तथ्य पडताळणी : नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत का?

Mixture/अर्धसत्य राजकीय

नायजेरियन नागरिक अतिरेकी आणि नक्षलवाद्यांपेक्षा घातक असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. ही पोस्ट 5 हजार 300 जणांनी शेअर केली आहे. या पोस्टला 2 हजार 600 लाईक्स आहेत.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत, असा दावा पोस्टकर्त्याने केला आहे. त्यामुळे नायजेरियन नागरिक खरंच भारतात आहेत का? ते नेमके काय करतात, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला बीबीसीचे 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात आफ्रिकन नागरिकांना भारतात भेदभावपूर्ण वागणूक मिळत असल्याचे म्हटले आहे. अंमली पदार्थांचा व्यापार केल्याच्या संशयावरुन आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोपही या वृत्तात एका नायजेरिन नागरिकाने केला आहे. या नायजेरिन नागरिकाने एका भारतीय मुलीशी विवाह केलेला आहे.

अक्राईव्ह

नायरेयिन नागरिकांची नेमकी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला द हिंदू या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात नायजेरियन नागरिक कुठल्या प्रकारचे गुन्हे करतात आणि का करतात याचा उल्लेख दिसून येत आहे. मुंबईतील मीरा रोड आणि नालासोपारा या भागात हे नागरिक राहत असून त्यांची संख्या 10 ते 12 हजार असण्याची शक्यताही या वृत्तात वर्तविण्यात आली आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे ते राहतात. याखेरीज मोबाईल चोरी, अंमली पदार्थांचा व्यापार ते करतात, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी सेलने या वृत्तात दिली आहे.  

अक्राईव्ह

द संडे गार्डियन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तातही नायजेरिन नागरिक कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात सामील असतात याची माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि संकेतस्थळावरील बातम्या पाहिल्या असता फसवणुकीच्या गुन्ह्यात ते असल्याचे दिसून येते. हिंदू जनजागरण समितीने नायजेरिन नागरिकांविरोधात नालासोपाऱ्यात आंदोलन केल्याचेही एका वृत्तात दिसून येते. punchng.com या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार अंमली पदार्थाच्या तस्करीत नायजेरियन नागरिक सर्वात जास्त संख्येने दिसून आले आहे. इंडिया टूडेने पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

अक्राईव्ह  

नायजेरिन नागरिक भारतात अंमली पदार्थांची तस्करी व अन्य काही गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे दिसते. त्यामुळे आम्ही ते दहशतवादी कारवायांमध्ये गुंतले आहेत का? याचा शोध घेतला. त्यावेळी बीबीसीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार बोको हराम ही संघटना नायजेरियात दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

नायजेरियात विविध दहशतवादी गट आणि संघटना कार्यरत असल्या तरी भारतात दहशतवादी कारवायांमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून येत नाही. त्यामुळे नायजेरियन नागरिक हे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत, असे म्हणता येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोला हे वृत्त संमिश्र स्वरुपाचे आढळले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture