ही बनावट काजू तयार करण्याची मशीन नाही; वाचा या व्हिडियोमागील सत्य

False सामाजिक

बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ ही गंभीर समस्या आहे. सणोत्सवाच्या काळात तर हे गैरप्रकार अधिक वाढतात. बनावट काजू तयार करण्याची मशीन म्हणून एक व्हिडियो सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा आहे.

काय आहे व्हिडियोमध्ये?

व्हायरल क्लिपमध्ये मशीनद्वारे काजूच्या आकाराचे पदार्थ बाहेर पडत असल्याचे दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, बनावट काजू तयार करण्याची ही मशीन आहे. अनेकांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

बनावट काजूचे मशीन म्हणून हा व्हिडियो फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडियोखाली रमेश घाग नावाच्या एका युजरने कमेंटमध्ये म्हटले की, हा व्हिडियो काजूच्या आकाराचे नमकीन तयार करणाऱ्या मशीनचा आहे. ही काही बनवाट काजू उत्पादनाची मशीन नाही. या व्हिडियोद्वारे चुकीची माहिती पसरविली जात असल्यामुळे काजू काउन्सिल ऑफ इंडियाकडे यासंदर्भात तक्रार केल्याचेही त्यांनी कमेंटमध्ये नमुद केले.

मूळ कमेंट येथे पाहा – फेसबुक 

हा धागा पकडून मग आम्ही अधिक सर्च केले. त्याद्वारे कळाले की, या मशीनला काजू निमकी किंवा काजू नमकीन मशीन असे म्हणतात. याचे अनेक व्हिडियो युट्यूबवर उपलब्ध आहेत. उदाहरण म्हणून तुम्ही खाली पाहू शकता. चोटीवाला फुड्स व मशीन या कंपनीतर्फे या मशीनची निर्मिती करण्यात येते.

काजू निमकी/नमकीन हा दिवाळी फराळाचा एक प्रकार आहे. आपल्याकडी शंकरपाळ्याप्रमाणे तो असतो. त्याची पाककृती तुम्ही येथे वाचू शकता. काजू निमकी तयार करतानाचे फोटो आपण खाली पाहू शकता. मैद्याच्या पोळीपासून काजूच्या आकारात काप केले जातात. हेच काम वरील मशीन करते.

मूळ फोटो येथे पाहा – मायेका

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडियो बनावट काजू तयार करण्याच्या मशीनचा नाही. ही काजूच्या आकाराचे नमकीन तयार करण्याची मशीन आहे. त्यामुळे व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:ही बनावट काजू तयार करण्याची मशीन नाही; वाचा या व्हिडियोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False