ऑक्सफर्ड विद्यापीठाने मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशीप सुरू केली आहे का? वाचा सत्य

शिक्षणाची पंढरी म्हणून इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ऑक्सफर्डला पाचवे स्थान मिळाले आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठाने माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ्ज डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. आठशे वर्षांचा देदिप्यमान इतिहास असणाऱ्या या विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्य विद्वत्तेला ओळखून हा निर्णय घेतला […]

Continue Reading

FACT CHECK: औरंगाबादमध्ये पोलिसांनी पकडले म्हणून चालकाने स्वतःची दुचाकी पेटवली का?

मोटर वाहन कायद्यातील नवीन तरतुदींची अंमलबजावणी केल्यानंतर चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या वाढीव दंडावरून हे वाद होत असल्याचे दिसून येते. दिल्लीमध्ये तर दंड लावल्यामुळे एका युवकाने स्वतःची दुचाकीच पेटवून दिली होती. अशाच प्रकारची घटना औरंगाबादमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर दुचाकी […]

Continue Reading

Fact Check : या व्हिडिओसोबत पसरविण्यात येणारी माहिती किती सत्य?

जय महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी PMC बँक बंद झाली. परंतु या बँकेमध्ये असणारे फक्त पंजाबी खाते धारकांना बँक मागच्या दरवाजाने आत घेऊन त्याचे पैसे परत देत आहे आणि आपली मराठी व इतर लोकांना/जनतेला फक्त 10000 हजार रु देत आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये मुलुंडच्या भाजप चा आमदार सरदार तारासिंग व त्यांच्या मुलगा आहे, अशी माहिती संदिप […]

Continue Reading

Fact Check : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे हे छायाचित्र किती खरे?

पाकिस्तानी मेहमान नवाझी अशी माहिती देत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे एक छायाचित्र Subhash Deodhar यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्ट तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे हे छायाचित्र खरे आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

35 हजार कोटींचे कर्ज बुडवून सुभाष चंद्रा देश सोडून फरार झाले का? वाचा सत्य

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि घोटाळा करून परदेशात पळून गेले. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पळपुट्या उद्योगपतींमध्ये आणखी एक नाव सामील झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे चेयरमन सुभाष चंद्रा कर्ज थकवून देशातून फरार झाल्याचा दावा केला जात आहे. एकुण 35 हजार […]

Continue Reading

राहुल गांधी केक कापत असलेला व्हिडियो मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाचा नाही. वाचा सत्य

भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्त राहुल गांधी यांनी केक कापून डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस साजरा केल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियो क्लिपमध्ये राहुल गांधी आणि डॉ. सिंग केक कापताना दिसतात. या व्हिडियोवरून काही लोक गांधी यांची प्रशंसा करत आहेत […]

Continue Reading

Fact : स्थलांतरितांचे हे छायाचित्र नेमक्या कोणत्या देशातील?

अति मानवाधिकार कसा अंगलट येतो पहा संपन्न युरोपची काय अवस्था करून टाकलीय ह्यांनी. #support #nrc अशी माहिती Yogesh Mahadev Shevkari यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. हे छायाचित्र नेमके कुठले आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive हे छायाचित्र ISIS च्या भितीने स्थलांतर करणारे सिरीयातील […]

Continue Reading

बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख केल्यानंतर यावरून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा एका बिकिनी घातलेल्या युवतीसोबतचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडियोमध्ये ट्रम्प या मुलीसोबत असभ्य वर्तन करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतकाळ तसा कोणापासून लपलेला नाही. […]

Continue Reading

Fact : अंगणवाडी सेविकांवर लाठीमाराची ही घटना महाराष्ट्रातील नव्हे

अंगणवाडी सेविका वर? निर्दयपणे पोलिसांचा लाठीचार्ज?  *कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा*. ?⚔या सरकार जाहिर निषेध⚔? अशी माहिती Akash Pawar Patil यांनी पोस्ट केली आहे. अंगणवाडी सेविकांवर पोलिसांनी निर्दयपणे लाठीमार केल्याची ही घटना खरोखरच महाराष्ट्रात घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट  तथ्य पडताळणी  अंगणवाडी सेविकांवर लाठीमार करण्याची ही घटना महाराष्ट्रात […]

Continue Reading

सार्वजनिक क्षेत्रातील 9 बँका बंद करण्याचा मेसेज खोटा. “पैसे” काढण्यापूर्वी वाचा सत्य

सोशल मीडियावर एक मेसेज येतो आणि सगळीकडे हाहाकार माजतो. पंजाब-महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) निर्बंध लादल्याचे प्रकरण ताजे असतानाच इतर बँकांवरसुद्धा आरबीआयची कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (25 सप्टेंबर) एक मेसेज व्हायरल झाला की, सार्वजनिक क्षेत्रातील 9 बँका कायमस्वरुपी बंद करण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर खातेदारांनी या बँकांमधून पैसे […]

Continue Reading

अमेरिकेतील बॉस्टन शहरातील पुराचा व्हिडियो स्वित्झर्लंडमधील म्हणून होतोय शेयर. वाचा सत्य

भारतामध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणे तशी नवी बाब नाही. मुंबईमध्ये तर हा दरवर्षीची ओरड आहे. यंदाचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मुंबई अनेक दिवस बंद राहिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. वरून नाल्याचे पाणी आणि उघड्यावरील कचरा तुंबलेल्या पाण्यात मिसळून असह्य दुर्गंधी आणि आरोग्याला धोका निर्माण होतो.  […]

Continue Reading

भारतीय विद्यार्थी नीरव शहा अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

भारतीयांनी अमेरिकेत जाऊन तेथील विविध पदांवर जाऊन आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. असेच एक उदाहरण म्हणून सध्या नीरव शहा या एका भारतीय मुलाचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. दावा केला जात आहे की, नीरव शहा अमेरिकेतील सैन्यात भरती झाला आहे. यासाठी अखेरच्या चाचणीतील त्याचे मिलिटरी ड्रीलचे कौशल्य दाखवतानाचा एक व्हिडियो शेयर केला जात आहे. ही […]

Continue Reading

Fact : हा व्हिडिओ भारतातील पोलिसांचा नसून पाकिस्तानमधील

लोक म्हणतात पोलीस जाणूनबुजून गाडी थांबवतात, आता याला काय म्हणणार जनता अशी माहिती Rkboss Kulkarni आणि चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  मूळ फेसबुक पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

36 वर्षांतून एकदाच फुलणारे हे “नागपुष्प” नाही. हा सी-पेन नावाचा सागरी प्राणी आहे. वाचा सत्य

निसर्गातील काही गोष्टी इतक्या अचाट आणि भन्नाट असतात की, त्यांना चमत्कार म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. अशीच एक गोष्ट म्हणजे 36 वर्षांतुन एकदाच उमलणारे अत्यंत दुर्मिळ फूल. त्याचे नाव नागपुष्प सांगितले जाते. हिमालयाच्या कुशीत फुलणाऱ्या या फुलाचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. शेषनागाच्या रुपाशी साम्य असणारे हे फुल लोकांना भुरळ घालत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading

Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही, सोशल मीडिया नाही आणि उगीच हवा नाही. हाडाचे नेते हे आपल्या कामगिरीवरुन ओळखले जातात. नुसती टकळी चालवून नाही, अशी माहिती देत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक छायाचित्र युती खाते माती या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ फेसबुक […]

Continue Reading

Fact Check : स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरले का?

सर्व दुर्गा माता भक्तांनी ह्या XXXX बाईला BJP आपल्या पक्षातून काढत तो पर्यंत विरोध करा आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या….अशी माहिती राष्ट्रवादी पर्व या पेजवर शेअर करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्या छायाचित्रासह दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

Maharashtra Assembly Election: काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली का?

पुढील महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जागा वाटपाची बोलणी आणि आकडेवारी जुळवाजुळव आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख यांच्यासह 30 जणांची नावे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोन या दाव्याची […]

Continue Reading

विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे

सायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive   तथ्य पडताळणी गुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च […]

Continue Reading

Fact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का?

आनंदाची बातमी.. एक्झिट पोल पाहता मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता.. अशी माहिती MNS For Maharashtra या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या माहितीसोबतच एक ग्राफिकही पोस्ट करण्यात आले आहे. या ग्राफिक्समध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे नाव दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive तथ्य […]

Continue Reading

सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी विद्यमान सरकारला कंटाळून राजीनामा दिला होता का?

गेल्या दोन महिन्यांत चार सनदी अधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारची धोरणे आणि हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामे दिले आहेत. दादर-नगर हवेली येथील कन्नन गोपीनाथन यांनी सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करीत वयाच्या 33 व्या वर्षी राजीनामा दिला. सुभाष चंद्र गर्ग यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली केल्यामुळे निवृत्तीच्या दोन वर्षे आधीच राजीनामा दिला. कर्नाटकातील एस. शशिकांत सेंठिल यांनी लोकशाहीची गळचेपी होत […]

Continue Reading

Fact : हा अपघात मुंबई-दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाही

भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 ओळखला जातो. राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या या महामार्गावरील एक व्हिडिओ Ebrahim Sarkhot यांनी कोकण माझा लय भारी या पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडो या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुंबई-दिल्ली महामार्गावर पनियाडा मोड या ठिकाणी हा […]

Continue Reading

Fact : पश्चिम बंगालमध्ये नुकतीच मतपत्रिकेद्वारे नगरपालिकेची निवडणुक घेण्यात आलेली नाही

मोदींचा सुफडा साफ पश्चिम बंगाल.. वाचा सविस्तर..पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी बॅलेट पेपरने इलेक्शन झाले. 7 नगरपालिकांमध्ये 148 पैकी 140 जागा जिंकले. याला म्हणतात लोकशाहीची ताकद महाराष्ट्रात पण बँलेट पेपरने इलेक्शन व्हायलाच हवे अशी माहिती Pritam Wankhade यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी तृणमूल […]

Continue Reading

रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेआधी उडपी श्रीकृष्ठ मठ आणि तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडियो बरेच गाजले होते. तसेच इस्रोच्या कोणत्याही मोहिमेआधी विधिवत पूजा करण्यावर नेहमीच टीका होते. याला उत्तर म्हणून सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील नासामध्ये मोहिमेआधी चर्चच्या फादरकडून विधी केले जात असल्याचे फोटो शेयर होत आहेत. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या […]

Continue Reading

सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

युद्धामध्ये लहान मुलांचे बालपण होरपळून निघते. याची प्रचिती देणारे एक छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रक्त आणि धुळीने माखलेला एक चिमुरडा रडत असल्याचे या फोटोमध्ये दिसते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव युद्धाचे विदारक सत्य सांगतात. या फोटोसह दावा केला जात आहे की, सीरियातील या तीन वर्षीय मुलाचा बॉम्ब हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने […]

Continue Reading

Fact : बेलापूर रेल्वे स्थानकाजवळचा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावाने व्हायरल

सध्या पावसाळ्याचे दिसून असून अनेक ठिकाण दरड कोसळण्याच्या रस्ते आणि रेल्वेमार्ग खचण्याचा घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी याबाबतचे जुने व्हिडिओ आणि खोटी माहिती पसरविण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. मुंबईत पाऊस सुरु असतानाच असे काही व्हिडिओ समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहेत. असाच एक व्हिडिओ कोपर दिवा दरम्यानचा नाला म्हणून Vilas Salunkhe यांनी पोस्ट केला आहे. हा […]

Continue Reading

Fact : बाबा रामदेव यांच्यासोबत असलेली ही महिला पतंजलीशी संबधित

आतुन किर्तन वरुन तमाशा असतो, अशी माहिती देत आपाराव कांबळे यांनी एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रावर म्हटले आहे की, लगता है इसका भी टाईम नजदीक है या छायाचित्रात असणारी महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. या महिलेचे छायाचित्रात दिसणारे बाबा रामदेव यांच्यासोबत काय नाते आहे? असे प्रश्न या पोस्टमुळे […]

Continue Reading

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे खोटे वेळापत्रक व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर आता राज्यात कशी राजकीय परिस्थिती असेल यावर चर्चा आणि अंदाज बांधणी सुरू आहे. पक्षीय बलाबल आणि जागांचे गणित जुळवण्याची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक बंधन येतात. राजकीय पक्षांसोबतच मतदारांनासुद्धा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल […]

Continue Reading

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढारी-एबीपी माझाचे जुने सर्वेक्षण केले जातेय शेयर. वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. दिवाळीच्या आत राज्यातील निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होऊन, रणकंदन सुरू होईल. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला आहे. वृत्तवाहिन्यासुद्धा गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहेत.  अशाच एक जनमत चाचणीमध्ये विद्यमान भाजप-शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील 61 […]

Continue Reading

Fact : जगातील सर्वाधिक आनंदी लोक फिनलँडमध्ये, भारताचे स्थान 140 वे

जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये सऊदी अरब नंबर 1, पाकिस्तान नंबर 80, नेपाळ नंबर 99 आणि भारत 122 नंबरवर आहे. भक्तांनो इथे पण आपण मागे राहिलो आता बोला मोदी है तो मुमकिन है, अशी माहिती Political METRO या फेसबुक पेजवर देण्यात पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading

Fact : भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली नाही

हमीरपुर येथे भाजप आमदारास मारहाण करण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ Avinash Owhal यांनी रणसंग्राम महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी भाजप आमदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना हमीरपुर या गावात खरंच घडली का? हे शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ नीट पाहिला. […]

Continue Reading

इस्रोने भ्रष्टाचारात अडकलेल्या इटालियन कंपनीला सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले का? वाचा सत्य

चांद्रयान-2 मोहिमेंतर्गत चंद्रावर उतरताना विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर भावविवश झालेल्या इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारलेली मिठी बरीच गाजली. यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील एका दीर्घ लेखात खासगी कंपन्यांना सॅटेलाईट तयार करण्याचे कंत्राट देण्याच्या इस्रोच्या निर्णयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. इस्रोने सॅटेलाईट तयार करण्याचे काम तीन […]

Continue Reading

Fact : अम्रृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम घेतलेला नाही

महाराष्ट्राच्या हाय प्रोफाइल लेडी अम्रुता फडणवीस कँलीफोर्निया येथे पूरग्रस्तांना मदती साठी रँम्प करताना… …..हे भाग्य फक्त मराठी माणसालाच, अशी माहिती Mohan Kawade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  अमृता फडणवीस यांनी कॅलिफोर्नियात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरोखरच काही कार्यक्रम घेतला का, ही जाणून घेण्यासाठी आम्ही […]

Continue Reading

Fact Check : घर बदलल्यावर मतदान कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का?

(सांकेतिक छायाचित्र : representative image)  मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करायची आहे ना..संकेतस्थळावर भेट द्या! घर बदलल्यावर Myvotemypledge.com येथून मतदानकार्डावरचा पत्ता बदलणे. शास्त्र असतं ते अशी माहिती Devendra Fadnavis for Maharashtra या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मतदानकार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण

इंदूरीकर महाराज पण राजकारणात यायला लागलेत… मग आता #वरुन_किर्तन_आतुन_तमाशा #जब्या_वाजीव  अशी माहिती ‎Vaibhav Kamble‎ यांनी पोस्ट केली आहे. इंदूरीकर महाराज खरंच राजकारणात सक्रीय होत आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी    इंदुरीकर महाराज निवडणुक लढविणार का याचा शोध घेतला असता सर्वप्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक वृत्त दिसून आले. या […]

Continue Reading

FACT CHECK : नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडरची पाहणी केल्यानंतर बाहेर पडताना ड्रेस बदलला होता का?

सात सप्टेंबर रोजी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. यावेळी बंगळुरू येथील इस्रोच्या मिशन ऑपरेशन कॉम्पलेक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. परंतु, अवघ्या काही मीटर अंतर राहिलेले असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला. यामुळे हताश झालेल्या इस्रोच्या प्रमुखांना मोदींनी मारलेली मिठी बरीच गाजली. यावरून […]

Continue Reading

Fact : वाहतूक नियंत्रण दिवे वाहून जातानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही

सिग्नल वाहून जात असतानाचा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील आहे का, अशी विचारणा या व्हिडिओबाबत करण्यात आली आहे. फेसबुकवरही हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झालेली विनंती आणि फेसबुकवर असलेली पोस्ट आपण खाली पाहू शकता. फेसबुक पोस्ट / Archive   मुंबईत सगळे काही शक्य आहे, इतिहासात पहिल्यादाच सिग्नल […]

Continue Reading

ठाणे शहरात सिंहाचा कळप आला नव्हता. तो व्हिडियो गुजरातमधील आहे. वाचा सत्य

सुनसान रात्रीच्या अंधारात गल्लीतील कुत्रे भुंकत आहेत. हे भुंकणे नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटतेय. रात्रीचे दीड-दोन झाले आहेत. गल्लीतले सगळे लोक झोपलेले. रिमझिप पाऊस सुरू आहे. रस्ते चिखलाने माखलेले. मग गल्लीत हळूच एक प्राणी येतो. त्याला पाहून कुत्रे आणखी जोरजोरात भुंकू लागतात. मग या प्राण्यांचा एक कळपच गल्लीच्या रस्त्यांवर फिरू लागतो. नीट पाहिल्यावर लक्षात येते की, […]

Continue Reading

इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षामध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचे परिणाम दिसू लागले. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना घोषणा केली की, एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. यानंतर […]

Continue Reading

Fact : ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची घेतलेली ही मुलाखत जुनी

चांद्रयान २ आणि विक्रम लँडरबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ‘सन टीव्ही’ या वृत्तवाहिनीने डॉ. के. सिवन यांची मुलाखत घेतली, अशी माहिती Loksatta ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. ‘सन टीव्ही’ने खरोखरच अशी मुलाखत घेतली का, ती घेतली असल्यास कधी घेतली, त्याचा चांद्रयान 2 आणि विक्रम लँडरशी काय संबंध आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

FACT CHECK: विक्रम लँडरसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला का? वाचा सत्य काय आहे.

चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्रावर उतरताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि तमाम भारतीयांचे मन सुन्न झाले. अवघ्या दोन किमीचे अंतर राहिलेले असताना विक्रम लँडर 6 सप्टेंबर रोजी दिशा भटकले आणि संपर्काच्या बाहेर गेले. परंतु, लगेच दोन दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर आघाती अवतरण झालेल्या विक्रम लँडरचा पत्ता लागला. पण त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होऊ शकला का? […]

Continue Reading

FACT CHECK: कर्ज बुडविले म्हणून इंदोरमधील भाजप आमदाराला पोलिसांनी घरातून उचलले का?

आज बँकांसमोरील मोठे आव्हान म्हणजे थकलेले कर्ज. बँकांच्या ढासळत्या परिस्थितीसाठी कर्ज बुडवेगिरी हे एक मोठे कारण आहे. अनेक बडे उद्योगपती बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेले. त्यामुळे कर्ज थकविणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. अशाच एका कर्जबुडव्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे.  दावा केला जात आहे की, इंदोरमधील […]

Continue Reading

FACT CHECK : बिहारमधील जुनी घटना आंबोली घाटातील म्हणून व्हायरल

आंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप उडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा, अशी माहिती Rajendra Dikundwar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी आंबोली घाटात खरंच अशी घटना घडली आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे कोणतेही वृत्त आम्हाला […]

Continue Reading

Fact Check : खंबाटकी घाटातील जुना व्हिडिओ अन्य गावांच्या नावाने होत आहे व्हायरल

खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील पावसाळ्यातील नजारा अशी माहिती Santosh B Shelke आणि Shahaji Gaware यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ आम्ही नीट पाहिला असता आम्हाला यात महाराष्ट्र राज्य परिवहन […]

Continue Reading

ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे नील आर्मस्ट्रॉग म्हणाले होते का? वाचा सत्य

भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेमुळे सध्या सर्वत्र चंद्राविषयी चर्चा आहे. यात भर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या नावे सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. चंद्रावर चालून मला काही मिळाले नाही; पण ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे वक्तव्य आर्मस्ट्राँग यांनी केल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. […]

Continue Reading

Fact Check : हा व्हिडिओ अहमदाबादमधील गणेश विसर्जनाचा आहे का?

साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन केले, अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सुदाम शिनगारे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन […]

Continue Reading

नवीन वाहतूकदंड लागू झाल्यानंतर नितीन गडकरींनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली का? वाचा सत्य!

देशात 1 सप्टेंबरपासून नवीन वाहतूकदंड आकारण्यात आले आहेत. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, यामध्ये दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी टीकेची झोड उठविली आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन […]

Continue Reading

Fact Check : जीवंत नीलगाय गाडण्याच्या या क्रुर घटनेत आमदार राज किशोर सिंह यांचा सहभाग होता का?

आमदार राजकिशोर सिंह यांनी जीवंत नीलगाय जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात गाडल्याची माहिती Nikhil Gade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. किती क्रुर लोकं आहेत ते वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी जीवंत नीलगाय गाडण्याची ही […]

Continue Reading

बिबट्याला अ‍ॅमेझॉनच्या आगीतून वाचवतानाचा हा फोटो नाही. त्यामागचे सत्य वाचा

दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे वन्यप्राणी आणि निसर्गाचे आतोनात नुकसान झाले. सुमारे महिनाभर हे जंगल वणव्याने पेटलेले होते. जंगल जळून खाक होत असतानाचे फोटो पर्यावरणप्रेमी आणि सेलिब्रेटिंनी शेयर केले. त्यापैकी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत एक सैनिक बिबट्याला पाण्यातून कडेवर घेऊन जाताना दिसतो. बिबट्यानेसुद्धा अत्यंत प्रेमाने […]

Continue Reading

Fact Check : ही छायाचित्रे काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतरची नाहीत

काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर 42 मुले पेलेट गनची शिकार झाली आहेत. यातील अनेक मुलांनी आपले डोळे गमावलेत, अशी माहिती लहान मुलांच्या छायाचित्रासह Drprakash Ghag यांनी पोस्ट केली आहे. Sushilaputra Ashok Dnyaneshwar Gaikwad यांनी भयानक म्हणत हीच छायाचित्रे शेअर केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी   ही छायाचित्रे […]

Continue Reading

Fact Check : गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का?

गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती Sandesh prabhu यांनी PALGHAR REFORMER या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

Fact Check : जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने दिले आहेत का?

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच किंग सर्कलच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीला 264 कोटींचे दागिने चढवले आहेत. काय म्हणावं अशा लोकाना, अशी माहिती Sanjiv Pednekar यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु असतानाच जीएसबी मंडळाने गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने घातल्याच्या पोस्ट […]

Continue Reading

सोन्याचा भाव वाढल्याने दुकानात ग्राहक नाहीत म्हणून हे कर्मचारी नाचत आहेत का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सोन्याच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी मस्त ठेका धरल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, सोन्याचा भाव चाळीस हजारांच्या पुढे गेल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रिकामे बसलेल्या या कर्मचाऱ्यांनी डान्स करून वेळ घालवला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. लोकसत्ता या दैनिकानेसुद्धा या व्हायरल व्हिडियोवरून 5 सप्टेंबर रोजी बातमी दिली की, […]

Continue Reading

Fact Check : गडकिल्ले विकण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही

जाहिर निषेध गुजरात कडुन आला का हा निर्णय गडकिल्ले विकणारा हाच तो निजामशाहीन दानव, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेली एक पोस्ट ‎Pankaj Jarhad Patil‎ यांनी एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा ऍड होइल त्याने १०० ऍड करावे या पेजवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टमधील बाबी खरोखरच सत्य आहेत का? महाराष्ट्र […]

Continue Reading

सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

Fact Check : ही महिला लहान मुलांचे अपहरण करत नाही

मुल पळवणारी टोळी पासुन सावध रहा आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, अशी माहिती देणारा व्हिडिओ Dilip Sonone यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी   मुलं पळविणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याची सुचना या पोस्टमध्ये करण्यात आली असली तरी या व्हिडिओत बोलणाऱ्या व्यक्ती या हिंदी भाषिक असल्याचे दिसून […]

Continue Reading

FACT CHECK: अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकातून खरंच स्फोटके व चार जण ताब्यात घेण्यात आले का?

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त केलेला आहे. सणोत्सवाच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही काळजी. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मेसेज पसरत आहे की, अहमदनरच्या माळीवाडा बसस्थानकामध्ये स्फोटके घेऊन जाताना चार जणांना पकडण्यात आले. पोलीस व शिघ्रकृतीदलाच्या जवानांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडियोसुद्धा व्हायरल होत आहे. यामुळे भीती व चिंता व्यक्त […]

Continue Reading

Fact Check : हा युवक मुले पळविणारा नाही, त्याच्याकडुन जबरदस्तीने तसे वदवून घेण्यात आले

मुले चोरणारी टोळी. व्हिडीओ पहा. अशी माहिती Bhashkar Kedar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  मुले चोरणारी टोळी चोरण्याची ही घटना नेमकी कुठे घडली, याचा शोध घेण्यापूर्वी आम्ही हा व्हिडिओ नीट ऐकला. त्यावेळी या व्हिडिओतील संभाषण हिंदी भाषेत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे […]

Continue Reading

Fact Check : ही गायिका मोहम्मद रफी यांची मुलगी नाही

प्रसिध्द गायक मोहम्मद रफी साहेब यांची मुलगी मुस्तुफा परवेज यांनी किती सुंदर भजन गायले हे एकदा पहाच…अशी एक पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी   सुप्रसिध्द गायक मोहम्मद रफी यांच्याविषयीही माहिती आम्ही सर्वप्रथम पाहिली. त्यावेळी त्यांना अशी मुलगी असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर […]

Continue Reading

IIT Roorkee कॉलेजने विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये हस्तमैथुन न करण्याची नोटीस लावली का?

ऐकावे ते नवलच! कॉलेज प्रशासनाने अजब नियम काढणे तशी नवी गोष्ट नाही. मग ते मुलींच्या कपड्यांवरून असो किंवा हॉस्टेलमध्ये परत येण्याचे मुलं व मुलींसाठी वेगवेगळे टाईमिंग असो. परंतु, सध्या आयआयटीसारख्या देशातील आघाडीच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या हस्तमैथुन करण्यावरच नोटीस काढल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. IIT Roorkee च्या हॉस्टेलमध्ये नोटीस लावून विद्यार्थ्यांना बाथरूमध्ये हस्तमैथुन करण्यास मनाई करण्यात […]

Continue Reading

FACT CHECK: मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी केवळ हिंदीतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या का?

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गणेश चतुर्थीनिमित्त मराठीऐवजी हिंदी भाषेतून शुभेच्छा दिल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. एकीकडे ट्विटर इंडिया आणि अमेरिकेच्या दूतावासाने मराठीतून गणेशोत्सवाचे शुभेच्छा संदेश दिल्याचे उदाहरण देत, मुख्यमंत्र्यांनी मात्र केवळ हिंदीतून फेसबुकवर शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

FACT CHECK: 72 वर्षांत खरंच रूपया बांगलादेशी “टका”समोर कमजोर पडला का?

देशाच्या आर्थिकवाढीच्या दराला खीळ बसलेली असताना भारतीय रुपयाचे अवमूल्यन होणे ही चिंतेची बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरता भाव आर्थिक तज्ज्ञ चांगले मानत नाहीत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारतीय रुपया आता इतका घसरला असून त्याची किंमत बांग्लादेशचे चलन “टका”पेक्षाही कमी झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ […]

Continue Reading

FACT CHECK: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले का?

महाराष्ट्र विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अशाच एका सभेत त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाविषयी केलेल्या वक्तव्याची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. 15 सेंकदाच्या या क्लिपच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, मुंडे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. […]

Continue Reading