सत्य पडताळणी : 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर टोल भरू नये?

False
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

(सांकेतिक छायाचित्र: सौजन्य डीएनए)

टोलनाक्यावर तुम्हाला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर टोल भरु नये, असे वृत्त khaasre.com या संकेतस्थळाने दिले आहे. पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर असलेली वाहने मोफत सोडावीत, असा नियमही या वृत्तात सांगण्यात आला आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. हे वृत्त 9 हजार 700 हून अधिक वेळा या संकेतस्थळावरुन शेअर झाले आहे.

आक्राईव्ह लिंक

खासरे डॉट कॉमच्या फेसबुक पेजवरुनही हे वृत्त शेअर करण्यात आले आहे. या वृत्ताला या पेजवर 1 हजार 400 हून अधिक लाईक्स आहेत. फेसबुकवरुन ही पोस्ट 345 वेळा शेअर झाली आहे. यावर 29 जणांनी आपली प्रतिक्रियाही नोंदवली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतचे एक खुलासा आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. या पत्रानुसार असा कोणताही नियम अस्तित्वात नसल्याचे लक्षात येते.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पत्र

फायनाश्यल एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही 21 जुलै 2017 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तातही असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आक्राईव्ह लिंक

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकातही असा कोणताही नियम नसल्याचे दिसून येत आहे.

खासरेने दिलेल्या या वृत्तावर अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रतिक्रियेत त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे मत मांडले आहे. आपण खाली याबाबतचा संक्षिप्त स्वरुपाचा व्हिडिओ पाहू शकता.

निष्कर्ष :टोलनाक्यावर तुम्हाला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर टोल भरु नये.  असा कोणताही नियम अस्तित्वात असल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत आढळून आले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर टोल भरू नये?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •