युनिसेफच्या नावे कोरोना व्हायरसविषयी खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय

देशभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे 3200 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 77 देशात हा विषाणू आढळला आहे. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमामध्ये युनिसेफच्या नावे सध्या एक मेसेज पसरत आहे. 

त्यामध्ये म्हटले की, ‘‘व्हायरस हवेत स्थिरावत नाही परंतु पृष्ठभागावर राहतो, म्हणून हा हवेद्वारे प्रसारित होत नाही. जर विषाणू 26-27 डिग्री सेल्सिअस तापमानावर आला तर तो ठार होईल, कारण तो उष्ण प्रदेशात राहत नाही. आईस्क्रीमपासून दूर रहाणे आणि थंड पदार्थ खाणे टाळणे महत्वाचे आहे. या सूचनांचे पालन करणे व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.’’

असे अनेक दावे युनिसेफच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये आहेत. गुलाबराव गायकवाड यांनीही हा संदेश फेसबुकवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे दावे किती खरे आहेत आणि युनिसेफने खरोखरच असा काही संदेश जारी केला आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. 

gulabrao Gaikwad.png

फेसबुकवरील मूळ पोस्ट

हाच संदेश व्हॉट्सअपवरून देखील पसरत असल्याचे दिसून आले. फॅक्ट क्रेसेंडोला हा संदेश पाठवून काही जणांची त्याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. 

UNICEF.png

हाच संदेश नितीन सावंत यांनी इंग्रजी भाषेत पोस्ट केला असल्याचेही आम्हाला दिसून आले. इंगजी भाषेत हा संदेश नेमका काय आहे हे आपण खाली पाहू शकता. 

image2.png

फेसबुक मूळ पोस्ट 

तथ्य पडताळणी

युनिसेफने खरोखरच अशी काही माहिती दिली आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही युनिसेफच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी अशी कोणतीही माहिती आम्हाला आढळून आली नाही. त्यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने युनिसेफशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही संदेश जारी केला नसल्याचे सांगितले.

युनिसेफने अशाच प्रकारचा संदेश इंग्रजीत पसरत असल्याने त्याबाबत दिलेले स्पष्टीकरण आम्हाला दिसून आले. या संदेशात स्पष्टपणे युनिसेफने अशी कोणतीही माहिती व्हॉट्सअप संदेशाद्वारे पसरवली नसल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे.

Archive

त्यानंतर युनिसेफने ट्विटरवर कोरोना व्हायरसपासून कसा बचाव करावा, याची खालील माहिती दिली असल्याचे आम्हाला दिसून आले. 

Archive 

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीतून व वेगवेगळ्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खालील बाबी आतापर्यंत स्पष्ट झाल्या. व्यक्ती खोकल्यावर उडणाऱ्या तुषारातून हा विषाणू पसरु शकतो. असे तुषार उडालेल्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श केल्यास आणि तो स्पर्श त्याने चेहरा, डोळा आणि तोंडाला केल्यास त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. 

कोरोना विषाणू नेमक्या किती तापमानाला नष्ट होतो, याबद्दल दुमत आहे. अनेक उष्ण कटिबंधीय देशातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नियमित गरम पाणी पिल्याने अथवा आईस्क्रीम अथवा थंड पदार्थ टाळल्यास कोरोनापासून बचाव होतो, हे अद्याप सिध्द झालेले नाही. कोरोनाच्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी मास्क घालणे अत्यावश्यक आहे.  

यातून हे स्पष्ट झाले की, युनिसेफने समाजमाध्यमात पसरत असलेला वरील संदेश जारी केलेला नाही.

निष्कर्ष 

युनिसेफच्या नावाने समाजमाध्यमात पसरत असलेला वरील संदेश युनिसेफने जारी केलेला नाही. युनिसेफने फॅक्ट क्रेसेंडोला हा संदेश आपला नसल्याचे सांगितले आहे.

Avatar

Title:युनिसेफच्या नावे कोरोना व्हायरसविषयी खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False