ बातमी येथे वाचा – एक्सप्रेस यूकेअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, किनाऱ्यावर खच साचलेल्या माशांचा हा व्हायरल व्हिडियो मेक्सिकोमधील आहे. चुकीच्या दाव्यासह तो भारतातील विविध शहरांच्या नावे शेयर केला जात आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False