इंदिरा गांधींनी सोने खरेदी थांबवण्याबद्दल ‘द हिंदू’च्या नावाने पसरणारे कात्रण फेक; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

जागतिक ऊर्जा संकटामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढता ताण आणि रुपयाची घसरलेली किंमत लक्षात घेता, पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी नागरिकांना एक वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर देशभरात खळबळ उडाली असून, विविध स्तरांतून या निर्णयाला विरोध होत आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या  6 जून 1967 रोजीच्या पहिल्या पानावरील एका बातमीचे कात्रण अंक या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1967 मध्ये नागरिकांना सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन केले होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, ‘द हिंदू’ अशी कोणतीही बातमी आपल्या वृत्तपत्रात छापलीच नव्हती.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये 6 जून 1967 चे द हिंदू वृत्ताचे एक कात्रण दाखवले आहे, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या फोटो सोबत बातमी दिली आहे की, त्यांनी भारतीयांना “सोने खरेदी करू नका,” असे आवाहन केले.

युजर्स हे कात्रन शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मद्रास, 6 जून 1967 ‘द हिंदू’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील गंभीर परकीय चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनतेला सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असा कोणताही निर्णय घेतला असता तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमावर अशी बातमी आढळत नाही.

तसेच, ‘द हिंदू’च्या सोशल मीडिया अकाउंट्स (फेसबुक, ट्विटर आणि इंस्टग्राम ) किंवा आर्काइव्हमध्येही ही बातमी प्रकाशित झाल्याचे आढळून आले नाही. 

याउलट ‘द हिंदू’ने 12 मे 2026 रोजी ट्विटर पेजवर हे वृत्त बनावट असून हा अंक त्यांच्याकडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

पोस्टमध्ये सांगितले आहे की, “द हिंदू वृत्ताच्या पहिल्या पानाचा दावा करत 6 जून 1967 रोजीचे एक कात्रणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ‘द हिंदू’ स्पष्ट करू इच्छितो की, हे कात्रन खोटे आणि डिजिटलरीत्या एडिट केले असून अशी कोणतीही बातमी आमच्या संग्रहातील नाही.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

पुढे अधिक सर्च केल्यावर द हिंदूचे पत्रकार बी. कोलाप्पन यांनी ट्विटरवर 

या पोस्टमध्ये त्यांनी व्हायरल कात्रण बनावट असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्या दिवशी द हिंदूने प्रसिद्ध झालेले मूळ प्रतदेखील शेअर केली.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

सोन्यासंबंधित निर्बंध खरे; पण…

तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने सोने खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा लागू केला होता.

तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी साल 1968 मध्ये ‘गोल्ड कंट्रोल ॲक्ट’ लागू केला होता. या कायद्यानुसार नागरिकांना सोन्याच्ये बिस्किट आणि नाणी ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती.

चीनसोबतच्या सीमावादानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाढलेला ताण, सोन्याची वाढती मागणी आणि तस्करीला आळा घालण्यासाठी तसेच भारतीय रुपयाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आला होता. पुढे 1990 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

इराणमधील संघर्ष आणि वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होत असून परकीय चलन साठ्यावरही ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना खर्चात बचत करण्याचे आवाहन केले आहे. एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे, परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे आणि शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास त्यांनी सांगितले.

देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे आणि अनावश्यक आयात कमी करणे हा या आवाहनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले आहे. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.  

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेली वृत्तपत्राची कात्रण बनावट आहे. इंदिरा गांधींनी 1967 मध्ये भारतीयांना सोने खरेदी करण्याचे आवाहन केल्याची बातमी ‘द हिंदू’ने छपली नव्हती. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हे बनावट कात्रण व्हायरल होत आहे.

Result Stamp

Title: इंदिरा गांधींनी सोने खरेदी थांबवण्याबद्दल ‘द हिंदू’च्या नावाने पसरणारे कात्रण फेक; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *