सत्य पडताळणी : छत्रपती संभाजी महाराजांनी तह केला होता का?

Mixture/अर्धसत्य
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही? अशा शीर्षकाचे वृत्त इनमराठी. कॉम या संकेतस्थळाने प्रसिध्द केले आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी एकही तह केला नाही. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

इनमराठी डॉट कॉमने आपल्या फेसबुक पेजवरही ही पोस्ट शेअर केली आहे. या वृत्ताला एक हजार 300 पेक्षा अधिक लाईक्स आहेत. हे वृत्त 278 जणांनी शेअर केले आहे. या वृत्तावर 16 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकीपीडियावर माहिती शोधली असता छत्रपती संभाजी महाराज व हेन्री ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली एक तह झाल्याचे आढळून आले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी अभ्यास करण्यासाठी घेण्यात आलेले संदर्भही विकीपीडियातील या लेखात देण्यात आले आहेत.

आक्राईव्ह लिंक

युटूयूबवरही आम्हाला यासंदर्भात एक व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओत करार आणि तह असे दोन्ही शब्द वापरलेले आढळले आहे.

विकासपीडिया डॉट इन या संकेतस्थळावरही छत्रपती संभाजी महाराजांनी १६८४ च्या सुरूवातीस फोंडे येथे पोर्तुगीजांशी तह केल्याचा उल्लेख आढळतो. या तहाच्या वाटा-घाटीत कवी कलशाची भूमिका मुख्य होती आणि अकबर यास मध्यस्थ नेमले होते,  असेही या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

मराठी विश्वकोशातही छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगाजांशी केलेल्या तहाचा उल्लेख येतो.

आक्राईव्ह लिंक मराठी विश्वकोश

निष्कर्ष

छत्रपती संभाजी महाराजबद्दल इनमराठी डॉट कॉमने दिलेल्या अनेक बाबींमध्ये तथ्य आढळून आले. छत्रपती संभाजी महाराजांनी एकही तह केला नाही ही बाब मात्र असत्य आढळून आली आहे. त्यामुळे हे वृत्त संमिश्र असल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : छत्रपती संभाजी महाराजांनी तह केला होता का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •