COVID-19: कोविडचा XBB सबव्हेरिएंट पाचपट जास्त घातक आहे का? वाचा सत्य

सुमारे एक वर्षाच्या विश्रामानंतर कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-7 सब-व्हेरिएंट तर सिंगापुरमध्ये XBB सब-व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही कोरोना लाटेचा संभाव्य धोका ओळखता खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंटविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, XBB सब-व्हेरिएंट आधीच्या […]

Continue Reading

“चीनने कोरोना तयार केला”? नोबेल विजेते शास्त्रज्ञ तासुकू होंजो यांच्या नावाने खोटा मेसेज व्हायरल

कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जातात. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानतात आणि चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असाही आरोप केला जातो. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, तरी अनेक जण अशा आशयाचे मेसेज पसरवित राहतात.  आता तर नोबेल विजेते शास्त्रज्ञाचा दाखला देत […]

Continue Reading

FACT CHECK: 1963 साली ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाची फिल्म आली होती का?

जगावर कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट गडद होत आहे. त्याविषयी विविध दावेसुद्धा केले जात आहे. त्यातच भर म्हणून आता एका चित्रपटाचे पोस्टर शेअर केले जात आहे. ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाचा हा चित्रपट 1963 साली प्रदर्शित झाला होता असा म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

FAKE NEWS: सिंगापूर सरकारने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले का?

कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे.  सिंगापुर जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला […]

Continue Reading

EXPLAINER – साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू सापडला का?

गुजरातमधील साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू आढळला, अशा आशयाच्या बातम्यांनी गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडवून दिली. अहमदाबाद शहरामध्ये तर अफवा पसरली की, पिण्याच्या पाण्यातूनही कोरोना विषाणू पसरत आहे.  आयआयटी गांधीनगर या संस्थेच्या संशोधनाचा हवाला देत या बातम्या देण्यात आल्या आणि त्यावरून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले. मराठीमध्येदेखील अनेक माध्यामांनी ही बातमी प्रकाशित केली. (लोकसत्ता, लोकमत, सकाळ) […]

Continue Reading

FAKE NEWS: रशियाने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटलेले नाही

कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे.  रशियाने जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला […]

Continue Reading

‘कोविड’ मुळे मृत्यू झाल्यावर कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत मिळणार का? वाचा सत्य

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे निधन पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपयांचा मदतनिधी देणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करायचा अर्जदेखील व्हायरल मेसेजमध्ये शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व अर्ज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा दिशाभूल […]

Continue Reading

ऑक्सिजन कमी झाल्यावर मनानेच होमिओपॅथी औषध Aspidosperma Q 20 घेऊ नका; वाचा सत्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा भीषण तुटवडा जाणवत आहे. अशा आपात्कालिन परिस्थितीमध्ये अशास्त्रीय आणि तद्दन खोट्या घरगुती उपयांचे मेसेज फिरत आहेत.  अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर Aspidosperma Q 20 नावाचे होमिओपॅथी औषध घेतल्यावर लगेच पातळी सुरळीत होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, कोरोनाविषयी कोणतीही पोस्ट शेअर करण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. केवळ अधिकृत शासकीय संस्थानांच कोरोनासंबंधी मेसेज पाठविण्याची मुभा असेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज […]

Continue Reading

घरगुती ‘कोविड-19 मेडिकल किट’च्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

‘टाटा हेल्थ’ कंपनीच्या नावे सध्या एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये कोविड-19 मेडिकल किटची माहिती देण्यात आली आहे. कोरोना उपचारासाठी घरात कोणती औषधी ठेवावी, कोरोना होण्याचे विविध टप्पे कोणते, कोरोना होण्यापासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत वगैरी माहिती टाटा समुहाच्या नावाने सांगितली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिका सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीचे 10 लाख डोस परत करणार का? वाचा सत्य

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणू थैमान घालत असून, आता कुठे त्यावर लस उपलब्ध झाली आहे. भारताच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) लस जगभरात पाठविली जात आहे.  लसीची उपयुक्तता आणि प्रभावीपणा याविषयी अजुनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यात भर म्हणून बातमी आली की, दक्षिण आफ्रिकेने ‘सीरम’च्या अॅस्ट्राझेनेका लसीचे सुमारे दहा लाख डोस परत […]

Continue Reading

भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य

देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? 43 […]

Continue Reading

पाँडिचेरी विद्यापीठाने कोरोनावर घरगुती उपाय शोधून काढल्याची फेक न्यूज व्हायरल

नऊ महिने झाले तरी कोविड-19 महारोगावर औषध किंवा लस विकसित झालेली नाही. त्यामुळे लोक मिळेल ते उपाय आणि मेसेजवर विश्वास ठेवत आहेत. अशाच एका मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाँडिचेरी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने कोविड-19 वर घरगुती उपाय शोधून काढला असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा (WHO) मान्यता दिली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही माहिती असत्य […]

Continue Reading

कोविड-19 टेस्ट किट्सची 2017 पासूनच विक्री सुरू झाली होती का? वाचा सत्य

कोरोना विषाणूच्या महामारीविषयी जगभरात अचंबित करणारे दावे केले जातात. या विषाणूचा उगम कसा झाला यापासून ते तो पसरविण्यामागचा हेतू, याविषयी अनेक कन्सिपरसी थेयरीज आहेत.  जगभरातील आयात-निर्यातीचा डेटा दाखवून आता दावा केला जात आहे की, कोरोनाच्या टेस्ट किट्स 2017 पासूनच काही देशांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. याचाच अर्थ की, कोरोना व्हायरसची माहिती 2019 च्या आधीच माहिती […]

Continue Reading

FACT CHECK: अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यावर हाजी अलीला भेट दिली का?

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही आठवड्यांच्या उपचारांनंतर दोघांनी कोरोनावर मात केली. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन सर्वप्रथम मुंबईतील हाजी अली दर्गा येथे भेट देऊन चादर चढविली. बच्चन यांच्या फोटोला धार्मिक रंग देऊन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोवर बहिष्कार टाकण्याचे […]

Continue Reading

कोरोनाच्या नावाखाली किडनी तस्करी केली जात आहे का? वाचा त्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

कोरोनाच्या नावाखाली दवाखान्यांमध्ये अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याला पुरावा म्हणून मृत रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी किडनी काढल्याचे आरोप करतानाचा एक व्हिडिओ सध्या फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ जुना आणि त्याद्वारे केला जाणारा आरोप खोटा असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडिओमध्ये? सुमारे तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मृत रुग्णाचे […]

Continue Reading

लिंबाच्या रसाने कोरोना विषाणू नष्ट होत नाही; वाचा सत्य

फक्त एक रूपयात घरगुती पद्धतीने कोरोना विषाणू नष्ट होतो, असा दावा करणारा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. आंध्र प्रदेशमधील रंगा व्यंकटेश्वर राव यांच्या नावाने हा संदेश व्हायरल होत असून त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचा दावाही करण्यात येत आहे.  या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

कोरोना काळात या मूर्तींचे विलगीकरण करण्यात आलेले नाही; वाचा सत्य

कोरोना काळात काही मूर्तींचे विलगीकरण करण्यात आले, अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. देवानांही कोरोनाची बाधा झाल्याचे याद्वारे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा फोटो गेल्यावर्षीचा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हे छायाचित्र कोरोना काळातील किंवा कोरोनाशी संबंधित आहे का, याचा शोध घेतला. […]

Continue Reading

कोविडची लस घेणारी ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी नाही; वाचा ती कोण आहे…

रशियाने कोरोना व्हायरसवर लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. सोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलीलासुद्धा ही लस दिल्याची त्यांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर एका मुलीला लस देतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले. हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा नसल्याचे […]

Continue Reading

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाली, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. राम मंदिरासंदर्भात निर्णय देणाऱ्या गोगोई यांना भूमीपूजनाच्या दिवशीच कोरोना झाला, असादेखील अनेकांनी प्रचार केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । […]

Continue Reading

कोरोनाच्या नावाखाली एका डॉक्टरने 125 रुग्णांची किडनीसाठी हत्या केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

दिल्लीत एका डॉक्टरने 125 जणांना बळजबरी कोविड-19 पॉझिटिव्ह दाखवून हत्या केली आणि त्यांची किडनी चोरली, अशी बातमी व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कळाले की, त्याने रुग्णांचे मृतदेह मगरीला खाऊ घातले, असाही व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फॅक्ट […]

Continue Reading

काय आहे 999 रुपयांच्या खादी मास्क मागचे सत्य? वाचा

कोरोनापासून संरक्षण म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून ते आरोग्य मंत्रालयापर्यंत सर्वांनी मास्क घालण्याचा सल्ला दिल्यामुळे बाजारात विविध प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदींच्या फोटोसह ‘खादी मास्क’ नावानेदेखील सोशल मीडियावर जाहिरात सुरू आहे. तीन खादी मास्कच्या पॅकची किंमत 999 रुपये एवढी महाग आहे.  याद्वारे अनेक जण केंद्र शासनावर अव्वाच्या सव्वा किंमत […]

Continue Reading

मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याच्या अफवांना फुटले पेव; वाचा सत्य

मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साधे पडसं-खोकला असणाऱ्या रुग्णांना बळजबरीने कोरोना पॉझिटिव्ह दाखवून त्यांचे अवयव चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप या मेसेजमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे कळाले. काय आहे प्रकरण? मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाचे फोटो शेयर करून […]

Continue Reading

मनोरी गावात कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

मनोरी गावातील एका कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले, अशा दाव्यासह एक व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या नावाखाली अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट झाले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह तथ्य […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यापासून मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची इत्थंभूत माहिती माध्यमांद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. अशातच गुरुवारी अनेक न्यूज चॅनेल्सने बातमी दिली की, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार. परंतु, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. खुद्ध अमिताभ यांनी निगेटिव्ह […]

Continue Reading

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे कोरोनविषयक खोटी ऑडियो क्लिप व्हायरल

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये त्या कथितरीत्या लोकांना कोरोनाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे न जाण्याचे आवाहन करीत आहेत. केंद्राकडून मिळणारा पैसा कमवण्यासाठी दवाखाने सामान्य रुग्णांनादेखील कोरोना पेशंट दाखवित असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप व्हॉट्सअपवर पाठवून तिची पडताळणी करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही. काय आहे व्हिडियोमध्ये? अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन […]

Continue Reading

बॉस्टन विद्यापीठातील अटक झालेल्या प्राध्यापकाचा कोरोनाशी काही संबंध नव्हता. वाचा सत्य

कोरोना विषाणूसाठी कोण कारणीभूत आहे याविषयी विविध कयास लावले गेले आहेत. आता मेसेज फिरतोय की, अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठात कार्यरत एका प्राध्यापकाला चीनसाठी काम करतो म्हणून अटक करण्यात आली असून, त्यामुळे कोरोना विषाणू हा चीनने केलेला नियोजित कट आहे हे स्पष्ट होते. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले. काय […]

Continue Reading

बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी घालणाऱ्या डॉक्टरला काढण्यात आले का? वाचा सत्य

योगगुरू बाबा रामदेव यांनी सात दिवसांत पूर्णपणे कोरोना बरा करणारे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. पंतजलीतर्फे निर्मित या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ ठेवण्यात आले. परंतु, आयुष मंत्रालयाने या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, तपासणी होईपर्यंत या औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश जारी केले आहेत. अशातच सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ औषधावर […]

Continue Reading

पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडल्याचा तो व्हिडियो ‘मॉक ड्रिल’ आहे. वाचा सत्य

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर तडफडत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडियो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचे असे रुग्ण सापडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049043487) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे व्हिडियोमध्ये? 32 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये झेब्रा क्रॉसिंगवर एक […]

Continue Reading

तो व्हायरल व्हिडियो नगरसेवक मुकुंद केणी यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. वाचा सत्य

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. काही जणांनी हा व्हिडियो पुण्यातील मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा असल्याचा दावाही केला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो मुकुंद केणी किंवा मुकुल वासनिक यांच्या अंत्यविधीचा नसल्याचे कळाले. काय आहे […]

Continue Reading

41 कोटी लोकांच्या खात्यात 53 कोटी रुपये पाठवले, असे अमित शहा यांनी विधान केले का?

गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमित शहा यांनी “41 कोटी लोकांच्या खत्यांमध्ये 53 कोटी रुपये पाठवले” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. याचाच अर्थ की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 1 रुपये 29 पैस एवढी रक्कम जमा झाली, असे […]

Continue Reading

कोरोनाच्या एक कोटी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले का? वाचा सत्य

इंडिया टीव्ही वृत्त वाहिनीवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात एका कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले, असे म्हणाले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर (9049043487) हा स्क्रीनशॉट पाठवून याविषयी सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. काय आहे पोस्टमध्ये? इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीवर रविवारी […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच मजुर बनवून भेटीचा बनाव केला का? वाचा सत्य

कोरोनामुळे रोजगार बुडालेले लाखो मजूर आपापल्या राज्यात परतत आहेत. अशाच काही स्थलांरित मजुरांची राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये भेट घेतली होती. फुटपाथवर बसून त्यांनी मजुरांशी संवाद साधत त्यांची व्यथा जाणून घेतल्या. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल यांनी मजुर म्हणून ज्यांची भेट घेतली ते काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्यांना मजुरांच्या वेशात बसवून गांधी […]

Continue Reading

संघाच्या कार्यकर्त्यांचा हा व्हिडियो औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयातील नाही. वाचा सत्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या डॉक्टरांना मानवंदना दिल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो औरंगाबादच्य हेडगेवार रुग्णालयातील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती हा व्हिडियो सुरतमधील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]

Continue Reading

जपानी डॉक्टरच्या नावे कोरोनाबाबत असत्य माहिती सांगणारा व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

जपानमध्ये असणाऱ्या एका भारतीय डॉक्टरने कोरोनाची लक्षणे आणि उपायांबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा एक कथित व्हिडियो व्हायरल होत आहे. व्हिडियोतील व्यक्ती कोरोनाची बाधा झाली की नाही हे तपासण्याचे तीन लक्षणे सांगते. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी पाच उपायदेखील सुचवते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती या व्हिडियोतील अनेक दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. […]

Continue Reading

कोरोनावर चुकीचे उपाय सांगणारे हे कस्तुरबा हॉस्पीटलचे डीन नाहीत; पाहा सत्य काय आहे

कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असताना कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे उपाय सांगणारे व्हिडियो आणि मेसेजचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये मीठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरोनापासून रक्षण होते असा उपाय सुचविण्यात आलेला आहे. व्हिडियोतील व्यक्ती कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

पाकिस्तानातील गर्दीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगवर अधिक भर देण्यात येत आहे. अशा परिस्थित बाजारपेठीतील गर्दीचा एक व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, तो व्हिडियो मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले. काय आहे व्हिडियोमध्ये? बाजारपेठेत खरेदीसाठी […]

Continue Reading

रत्नाकर मतकरी यांना कोरोना कसा झाला हे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे 17 मे रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत निधन झाले. मतकरी यांनी कोरोना कसा झाला याविषयी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेवती भागवत यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटले की, घरी आलेल्या वस्तूंच्या पिशव्या न धुतल्यामुळे त्यांना कोरोना झाला असावा. मतकरी कुटुंबियांशी बोलल्यानंतर रेवती यांना रत्नाकर मतकरी यांना  कोविड-19 चा […]

Continue Reading

शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट काढत नाहीए; ते पोस्टर फेक आहे. वाचा सत्य

सोशल मीडियावर अफवा उडाली आहे की, टिपू सुलतानच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. सोबत या कथित चित्रपटाचे पोस्टरदेखील शेयर होत आहे. यावरून शाहरुखवर धार्मिक शेरेबाजी केली जात आहे. या पोस्टवरून हिंदु-मुस्लिम वादाला तोंड फुटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट खोटी आढळली असून, त्यावरून विनाकारण वातावरण तापले आहे. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे

लॉकडाऊनमुळे मानवी वर्दळ कमी झाल्याने वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. मासेमारीदेखील बंद असल्याने समुद्रातील मासे किनाऱ्यावर येत असल्याचा दावा करत अनेक व्हिडियो समोर आले. किनाऱ्यावर माशांचा खच साचल्याचा असाच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्यावर पापलेटचा पाऊस पडला, अशा दाव्यासह हा व्हिडियो शेयर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

औरंगाबादमध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला नाही. पोलीस अधीक्षकांचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्यावर गेला असून, दिवसेंदिवस नवीन रुग्णांची भर पडत आहे. रेड झोन बनलेल्या औरंगाबाद शहरात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. अशातच पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, औरंगाबाद शहरात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता […]

Continue Reading

अन्न नासडीचा हा फोटो 7 वर्षांपूर्वीचा गुजरातमधील आहे; मुंबईतील परप्रांतीय मजुरांचा याच्याशी काही संबंध नाही.

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या-त्यांच्या राज्यांत पाठवण्यात येत आहे. देशभरात अशा श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. अशाच एका श्रमिक रेल्वेतून काही मजुरांनी शिळ्या अन्नाची पाकिटे फेकून दिल्याचा व्हिडियो अलिकडे व्हायरल झाला.  त्यानंतर आता जमिनीवर पोळ्या फेकून दिल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात असून, मुंबईतील परप्रांतीय मजुरांनी अशा प्रकारे अन्नाची नासडी केली […]

Continue Reading

आई आणि मुलांच्या आत्महत्येचा तो व्हायरल व्हिडियो सोलापुरमधील नाही. वाचा सत्य

आईसह तिच्या दोन्हा लहान मुलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा करण्यात येत आहे की, मन सुन्न करणारी ही घटना सोलापूर शहरातील घडली आहे. लॉकडाऊनदरम्यान घरातील रेशन संपल्यामुळे या आईने मुलांसह आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता दावा खोटा असल्याचे आढळले. काय […]

Continue Reading

आमिर खानने पिठाच्या पाकिटातून गरिबांना पैसे वाटले नाहीत. त्या व्हायरल मेसेज सत्य समोर आले.

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे की, त्याने पिठाच्या पाकिटांतून मुंबईतील गरीबांना 15-15 हजार रुपयांची मदत केली. कोणताही गाजावाजा न करता गरजवंतांपर्यंत मदत पोहचविल्याबद्दल आमिर खानचे कौतुक होत आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी या मेसेजच्या सत्यतेविषयी विचारणा केली होती. आज अखेर त्याचे सत्य समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ […]

Continue Reading

कोरोनाविषयक कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यास बंदी घालण्यात आली आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजेसमुळे कोरोनाविषयक खोटी माहिती लोकांपर्यंत जास्त पोहचत आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अ‍ॅडमिनसाठी नियमावलीदेखील जाहीर केली. आता असा मेसेज फिरत आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोविड-19 विषयी कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यासा बंदी घालण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे मेसेजमध्ये? लाईव्ह लॉ […]

Continue Reading

औषधांची मदत केल्यामुळे या विदेशी मुलांनी भारताचे राष्ट्रगीत गायिले नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जग झुंजत आहे. कोविड-19 महारोगावर अद्याप खात्रीशीर इलाज नसला तरी भारतातर्फे अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन  (HCQ) या गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही विदेशी तरुण भारतीय राष्ट्रगीत गातानाचा व्हिडियो शेयर केला जात आहे. सोबत म्हटले की, भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केल्यामुळे भारताला धन्यवाद देण्यासाठी त्यांनी हा व्हिडियो तयार […]

Continue Reading

आमदार हाफिज खान यांनी नर्सला मौलानाचे पाय पकडून माफी मागायला लावली नाही; वाचा या व्हायरल फोटोमागील सत्य

आंध्रपदेशमधील कुर्नूल येथील आमदार हाफिज खान यांनी एका नर्सला जबरदस्तीने मौलानाचे पाय धरायला लावले, अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. सदरील नर्सने कोरोनासंदर्भात मर्कझमधील सहभागी मुस्लिमांविषयी टीका केली म्हणून हाफिज खान यांनी तिला दवाखान्यातील एका मुल्सिम रुग्णाचे पाय धरून माफी मागायला लावले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा […]

Continue Reading

पुण्यातील मेघा व्यास डॉक्टर नव्हत्या आणि त्यांचे निधन कोरोनामुळे झाले नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, पुण्यात डॉक्टर असणाऱ्या मेघा व्यास नामक महिलेचे कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले. एका महिलेचा फोटो पोस्ट करून दावा केला जातोय की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना लागण झाली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टकर्त्याने महिलेचा फोटो शेयर करून […]

Continue Reading

“कोरोना चीनने तयार केला” असे जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञ म्हणाले नाही; त्यांच्या नावे खोटे विधान व्हायरल

कोरोना विषाणूचा उगम कसा झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. चीनमधील वुहान प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला असे काही जण मानत असून, चीनने मुद्दामहून हा विषाणू पसरविला असा आरोप केला जात आहे. अद्याप याविषयी कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. आता तर जपानचे नोबेल विजेते शास्त्रज्ञदेखील असे म्हणत आहेत असा दावा केला जात […]

Continue Reading

पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

कोरोना विषाणूच्या जागितक साथीमुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. मासेमारी व्यवसायावरदेखील याचा परिणाम दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर एक व्हिडियो चर्चेचा विषय ठरत आहे. पाण्यातून मासे बाहेर पडत असल्याचे यामध्ये दिसते. सोबत दावा केला जात आहे की, मासेमारी थांबल्यामुळे गोव्यातील बेतीम येथे मासे स्वतःहून बाहेर पडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय […]

Continue Reading

कोरोना पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर या नोटा फेकलेल्या नाही. वाचा ‘त्या’ व्हायरल व्हिडियोमागील सत्य

कोरोना विषाणूची केवळ ऑफलाईन जगात नाही तर, ऑनलाईन विश्वातही प्रचंड दहशत आहे. म्हणून तर कोणत्याही व्हिडियोला कोरोनाशी जोडून षंडयंत्राची फोडणी दिली जाते. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटा  पोलिस दंडुक्याने गोळा करीत असल्याचे दिसते. मुद्दामहून कोरोना पसरविण्यासाठी या नोटा रस्त्यावर फेकल्या असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या व्हिडियोसोबत केला जाणारा दावा […]

Continue Reading

व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्कचा अर्थ काय होतो? सरकार आपले मेसेज वाचू शकते का? वाचा सत्य

कोरोनाविषीय सोशल मीडियावर फेक बातम्या शेयर केल्याबद्दल शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची काही नियमही घालून दिलेले आहेत.  अशाच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप टिकसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये […]

Continue Reading

कोरोना रुग्णांचे मृतदेह समुद्रात फेकण्यात येत नाहीत. तो व्हिडियो लिबियातील स्थलांतरितांचा आहे. वाचा सत्य

समुद्रकिनारी वाहून आलेल्या मृतदेहांचा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना समुद्रात फेकून देण्यात येत आहे. त्याआधारे पुढील काही दिवस समुद्रातील मासे न खाण्याचेही आवाहनदेखील सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याचे आवाहन केले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये समुद्रातून वाहत […]

Continue Reading

तोडफोड करणारा हा नग्न व्यक्ती कोरोना रुग्ण नाही. तो पाकिस्तानातील जूना व्हिडियो आहे. वाचा सत्य

कोरोना विषाणूचा ईलाज करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ला होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडियो पसरविला जात आहे. यामध्ये एक नग्न व्यक्ती कथितरीत्या दवाखान्यात तोडफोड करत आहे. हा व्यक्ती तबलिगी जमातीतील असून, तो उत्तरप्रदेशामध्ये एका रुग्णालयात अशा प्रकारे वर्तन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवर या व्हिडियोचे सत्य काय आहे हे तपासण्याची […]

Continue Reading

छतावर नमाज पठणाचा हा फोटो दुबईतील आहे. भारताशी त्याचा काही संबंध नाही. वाचा सत्य

भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगवर जोर देण्यात येत आहे. परंतु, काही लोक याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. अशा परिस्थितीत कोरोना प्रसाराला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशाने एक फोटो शेयर करण्यात येत आहे. मुस्लिम समाजातील काही लोक घरांच्या छतावर एकत्र येऊन नमाज अदा करतानाचा हा फोटो भारतातील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

FACT-CHECK: पाण्यातून कोरोना विषाणू पसरू शकतो का? वाचा सत्य काय आहे

कोरोना व्हायरसमुळे जगात एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. चीनमधून उगम पावलेला हा विषाणू नेमका पसरतो कसा याविषयी अनेक गैरसमज समाजमाध्यमांत प्रचलित आहेत. असाच एक दावा म्हणजे ‘पाण्यातून कोरोना विषाणू पसरतो’ हा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणी लॉकडाऊन असताना काही तरुण विहिरीवर पोहायला गेले होते. त्यांना पोलिसांनी चोप देत […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड झालेली नाही. वाचा सत्य

कोरोना विषाणूने जगभरात एक लाखांपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. या विषाणूला आळा घालण्यासाठी सर्व देश अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अशातच एक पोस्ट फिरत आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंग्लंड-अमेरिकेसह 18 देशांच्या कोरोना निर्मूलन टास्क फोर्सच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. काय […]

Continue Reading

इटलीमधील कोरोनाग्रस्त हॉटेल मालकाच्या आत्महत्येचा म्हणून अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. हजारो लोकांचे बळी घेतल्यानंतर इटलीमध्ये आता परिस्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, इटलीमधील एका कोट्याधीश हॉटेल व्यवसायिकाने कोविड-19 मुळे संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर केलेल्या आत्महत्येचा हा व्हिडियो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमध्ये हा […]

