आंदोलक शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी भारतीय झेंडा पायदळी तुडविला का? वाचा सत्य

False राजकीय

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय झेंडा पायदळी तुडवितानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, शेतकऱ्यांनी तिरंग्याचा असा अपमान केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले का हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे.

काय आहे दावा? 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक शीख व्यक्ती भारतीय झेंड्यावर उभा राहुन ‘खालिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत आहे. तसेच तो भारतीय संविधानाचे मुखपृष्ठदेखील फाडतो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्य हिंसाचारादरम्यानचा आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केल्याचे आढळले. व्हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका युजरला संदीप चॅटर्जी नावाच्या एका युजरने उत्तर दिले की, व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव अमनवीर सिंग असून, तो अमेरिकत असतो. तसेच त्यांच्या मूळ टिकटॉक व्हिडिओसुद्धा चॅटर्जी यांनी ट्विट केला.

अर्काइव्ह

संदीप चॅटर्जी यांनी ट्विटमध्ये हा व्हिडिओ कुठे चित्रित करण्यात आला त्याचा पत्ता (7609 Wilbur Way, Sacramento, CA, USA 95828) दिलेला आहे. 

गुगल मॅपच्या सहाय्याने व्हिडिओचे अचूक स्थान शोधण्यात यश मिळाले. गुगल स्ट्रीट व्ह्युवमध्ये व्हिडिओतील इमारत स्पष्ट दिसते.

खाली दिलेल्या तुलनेत स्पष्ट दिसते की, व्हायरल व्हिडिओतील इमारत आणि हिरवी जाळी दिसते. सर्वात उजवीकडील स्क्रीनशॉटमध्ये हा व्हिडिओ जेथे चित्रित झाला होता तेथील जागा आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हिडिओ दिल्ली किंवा भारतातील नाही. हा व्हिडिओ अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील आहे. हा व्यक्ती खलिस्तान समर्थक आहे. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा पायदळी तुडवला हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:आंदोलक शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी भारतीय झेंडा पायदळी तुडविला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False