सोलापूर विमानतळावरील आगीचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

कोरोना विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2020 रोजी दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोलापुरात काही नागरिकांनी फटाके फोडले. त्यामुळे सोलापूर विमानतळाला आग लागली. या आगीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोलापूर विमानतळावर 5 एप्रिल 2020 रोजी लागलेल्या आगीचाच आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading

COVID 19 : मध्यप्रदेशातील मॉक ड्रीलचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, अहमदनगर येथील सामान्य रुग्णालय, परभणी येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका […]

Continue Reading

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी 50 हजार कोटी दान केले का? वाचा सत्य

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. अझीम प्रेमजी यांनी खरोखरच कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केले आहेत का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे […]

Continue Reading

महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान वाईन शॉप उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय का? वाचा सत्य

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने वाईन शॉप दुपारी 3 ते 4 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचा टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचा एक स्क्रीनशॉट सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू असताना महाराष्ट्र सरकारने खरोखरच असा काही निर्णय घेतलाय का याची तथ्य पडताळणी फॅक्ट […]

Continue Reading

हैदराबादला शुक्रवारच्या नमाजसाठी संचारबंदीचे उल्लंघन करण्यात आले का? वाचा सत्य

देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू असतानाही हैदराबादमध्ये चारमिनार परिसरातील मक्का मशीद परिसरात शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले होते. या नागरिकांना देशहिताचे काहीही देणे-घेणे नाही, असे म्हणत समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुनील सातपुते यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ कोरोना विषाणूचा […]

Continue Reading

प्रखर सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

प्रखर सूर्यप्रकाश कोरोना विषाणू नष्ट करतो, असा दावा सध्या समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. प्रखर सूर्यप्रकाश (UV rays) च्या सानिध्यात कोरोना व्हायरस टिकाव धरू शकणार नाही. दरवर्षी साधारण 13 मे च्या आसपास पुण्यात झिरो शेडो (shadow) डे असतो. म्हणजे सूर्याची किरणे 90° मध्ये भूतलावर पडतात. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने 13 मे नंतर पुणे भागात कोरोना व्हायरस गायब […]

Continue Reading

इटलीने कोरोना व्हायरसपुढे शरणागती पत्करली का? वाचा सत्य

इटली सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडे कोरोना विषाणूपुढे शरणागती पत्करली आहे. आम्ही देशातील कोणत्याच नागरिकाला वाचवू शकत नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ, वसंत नाडकर्णी यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी इटलीने जागतिक आरोग्य संघटनेला आपण […]

Continue Reading

अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला का? वाचा सत्य

अभिनेता अक्षयकुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. यासोबत असणाऱ्या छायाचित्रात अभिनेता अक्षयकुमार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्याने अशी मदत केली आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची […]

Continue Reading

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्यांचे हे छायाचित्र नाही. वाचा सत्य

जगभर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत दहा हजारहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे इटलीत झाले आहेत. त्यातच इटलीत सुरू असणारे मृत्यूचे तांडव म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे पसरत आहेत. असेच इटलीतील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्यांच्या शवपेट्याचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. शिवाजी जाधव यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत जगातील सर्वोत्तम […]

Continue Reading

राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का? वाचा सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेळीपालन करणाऱ्यांमध्ये सध्या एका व्हिडिओमुळे चिंता आहे. राजस्थानमध्ये शेळ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. ही बाब सत्य आहे की अफवा याबाबतची विचारणाही अनेकांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ कराड यांनी राजस्थानमधील अजमेर येथे शेळ्यांना महामारीची लागण झाल्याचे म्हटले आहे तर रशीद अहमद चौधरी […]

Continue Reading

CoronaVirus: हात धुण्यासाठी तुरटीचा वापर सॅनिटायझरपेक्षा प्रभावशाली आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स किंवा साबणाचा पर्याय WHO ने सुचविला आहे. परंतु, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हात धुण्यासाठी सॅनिटायझरपेक्षा तुरटी जास्त प्रभावशाली आहे. तुरटीच्या मुळे कोणताही विषाणू अंगावर राहत नसल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडो या […]

Continue Reading

सतत गरम पाणी पिल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

गरम पाण्याने किंवा व्हिनीगरच्या गरम पाण्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ गुळण्या केल्यास व गरम पाणी सतत पिल्यास कोरोनाचा विषाणू पळून जातो, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. विशाल मोरे यांनीही अशीच माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.   फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी सतत गरम पाणी पिल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो […]

Continue Reading

डॉ. अनिल पाटील यांचे दावे योग्य आहेत का? वाचा सत्य

कोरोना विषाणूमुळे भारतीयांना कोणतीही भिती नसून या विषाणूला गांभीर्याने घेऊ नये, असे सांगणारा डॉ. अनिल पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलाखत पाहून नागरिक स्वत:कडे दुर्लक्ष करु शकत असल्याचे म्हटलं जातंय. बिइंग मराठी आदींनी ही मुलाखत पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  Archive तथ्य पडताळणी […]

Continue Reading

आरोग्य मंत्रालयाचा बनावट आदेश समाजमाध्यमात व्हायरल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात एक मोठा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र, गुजरात उत्तर प्रदेश आणि सिक्कीमला हा नवा आदेश लागू करण्यात येतोय. जिथे दहापेक्षा अधिक लोक जमू शकतात. तिथे हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांना हा आदेश लागू असणार आहे. ही ठिकाणे तात्पुरती बंद करण्याचे आली आहेत. […]

Continue Reading

कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी समाजमाध्यमात सध्या वेगवेगळे संदेश पसरत आहेत. कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आणि यामुळे तुमचा बचाव होतो. कोरोना विषाणूवर भिमसेनी कापूर हा उपाय आहे, अशा स्वरुपाचे हे संदेश आहेत. बाळा अमृते यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने खरोखरच कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का याची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

मुंबई-पुणे महामार्गावरील म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानमधील

मुंबई-पुणे महामार्गावर लिची आणि सफरचंद रंग लावून विकले जात आहेत. त्यामुळे या महामार्गावर विकली जाणारी फळे खाऊ नयेत अथवा ती खात्री करुनच विकत घ्यावी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सलीम अन्सारी, मनोज पवार आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटलंय का? वाचा सत्य

भारतात कर्नाटकात कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने म्हटल्याचा दावा करत समाजमाध्यमात सध्या माहिती पसरत आहे. कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी. कोरोना या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. कर्नाटक सरकारने गुलबर्गा येथील आरोग्यधिकाऱ्यांना […]

Continue Reading

‘एबीपी न्यूज’चा लोगो वापरून उस्मानाबादमध्ये कोरोनासंदर्भात अफवा

उस्मानाबाद सिविलमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण असल्याचा एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो असलेले एक ग्राफिक सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. उस्मानाबादमध्ये खरोखरच कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे का? त्याला उस्मानाबाद सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे का? एबीपी न्यूजने असे वृत्त दिले आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. सुमित उगले यांनी हे ग्राफिक […]

Continue Reading

महाराष्ट्रात गुटख्यात कोरोनाचा विषाणू सापडला का? वाचा सत्य

पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. जगभरातील 105 देशात एक लाख दहा हजारहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात गुटख्यामध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. 123 धाराशीव न्यूज या पेजवरही असाच संदेश पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. […]

Continue Reading

भारतात असणाऱ्या मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उंची दुकान फिकी पकवान असे म्हणत आज “मॅकडोनाल्ड्स” असं म्हणत आनंद राऊत, सुहास भुवड, प्रशांत नंदा आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य पडताळणी हा व्हिडिओ चार स्वतंत्र व्हिडिओंद्वारे बनलेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही या व्हिडिओचे […]

Continue Reading

हा फतवा देवबंद दारुल उलूमचा आहे का? वाचा सत्य

सहारनपूर येथील देवबंद दारुल उलूमचा एक फतवा सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. मौलाना गयूर शेख यांच्या नावाने हा फतवा फिरत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचा हा फतवा आहे. मोहन माळी यांनी असल्या प्रवृत्तीना मुळा सकट ठेचण देशहिताच आहे ,अश्या लोकामुळे सामाजिक भाईचारा धोक्यात आला आहे ,हे देशास घातक ठरेल ,जातीचा अभिमान असावा पण […]

Continue Reading

मद्यपान हे कोरोनापासून बचावासाठी योग्य प्रतिबंधक उपाय आहे का?

देशभरात आतापर्यंत कोराना व्हायरसचे 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे हजारो जणांना याची बाधा झाली असून 3280 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 95 हजार 270 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमातही वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातील एक दावा मद्यपान केल्याने कोरोनापासून बचाव होत असल्याचा आणि तो प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा […]

Continue Reading

युनिसेफच्या नावे कोरोना व्हायरसविषयी खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

देशभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे 3200 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 77 देशात हा विषाणू आढळला आहे. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमामध्ये युनिसेफच्या नावे सध्या एक मेसेज पसरत आहे.  त्यामध्ये म्हटले की, ‘‘व्हायरस हवेत स्थिरावत नाही परंतु पृष्ठभागावर राहतो, म्हणून हा हवेद्वारे प्रसारित होत नाही. जर विषाणू 26-27 डिग्री सेल्सिअस तापमानावर आला […]

Continue Reading

एक हजाराची ही नवी नोट बाजारात येत आहे का? वाचा सत्य

रिझर्व्ह बँकेने एक हजाराची नवी नोट बाजारात आणली आहे म्हणून सध्या समाजमाध्यमात दोन छायाचित्रे पसरत आहेत. हा या नोटेचा पुढील आणि मागील भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. परखड संतोषदादा समर्थ आणि रामभरोस चव्हाण यांनीही ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. रिझर्व्ह बँकेने खरोखरच एक हजाराची नवी नोट बाजारात आणली आहे का? आणली असल्यास त्या नोटेचीच ही […]

Continue Reading

दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल तस्करीचा जुना व्हिडिओ व्हायरल? वाचा सत्य

तुपाच्या डब्यातून पिस्तुलांची तस्करी करण्याचा एक व्हिडियो शेयर करून दिल्लीमध्ये मुस्लिम नागरिक अशाप्रकारे हत्यारे आणत असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो शेयर होत असल्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडियोवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळमी केल्यावर कळाले की, या व्हिडियोचा दिल्ली दंगलीशी काहीच संबंध नाही. काय आहे दावा? तुपाच्या डब्यात […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात का? वाचा सत्य

ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकतात व खातात, असा दावा करत हेमंत बागल यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायी आणि बैलाचे मांस विकतात का, या माहितीची तथ्य प़डताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर […]

Continue Reading

पनवेलमध्ये ‘लव्ह जिहाद’ पुकारण्यात आल्याचा दावा खोटा, वाचा सत्य

‘लव्ह जिहाद’बाबतचे रेट कार्ड असल्याचा दावा करत सध्या समाजमाध्यमात सांजा लोकस्वामी या दैनिकाचे कात्रण व्हायरल होत आहे. हे खरं आहे ..पनवेल मध्ये खूप मुस्लिम अटक केलेत..एक मोठ्ठं रॅकेट होत..पण अजूनही किती निरागस हिंदू मुली बळी गेल्यात त्यांना ..देशाबाहेर पाठवण्यात आले….अजूनही तुम्ही जागे होणार नाही.. तुमची मुलगी बहीण..जेव्हा जाईल तेव्हा डोळे उघडतील का… अशा माहितीसह स्मिता […]

Continue Reading

नील आर्मस्ट्राँग यांनी धर्मांतर केले होते का? वाचा सत्य

चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता, माध्यमांनी आणि अमेरिकेने ही माहिती लपवली. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी याबाबतचे एक छायाचित्र ट्विट केले आहे, अशा माहितीसह वैभव पुरोगामे यांनी अशा माहितीसह एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी नील आर्मस्ट्राँग […]

Continue Reading

ही व्यक्ती समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनीही जीवंत आढळली आहे का? वाचा सत्य

एका जखमी अवस्थेतील व्यक्तीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात फार वेगाने पसरत आहे. ही व्यक्ती तामिळनाडूतील सिद्धार योगी असून ती तीनशे वर्षापुर्वी समाधीस्त झाली होती. वेल्लियूर मंदिराच्या नुतनीकरणासाठी माती खोदत असताना ते जीवित अवस्थेत आढळून आले. सिद्धार हे योगासनात बसलेले दिसून येतात. अशा माहितीसह हा व्हिडिओ समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोलाही हा व्हिडिओ याचा खरेपणा जाणून घेण्यासाठी […]

