
हरियाणाची प्रसिध्द गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी हिने चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा कलाकार होऊन कला विकणे कधीही चांगले, असे वक्तव्य केल्याचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबुकवरील सुप्रिया सुळे एफसी या पेजवर याबाबतची एक पोस्ट आहे. या पोस्टला दोन हजार 500 लाईक्स आहेत. या पोस्टवर 89 जणांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हे वक्तव्य 76 जणांनी शेअरही केले आहे.
तथ्य पडताळणी
टाईम्स नाऊ हिंदीने सपना चौधरीच्या एका वक्तव्याचे वृत्त 14 मार्च 2019 रोजी दिले आहे. सपना चौधरी यांनी मोदी जी आप तो केवल ‘प्रेरित’ करते हैं भाजपा को वोट देने के लिए, लेकिन राहुल गांधी ‘मजबूर’ कर देते हैं भाजपा को वोट डालने के लिए।, असे म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. हे ट्विट नंतर सपना चौधरी यांनी काढून टाकल्याचेही यात म्हटले आहे.

न्यूज 18 हिंदीने सपना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्ल केलेल्या एका वक्तव्याचे वृत्त दिले आहे. या वक्तव्यात तिने कुठेही चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा कलाकार होऊन कला विकणे कधीही चांगले, असे म्हटलेले नाही. सपना चौधरीने नंतर आपले हे वक्तव्य मागे घेतले आहे.

गुगलवर याबाबत सर्च केले असता दैनिक सकाळने सपना चौधरीने चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा कलाकार होऊन कला विकणे कधीही चांगले असे वृत्त आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले, होते असे दिसून येते.

आम्ही हे वृत्त सविस्तर जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक केले असता सकाळने या वृत्ताची लिंक काढून टाकली असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

सपना चौधरी यांच्या ऑफिशल फेसबुक अकाऊंटवरही तिने केलेले असे कोणतेही वक्तव्य आढळून येत नाही.
निष्कर्ष
हरियाणाची प्रसिध्द गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी हिने चौकीदार होऊन देश विकण्यापेक्षा कलाकार होऊन कला विकणे कधीही चांगले, असे वक्तव्य केल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य आढळून आले आहे.

Title:सत्य पडताळणी : सपना चौधरीने केली पंतप्रधान मोदींवर टीका?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
