Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

लोक म्हणतात पोलीस जाणूनबुजून गाडी थांबवतात, आता याला काय म्हणणार जनता अशी माहिती Rkboss Kulkarni आणि चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

मूळ फेसबुक पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. तेव्हा आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला आणि त्यातील पोलिसांचा गणवेश नेमका कुठला आहे. हे शोधण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीर सरकारच्या संकेतस्थळास भेट दिल्यावर हा गणवेश तेथील पोलीस कर्मचाऱ्यांचा नसल्याचेही आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही आमचा शोध  आणखी पुढे नेल्यावर आम्हाला द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकातील 21 एप्रिल 2015 चे वृत्त दिसून आले. या वृत्तातील पोलिसांचा गणवेश हा व्हिडिओतील पोलिसांच्या गणवेशाशी मिळताजुळता असल्याचे दिसून आले. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक हजार सुरक्षारक्षकांना शाळेच्या सुरक्षेसाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पोलिसांनी प्रशिक्षण दिल्याचे हे वृत्त आहे. यातून एक बाब स्पष्ट झाली की हे पोलीस पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील असण्याची शक्यता आहे. खैबर पख्तूनख्वा पोलिसांच्या फेसबुक पेजला भेट दिल्यावर ही बाब अधिकच स्पष्ट झाली. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला असता आम्हाला खैबर पख्तूनख्वा पोलिसांबाबतचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात कोहाट येथे पोलिसांनी काही तस्करांना अटक केल्याचे म्हटले आहे. 

कोहाट पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची पोस्ट केल्याचे दिसून येते. 

निष्कर्ष

हा व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानमधील आहे. हा व्हिडिओ जम्मू काश्मीरमधील आणि भारतातील असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False