कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलेले ते इटलीचे पंतप्रधान नाहीत. वाचा त्या फोटोमागचे सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय

इटलीमध्ये कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना या देशातील भयावह स्थिती सांगण्यासाठी नेटीझन्स सोशल मीडियावर खोट्या आणि असंबंधित फोटो/व्हिडियोचा मदत घेत आहेत. सध्या चर्चेचा विषय ठरलेला असाच एक फेक फोटो म्हणजे कोरोनामुळे हतबल झालेल्या इटलीच्या पंतप्रधानांचा. डोळे पाणावलेल्या एका नेत्याचा फोटो इटलीचे पंतप्रधान म्हणून सर्रास पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा सिद्ध झाला आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

एक साधं गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, हा फोटो इटलीच्या पंतप्रधानांचा नाही. हा फोटो ब्राझीलचे राष्ट्रपती जेईर बोल्सोनारो आहेत.

एका ब्राझीलीयन वेबसाईटवरील 17 डिसेंबर 2019 रोजीच्या बातमीनुसार, हा फोटो थँक्सगिविंग कार्यक्रमातील आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी यावेळी केलेल्या भाषाणात त्यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याची आठवण सांगताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. हा त्यावेळीचा फोटो आहे.

bolsonaro.png

मूळ बातमी येथे वाचा – पॉडर 360

या भाषणाचा व्हिडियोदेखील युट्यूबवर उपलब्ध आहे. यातून स्पष्ट होते की, हा फोटो इटलीच्या पंतप्रधानांचा नाही. हा ब्राझीलच्या राष्ट्रपतीचा फोटो आहे. कडव्या उजव्या सरणीचे बोल्सोनारो यांनी कोरोना विषाणूचा धोका हा केवळ मीडियाने तयार केलेला भ्रम आहे, असे विधान केले आहे. ही केवळ साधारण ताप असून लोकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा त्यांचा तर्क आहे. 

मग इटलीचे पंतप्रधान कोण?

इटलीच्या पंतप्रधानांचे नाव गिसीपी  कांटे आहेत. 1 जून 2018 पासून ते इटलीचे पंतप्रधान आहेत. सध्या इटलीमध्ये कोरोना विषाणूची बाधा होऊन सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या बळींच्या बाबतीत इटलीने चीनलादेखील मागे टाकले आहे.

http___com.ft.imagepublish.upp-prod-us.s3.amazonaws.jpg

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो इटलीच्या पंतप्रधानांचा नाही. हा फोटो ब्राझीलच्य राष्ट्राध्यक्षाचा आहे. कोरोना संबंधी कोणतीही माहिती, फोटो, व्हिडियो सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नये. असे शंकास्पद मेसेज तुमच्याकडे आल्यास ते फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलेले ते इटलीचे पंतप्रधान नाहीत. वाचा त्या फोटोमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False