Continue Reading

कोरोना विषाणूला pH मूल्य नसते. त्यामुळे जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाण्याचा दावा निरर्थक आहे. वाचा सत्य

एका व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचे pH (पीएच) मूल्य 5.5 ते 8.5 असते. त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या पातळीपेक्षा जास्त पीएच असणाऱ्या क्षारयुक्त पदार्थ खावेत, असा सल्ला देण्यात येत आहे. या मेसेजमध्ये किती तथ्य आहे, याची फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी विचारणा केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज निराधार असल्याचे […]

Continue Reading

पाच एप्रिलच्या रात्री उपग्रहाने भारताचे हे छायाचित्र घेतले नव्हते. वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून पारंपारिक दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलची टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, दावा केला जात आहे की, उपग्रहाने 5 एप्रिल 2020 रोजी टिपलेल ते भारताचे […]

Continue Reading

अमेरिकेत ट्रेन प्रवाशावर थुंकण्याचा तो व्हिडियो जूना आहे. विनाकारण दिला जातोय धार्मिक रंग. वाचा सत्य

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबरोबरच फेक न्यूज आणि दुष्प्रचारदेखील वेगाने पसरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती रेल्वेतील प्रवाशावर थुंकत असल्याचा व्हिडियो शेयर करून याद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. सदरील व्हिडियो विशिष्ट समुदायातील व्यक्ती कोरोना पसरवित असल्याचे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो जुना असल्याचे स्पष्ट झाले असून, […]

Continue Reading

बंगळुरूमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचा व्हिडियो मुंबईतील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

कोरोना विषाणुमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, लोकांना घरातच राहा म्हणून सांगताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये वाद होत असल्याच्याही घटना घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर काही तरुण पोलिसांना मारहाण करीत असल्याचा व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो मुंबईतील आग्रीपाडा येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा […]

Continue Reading

पोलिसांवर आरोपी थुंकत असल्याचा व्हिडियो तबलिग जमात किंवा कोरोनाशी संबंधित नाही. वाचा सत्य

निजामुद्दीन मर्कझमध्ये झालेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांचा त्यामुळे देशभरात शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर  पोलिस व्हॅनमधून आरोपींना घेऊन जाताना एक आरोप पोलिसांवर थुंकल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडियोचा संबंध काही लोक तबलिग जमातशी तर काही लोक याचा कोरोना व्हायरसशी संबंध जोडत […]

Continue Reading

हा सुफी प्रार्थनेचा व्हिडियो आहे. त्याचा निजामुद्दीन मस्जिद किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कझमध्ये तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निजामुद्दीन मर्कझविषयी अनेक गोष्टी पसरत आहेत. मुस्लिम भाविक मशिदीमध्ये जोरजोरात श्वासोच्छवास करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, निजामुद्दीन मस्जिदीमधील हा व्हिडियो असून, अशा प्रकारे कोरोना पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध […]

Continue Reading

प्लेट-चमचे चाटण्याचा हा व्हिडियो जुना आहे. त्याचा कोरोना किंवा निजामुद्दीन मर्कझशी काही संबंध नाही. वाचा सत्य

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही लोक प्लेट, चमचे चाटून पुसत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो निजामुद्दीन मर्कझमधील असल्याचा दावा केला जात असून, […]

Continue Reading

डॉ. रियाज यांच्या मृत्यूची खोटी पोस्ट व्हायरल. ते जिवंत आहेत. वाचा सत्य

दिल्लीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उस्मान रियाज नामक एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहेत. रुग्णसेवेसाठी स्वतःचे प्राण गमावणाऱ्या या डॉक्टरच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या दाव्याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. डॉ. रियाज जिवंत असून, ते दुबईत […]

Continue Reading

लॉकडाऊनचा हा व्हायरल व्हिडिओ पुणे पोलिसांचा नाही; वाचा सत्य

पुण्यात तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन राहणार आहे. फक्त दुधाची दूकाने, मेडीकल आणि रूग्णालय सूरू राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दूकाने बंद राहणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पुणे पोलिसांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली […]

Continue Reading

इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर नोटा फेकल्या नाहीत. ते व्हेनेझुएलातील जुने फोटो आहेत. वाचा सत्य

इटलीमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोविड-19 महारोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा सर्वाधिक फटका युरोपातील या ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशाला बसला आहे. त्यामुळे इटलीबद्दल अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. आता अफवा उठली की, इटलीमध्ये लोक रस्त्यावर नोटा फेकून देत आहेत. जे पैसे आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवू शकले नाही, ती धन-दौलत काय […]

Continue Reading

FAKE: रेशन कार्ड नसल्यावर मोफत धान्य मिळवण्याचा तो फॉर्म खोटा आहे. वाचा सत्य

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब, कामगार, मजुरांवर रोजगार नसल्यामुळे मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत रेशन कार्ड नसल्यावरही मोफत अन्नधान्य देण्यात येत असल्याची अफवा उठली आहे. अशा दाव्यासह एक फॉर्म (अर्ज) देखील व्हायरल होत आहे.  परंतु, यावर विश्वास […]

