Fact Check : गायक किशोर जावळे यांचा अपघाती मृत्यू झाला का?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सुप्रसिध्द गायक किशोर जावळे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमलेश पाटील यांनी ?गेले ते दिवस राहिल्या त्या, फक्त आठवणी? या ग्रुपवर ही पोस्ट शेअर केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

सुप्रसिध्द गायक किशोर जावळे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे का याची माहिती घेण्यासाठी किशोर जावळे अपघाती निधन असे शोधले असता आम्हाला गायक किशोर जावळे यांचा युटूयूबवरील खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत त्यांनी आपल्याला काहीही झाले नसून बॅन्जो गाडीला झालेल्या अपघातात किशोर गायकवाड यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

दैनिक प्रहारच्या संकेतस्थळाने या अपघाताचे सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तात त्यांनी किशोर गुलाब गायकवाड ( वय 35, रा तेलंगशी ) यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. किशोर जावळे हे या अपघातात जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रहार / Archive

निष्कर्ष

जातेगाव फाटा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात किशोर गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. किशोर जावळे या अपघातात जखमी झाले होते. ते आता सुखरुप आहेत. त्यांनी स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत किशोर जावळेंच्या मृत्यूची पोस्ट खोटी असल्याचे आढळून आले आहे.  

Avatar

Title:Fact Check : गायक किशोर जावळे यांचा अपघाती मृत्यू झाला का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •