Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?

False राजकीय | Political राष्ट्रीय सामाजिक

गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला असे वृत्त मुलनिवासी नायक डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. MN News – Marathi या पेजवर ही या वृत्ताची पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला झाले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम अशी काय घटना घडली का याचा शोध घेतला तेव्हा खालील परिणाम आम्हाला मिळाला.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गोध्रात अशी घटना घडली असल्याचे दिसून येते. त्यानंतर आम्ही या वृत्ताचे तथ्य जाणून घेण्यासाठी गोध्रा पोलिसांची संपर्क केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 14 मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार रात्री अडीच वाजता दाखल करण्यात आली. ही तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक यांनी हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरु केला. या घटनेची सत्यता जाणण्यासाठी पंचमहलच्या पोलीस अधिक्षक लीना पाटील यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने 2 ऑगस्टला सकाळी संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ही माहिती सगळ्यात पहिल्यांदा शाहनवाज नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरुन शेअर केली. एका वादाला धार्मिक रंग देण्यासाठी हे ट्विट करण्यात आले. ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. या प्रकरणात FIR दाखल करण्यात आला आहे. तिघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या घटनेतील सगळे जण एकमेकांना ओळखणारे आहेत. त्यांच्या या वादात एक युवक जखमी झालेला आहे. ट्विटमध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. आज संध्याकाळी तपासातील सर्व बाबी आपल्याला सांगण्यात येतील.  पोलीस उपअधिक्षक आर. आय. पटेल यांनी 2 ऑगस्ट रोजी दुपारी या घटनेबाबत सांगताना ही वाहनांच्या ओव्हरटेकमधुन ही घटना घडल्याचे सांगितले. ते नेमके काय म्हणाले हे आपण खालील व्हिडिओ पाहू शकता. 

पोलिसांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातही ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे की, दुचाकी ओव्हरटेक करण्यातून हा वाद झालेला या घटनेत जय श्रीराम बोलण्यास सांगितलेले नाही. 

पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले आहे. या फुटेजमध्ये दुचाकीवरुन खाली उतरुन तीन तरुणांना मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. 

या घटनेबद्दल चुकीची माहिती पसरत असल्याने पोलीस अधिक्षक लीना पाटील यांनी सांगितले. पूर्ण घटना दुचाकी ओव्हर टेकमुळे झाली होती आणि जय श्रीराम बोलण्यास भाग पाडण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले. घटनेची फिर्याद घेण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी अल्पवयीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

निष्कर्ष 

गुजरातमधील गोध्रा येथे जय श्रीराम बोलण्यासाठी युवकांना मारहाण झालेली नाही. याप्रकरणी फिर्याद दाखल झालेली असून दुचाकीच्या ओव्हरटेकमधून झालेल्या वादातून युवकांना मारहाण झालेली आहे. पोलीस अधिक्षक लीना पाटील यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट असत्य आढळली आहे.

( 3 ऑगस्टची पोलीस अधिक्षकांची प्रतिक्रिया अपडेट करण्यात आलेली आहे. )

Avatar

Title:Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False