Continue Reading

वृत्तपत्र कात्रणातील हा फोटो तृप्ती देसाई यांचा नाही, वाचा सत्य

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याविषयी म्हणून एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. तृप्ती देसाई ही महिला नाही आहे ही लेस्बिअन आहे ही समलैंगिक आहे एके काळी JNU मधे ही लेस्बिअन कपल समारंभात ही भाग घेत असत तिचा हा फोटो न्यूज पेपर मधला, अशी माहिती देत राहुल पोटे यांनी वृत्तपत्राचे हे […]

Continue Reading

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चार नवेगवेगळी दृश्ये दिसत आहेत. यातील पहिल्या दृश्यात हातात पिस्तूल घेऊन काही पोलीस अधिकारी चालताना दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात एक महिला बोलत असताना दिसते आणि आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेवटच्या दृश्यात एक महिला आक्रोश करताना दिसत […]

Continue Reading

‘किस ऑफ लव्ह कॅम्पेन’चा फोटो तृप्ती देसाई यांचा म्हणून व्हायरल

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे म्हणून एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. आठवतंय का काही हीच ती अतृप्त(तृप्ती) अशी माहिती देत हिंदूराष्ट्र सेनेचा माऊली टोन्पे यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. हे छायाचित्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

ATM पिन उलटा टाईप केल्यास पोलीस येऊन लुटीपासून बचाव होतो का? वाचा सत्य

Representational Image: Photo: Pixabay प्लीज हे वाचा…ATM बद्दल थोडसं…पण खूप महत्त्वाचे…असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ATM चा पिन उलटा टाईप केल्यास एटीएम मशीनला कळते की, तुम्ही अडचणीत आहात.     त्यानंतर एटीएममधून अर्धेच पैसे बाहेर येतील. एटीएम मशीन बँकेला आणि पोलिसांना सुचना देईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही […]

Continue Reading

सुखोई विमानांनी हे त्रिशूल साकारले का? वाचा सत्य

महादेवाचे त्रिशूल सुखोई मिग विमानांनी साकारले होते, भारतीय हवाई दलाला सलाम, मजा आली, जयहिंद अशी माहिती देत समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  सुखोई विमानांनी त्रिशूल साकारल्याचे हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या परिणामात आम्हाला […]

Continue Reading

जखमी पक्ष्याला वाचविण्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का? वाचा सत्य

वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यासाठी सुरतमध्ये जैन समाजाने हॅलीकॉप्टर मागवले होते, अशा माहितीसह एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. सुरतमध्ये खरोखरच अशी काही घटना घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य पडताळणी वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यात आल्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध […]

Continue Reading

वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बॉयलर चिकन खाऊ नये.(वाशी पोलिस स्टेशन.), असा संदेश सध्या समाजमाध्यमात वेगाने पसरत आहे. वाशी पोलिसांनी खरोखरच असा संदेश पाठवला आहे का,  नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे का, याची […]

Continue Reading

वुहानमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी आकांत करत असल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इमारतींमधील नागरिक आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. “जीवाची भीक मागताना वुहानमधील लोक आपल्या घरातून ओरडत आहेत. मदत आणि उपचाराऐवजी त्यांना घरात […]

Continue Reading

Corona Virus : कोरोना व्हायरसला हे होमिओपॅथिक औषध प्रतिबंध करते का, वाचा सत्य

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल आहेत. कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे झाले वातावरण असतानाच समाजमाध्यमात यावर विविध उपाय सुचविणारे संदेश व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव सोनार यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक […]

Continue Reading

अमानतुल्लाह खान यांचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आमदार अमानतुल्लाह खान यांनी म्हटलंय की, ‘’अल्लाहने ठरवले आहे की, अत्याचार करणारे नष्ट होतील. आपण शरिया होऊ.’’ AAP चे अमानतउल्लाह खान हे आहेत केजरीवाल यांचा पक्ष आपचे विचार, आता तुम्हीच विचार करा सगळे अल्लाहच ठरवेल की तुम्हीही काही ठरवाल? […]

Continue Reading

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिली आणि सध्या संकटात असलेल्या देशासाठी दुआ मागण्याची मुस्लिमांना विनंती केली. आम्हाला तुमची मदत हवी आहे, असे ते म्हणाल्याच्या माहिती सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच मशिदीला भेट दिल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का? वाचा सत्य

चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. केरळमध्ये तिघांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता एका छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा दावा करण्यात येत आहे. छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का, […]

Continue Reading

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे असे वक्तव्य केलंय का? वाचा सत्य

नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्यात यावे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उल्हास तावडे, कमलप्रसाद तिवारी आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive  तथ्य पडताळणी […]

Continue Reading

लखनौमध्ये हिंदू महिलांनी बुरखा घालून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या का, वाचा सत्य

लखनौ येथे पुजा आणि मानसी नावाच्या दोन महिला बुरखा घालून सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात धरणे देणाऱ्या महिलांमध्ये शिरल्या आणि त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंब्रा बुलंद नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंच अशी घटना घडली आहे का, हा व्हिडिओ त्याच घटनेचा आहे […]

Continue Reading

पाकिस्तानच्या असफल क्षेपणास्त्र चाचणीचा हा व्हिडिओ आहे का, वाचा सत्य

पाकिस्तानने 23 जानेवारी 2020 रोजी गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर समाजमाध्यमात पाकिस्तानची ही क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याचा दावा करत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे क्षेपणास्त्र 300 किकलोमीटर जाण्याऐवजी अवघ्या 36 किलोमीटरवर जाऊन कोसळले, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. संजय शिंदे, पंकज सोनवणे आणि दीपक बर्दापूरकर आदींनी हा व्हिडिओ अशा माहितीसह पोस्ट […]

Continue Reading

हा व्हिडिओ राजपूत महिलांनी दाखवलेल्या तलवारीच्या कौशल्याचा

दिल्लीतील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात म्हणजेच सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या मुस्लीम  महिलांविरोधात कट्टर हिंदू महिला उभ्या राहिल्या आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तम भोकरे यांनी असा दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच मुस्लीम  महिलांविरोधात आंदोलन करणाऱ्या कट्टर हिंदू महिलांचा आहे […]

Continue Reading

विश्व हिन्दू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याचा व्हिडिओ नसीरुद्दीन शाह यांच्या बंधूचा म्हणून व्हायरल

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचा हा व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे. त्यांनी जे सत्य मांडले आहे ते आजपर्यंत कोणीच नाही मांडलं, असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. नरेंद्र मिरजकर यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा भाऊ रिजवान अहमद यांचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट […]

Continue Reading

दिल्लीत भाजप मतदारांना घरोघरी जाऊन 700 रुपये वाटत आहे का? वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास आता चांगलाच वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना 700 रुपये वाटत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. अयान एस. के. यांनीही हा व्हिडिओ अशाच दाव्यासह पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी दिल्लीत […]

Continue Reading

हे पत्रक आम आदमी पक्षाचे आहे का? वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच समाजमाध्यमात एक पत्रक पसरत आहे. हे पत्रक आम आदमी पक्षाने जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे. हरिश पाटील यांनीही असे पत्रक पोस्ट केले आहे. हायलाईट केलेले वाक्य वाचा, मग हिंदुत्वाची व देशहिताची तमा बाळगणाऱ्या पक्षाला बहुमत का हवे ते ठरवा, असे त्यांनी म्हटले आहे. या पत्रकावर निवडणूक आयोग झोपलाय […]

Continue Reading

अंबालातील छेडछाडीच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत दावा करण्यात आला आहे की, अंबाला शहरातील जैन बाजारात मुल्लाने एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांना त्याला पकडून नग्नावस्थेत फिरवले. असे निद्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. रेश्मा प्रमोद नंदागोळी, शिशिर उजगावकर आणि समीर कौशिक […]

Continue Reading

‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांना मारहाण करण्यात आली का?

दार्जीलिंगमध्ये ‘सीएए’चे समर्थन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचा दावा करत एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांचे पाहा काय हाल करण्यात आले, असा दावा करत धर्मराज यादव आणि सुंदर बालकृष्णन यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी […]

Continue Reading