
जेएनयूतील शुल्कवाढ कमी करा म्हणून आंदोलन करणाऱ्यांना रक्तबंबाळ करुन सोडण्यात येत आहे, असा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल करण्यात येत आहे. पुरोगामी-Forward Thinking या पेजवरही असाच एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
या छायाचित्राची सत्यता जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. इंटरनेटवर गेल्या कित्येक वर्षांपासून हा फोटो उपलब्ध आहे. जाफरिया न्यूज या संकेतस्थळावरील 20 फेब्रुवारी 2005 रोजीच्या एका लेखात हा फोटो वापरण्यात आलेला आहे.
लेखातील माहितीनुसार, हे छायाचित्र लेबनानमधील आहे. मोहरमच्या महिन्यातील दहाव्या दिवशी ‘आशुरा’ असतो. त्या दिवशी निघणाऱ्या मिरवणूकीतील हा फोटो आहे. यामध्ये मुस्लिमबांधव अणकुचीदार वस्तूने स्वतःला इजा पोहचवून प्रेषितांना अभिवादन करतात.
मूळ पोस्ट येते वाचा – जाफरिया न्यूज । Archive
सदरील फोटोचे बारकाईने लक्ष दिल्यावर दिसते की, मागच्या बाजूस असणाऱ्या इमारतीवर अरेबिक भाषेतील एक बोर्ड लावलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अरेबिक भाषांतरकाराने त्याचा अनुवाद “बैतुल हुदा” असा सांगितला. त्याचा अर्थ मार्गदर्शन किंवा ज्ञानाचे घर याच्या जवळ आहे. त्यानुसार, ही एक शाळा किंवा ग्रंथालय असावे. तसेच भारतात अरेबिक भाषेतून बोर्ड लावण्याचा प्रश्नच नाही.
निष्कर्ष
छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनय़ूमधील विद्यार्थिनी नाही. 14 वर्षापूर्वी लेबनानमध्ये मोहरमच्या कार्यक्रमातील हा फोटो आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेली ही जेएनयूतील विद्यार्थिनी आहे, हा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Title:Fact : लेबनानमधील फोटो जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
