FACT CHECK: मध्यप्रदेशमध्ये सरकारी शाळेत राहुल गांधींमुळे मिनरल बॉटल वाटण्यात आल्या का?

False राजकीय | Political

मध्यप्रदेशमध्ये रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जेवण केले; पण शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे साधे पाणी प्यावे लागू नये म्हणून शाळेने मिनरल पाण्याच्या बॉटल वाटप केल्या, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यासाठी राहुल गांधी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत जेवण करतानाचा एक फोटोदेखील दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्यता पडताळली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये म्हटले की, हे नाही सुधारणार. मी तर आजपर्यंत कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बिसलेरीचे पाणी देताना पाहिले नाही. बिचारे राहुल गांधी करायला जातात एक आणि होतं काही वेगळच. हा फोटो मध्यप्रदेशमधील सरकारी शाळेतील असल्याचे म्हटले आहे.

तथ्य पडताळणी

फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर झी न्यूज वेबसाईटवरील 13 डिसेंबर 2015 रोजी एक बातमी आढळली. या बातमीत खाली दिलेला फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शननुसार आसाममधील बारपेट येथे शाळकरी मुलांसोबत राहुल गांधी यांनी भोजन केले.

मूळ बातमी येथे वाचा – झी न्यूजअर्काइव्ह

हा धागा पकडून मग राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटवर अ‍ॅडव्हान्स सर्चद्वारे पुढील ट्विट आढळले. यामध्ये लिहिले की, बारपेटा येथील एका शाळेत मुलांसोबत जेवण केले. बालमजुरीच्या कचाट्यातून सुटून शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुलं पाहून आनंद झाला. 12 डिसेंबर 2015 रोजी राहुल गांधी यांनी हा फोटो ट्विट केला होता.

अर्काइव्ह

काँग्रेस पक्षाचे केरळमधील आमदार आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे (एनएसयूआय) माजी अध्यक्ष रोजी एम. जॉन यांनीसुद्धा 11 डिसेंबर 2015 रोजी ट्विट करून राहुल गांधी शाळकरी मुलांसोबत संवाद साधतानाचा फोटो शेयर केला होता. पदयात्रेदरम्यान राहुल गांधीनी बारपेटामधील या शाळेला भेट दिली होती.

अर्काइव्ह

एनएसयूआय आसामच्या ट्वटिर हँडलवरूनदेखील या पदयात्रेमध्ये राहुल गांधी बारपेटा येथे रॅलीला संबोधित करतानाचा फोटो शेयर करण्यात आला होता.

अर्काइव्ह

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर या पदयात्रेबद्दल माहिती दिलेली आहे. यानुसार, 11 व 12 डिसेंबर 2015 रोजी राहुल गांधी आसामच्या दोनदिवसीय दौऱ्यावर गेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रम व पदयात्रा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी पुनर्वसनातून बालमजुर सोडून शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या 100 विद्यार्थ्यांसोबत त्यांनी दुपारचे जेवण केले होते.

मूळ लेख येथे वाचा – काँग्रेस वेबसाईटअर्काइव्ह

निष्कर्ष

वरील पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, हा फोटो मध्यप्रदेशमधील नसून चार वर्षांपूर्वी आसाममध्ये काढलेला आहे. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:FACT CHECK: मध्यप्रदेशमध्ये सरकारी शाळेत राहुल गांधींमुळे मिनरल बॉटल वाटण्यात आल्या का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False