Continue Reading

गुजरातमधील मनोरुग्णाचे व्हिडियो कोरोना पेशंट म्हणून व्हायरल. वाचा सत्य

तीन व्हिडियो सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे म्हणून प्रचंड व्हायरल होत आहेत. या सर्व व्हिडियोमध्ये एक पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असून, लोक त्याच्यापासून दूर पळत असल्याचे दिसते. हे व्हिडियो कोरोनाबाधित रुग्णांचे असल्याचे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडियो शेयर करून लोकांमध्ये भीती पसरविली जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून […]

Continue Reading

महाराष्ट्रात लॉक डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा हायकोर्टाने आदेश दिलेला नाही. वाचा सत्य

कोरोनो विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा ‘लॉक डाऊन’ सुरू आहे. 14 एप्रिलपर्यंत याची मुदत आहे. परंतु, आता सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामध्ये ‘लॉक-डाऊन’ 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत विचारणा करून सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.  काय आहे व्हायरल मेसेजमध्ये? टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टुडे […]

Continue Reading

पाकिस्तानातील व्हिडियो इस्लामपूरमधील कोरोनाबाधित फॅमिलीचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. या कुटुंबाचा व्हिडियो म्हणून सोशल मीडियावर 20 सेंकदाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेला श्वसनास त्रास होत असल्याचे दिसते. ही क्लिप खरंच इस्लामपूरमधील आहे का याची फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी विचारणा केली. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता […]

Continue Reading

चहामुळे कोरोना व्हायरस बरा किंवा नियंत्रणात ठेवता येत नाही. तो मेसेज खोटा. वाचा सत्य

कोरोनाची दहशत आता इतकी वाढली आहे की, लोक वाटेल तो उपाय करून पाहत आहेत. त्यात भर म्हणजे सोशल मीडियावर कोरोनावरील औषधपचारांची. आता काय म्हणे तर आपल्या घरातील चहामुळे कोरोना बरा होतो. चीनमधील संशोधकांना तसा शोध लागल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून त्याची शहानीशा करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत […]

Continue Reading

Coronavirus: नरेंद्र मोदींनी इंटरनेट 10 दिवस बंद करण्याची घोषणी केलेली नाही. ती फेक न्यूज आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून मृतांचा आकडा आता 24 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतातदेखील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉक-डाऊन जाहीर करण्यात आला आहे. आणीबाणीच्या अशा परिस्थितीमध्ये फेक न्यूज आणि अफवांना पेव फुटला आहे. आता अफवा पसरली आहे की, कोरोनामुळे देशात आज रात्री 12 वाजल्यांपासून 10 दिवसांकरिता इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे, अशी […]

Continue Reading

हा ब्राझीलमधील व्हिडियो आहे. इटलीतील कर्फ्यूशी त्याचे काही देणेघेणे नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक-डाऊन करण्यात आहेत. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा प्राण कोविड-19 महारोगाने घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला आहे. तेथे मृतांचा आकडा दिवसागणिक शेकडोने वाढत आहे. त्यामुळे तेथील भयावह परिस्थिती दाखवण्याचा दावा करणारे अनेक फोटो आणि व्हिडियो शेयर केले जात आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये एक व्यक्ती पोलिसांना आव्हान […]

Continue Reading

Coronavirus: भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये दोन दिवसांत 1000 बेडचे हॉस्पिटल उभे केले का? वाचा सत्य

भारतीय लष्कराच्या मदतीने राजस्थानमध्ये एक हजार  बेड व शंभर व्हेंटिलेटर असणारे रुग्णालय केवळ दोन दिवसांत तयार करण्यात आले, अशा दाव्यासह काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. यात म्हटलेय की, चीनमध्ये कोरोनासाठी दहा दिवसांत हॉस्पिटल बांधले होते. भारतीय लष्काराने दोनच दिवसांत ही कामगिरी करून दाखविली. फॅक्ट क्रेसेंडोने याची तपासणी केली असता हा दावा खोटा […]

Continue Reading

नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसंबंधी फेक ऑडियो क्लिप व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

कोरोना व्हायरसने बाधित सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून आतापर्यंत हा आकडा शंभरीपार गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक ऑडियो क्लिप खूप व्हायरल होत आहे. यामध्ये नागपूरमध्ये 59 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या क्लिपमुळे सध्या नागपूर शहरात भीती व्यक्त केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता हा दावा चुकीचा असल्याचे आढळले. काय […]

Continue Reading

क्रोएशियातील भूकंपानंतरचे फोटो इटलीतील कोरोना रुग्णांचे हाल म्हणून व्हायरल. वाचा सत्य

इटलीमध्ये कोरोना विषाणूने सर्वाधिक बळी घेतले आहेत. चीनलाही मागे टाकत इटलीमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे या देशातील भयावह स्थितीबद्दल संपूर्ण जगात गैरसमज पसरविले जात आहेत. रस्त्यावर रुग्णांचा इलाज सुरू असल्याचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, इटलीमध्ये आता कोरोनाचे एवढे रुग्ण झाले की, तेथील दवाखान्यांत त्यांना ठेवायला जागा नाही. […]

Continue Reading

रुग्णालयात तडफडणारा तो रुग्ण कोरोनाबाधित नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

कोरोनाच्या धास्तीने लोक वाटेल ते व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करीत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रुग्णालयात तडफडणारा एक रुग्ण दिसतो. हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही लोकांनी हा व्हिडियो भारतातील असल्याचे म्हटले तर, कोणी इटलीचा आहे म्हणून पसरवित आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअपवर हा व्हिडियो पाठवून याचे सत्य सांगण्याची विनंती […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाने केळीपासून कोरोनाची लस तयार केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

कोरोना विषाणूची जागतिक साथ संपूर्ण जगाची परीक्षा पाहणारी ठरत आहे. दिवसेंदिवस बाधिक रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे या महारोगावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करीत आहेत. अशातच अफवा उठली की, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाने केळीच्या जीवनसत्वापासून कोरोना प्रतिबंधक लस तयार विकसित केली आहे. तसा दावा करणारा एक व्हिडियोदेखील व्हायरल होत आहे. […]

Continue Reading

कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलेले ते इटलीचे पंतप्रधान नाहीत. वाचा त्या फोटोमागचे सत्य

इटलीमध्ये कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना या देशातील भयावह स्थिती सांगण्यासाठी नेटीझन्स सोशल मीडियावर खोट्या आणि असंबंधित फोटो/व्हिडियोचा मदत घेत आहेत. सध्या चर्चेचा विषय ठरलेला असाच एक फेक फोटो म्हणजे कोरोनामुळे हतबल झालेल्या इटलीच्या पंतप्रधानांचा. डोळे पाणावलेल्या एका नेत्याचा फोटो इटलीचे पंतप्रधान म्हणून सर्रास पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा सिद्ध झाला आहे. […]

Continue Reading

इटलीमध्ये मृतदेहांचा खच साचल्याचा हा फोटो नाही. हा जर्मनीतील 6 वर्षांपूर्वीचा फोटो आहे. वाचा सत्य

कोविड-19 या महारागोने इटलीमध्ये थैमान घातले असून आतापर्यंत तेथे पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इटलीची अशी भयावह परिस्थिती असताना या देशाबद्दल अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा रस्त्यावर खच साचला, अशा दाव्यासह एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या मेसेजची पडताळणी […]

Continue Reading

बारावीच्या पुस्तकात कोरोना व्हायरसची माहिती आणि उपचार नाही. तो मेसेज चुकीचा आहे. वाचा सत्य

कोविड-19 या महारोगाची भीती जशीजशी वाढत आहे तसा लोकांचा संयम सुटत आहे. सोशल मीडियावर जो तो या रोगावर उपचार शेयर करीत आहे. आता तर काय म्हणे बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयाच्या पाठ्यपुस्तकात कोरोना विषाणूची माहिती व त्यावरील औषध दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक युजर्सने हा मेसेज पाठवून त्याचे फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंती हा मेसेज […]

Continue Reading

टेक महिंद्राचे ऑफिस बंद करण्यासाठी गेलेली ‘ती’ महिला पोलीस नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

कोरोना व्हायरसच्या साथीदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसदेखील मुंबई-पुण्यामध्ये सक्तीने हा नियम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीमध्येही सुरु असलेल्या पुण्यातील टेक महिंद्रा कंपनीचे ऑफिस बंद करण्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला कंपनीच्या प्रशासनाला ऑफिस का सुरू ठेवले असा जाब विचारत आहे. ही […]

Continue Reading

हा इटली विमानतळावरील कोरोना रुग्णांचा व्हिडियो नाही. हा सेनेगल येथील जून व्हिडियो आहे

कोरोना विषाणूच्या भीतीपोटी अनेक खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या विमानतळावरील आपत्कालिन परिस्थितीचा एका व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर होत आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी आजारी प्रवाशांवर उपचार करताना दिसत असून, इतर लोक भीतीपोटी पळत आहेत. सोबत दावा केला की, हा व्हिडियो इटली विमानतळावरील कोरोना रुग्णांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून […]

Continue Reading

रात्री दहानंतर घराबाहेर न पडण्याचा तो मेसेज खोटा. मनपा आयुक्तांनी नाही दिला आदेश. वाचा सत्य

कोविड-19 महारोगाच्या साथीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात भर म्हणून सोशल मीडियावर खोट्या आणि असत्यापीत माहितीचा भडिमार सुरू आहे. अशाच एका फेक मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, औरंगाबाद शहरात रात्री कोरोना विषाणू मारण्याच्या औषधाची फवारणी करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेदरम्यान बाहेर न पडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

कोरोनाला रोखण्यासाठी सांगितलेले हे उपाय कितपत योग्य आहेत? वाचा सत्य

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर विविध उपाय सुचविले जात आहेत. यातील अनेक गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. अशाच पार्श्वभूमीवर एका मराठी दैनिकाने कोरोनाला रोखण्यासाठी काही प्रतिबंध उपाय सुचविले आहेत. मीठाच्या कोमट पाण्यात गुळण्या करण्यापासून ते 26 डिग्री तापमानात हा विषाणू तग धरू शकत नसल्याचे दावे यामध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट […]

Continue Reading