ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात का? वाचा सत्य

ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकतात व खातात, असा दावा करत हेमंत बागल यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायी आणि बैलाचे मांस विकतात का, या माहितीची तथ्य प़डताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर […]

Continue Reading

चीनमधील विद्यार्थ्याने तयार केलेल्या शॉर्टफिल्मला इजिप्तच्या दिग्दर्शकाच्या नावे केले जात आहे शेयर. वाचा सत्य

स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे आपण न केवळ आपसातील संवाद विसरलो आहोत तर, आसपासच्या जगाचाही आपल्याला विसर पडला आहे. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोक खुपसून आपण आपले आयुष्य जगत आहोत. जगाचे हे भीषण वास्तव दाखवणारी एक शॉर्टफिल्म सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. “लालट्रा पार” नावाची ही तीन मिनिटांची ही क्लिप इजिप्तच्या एका 20 वर्षीय दिग्दर्शकाने तयार केली […]

Continue Reading

गुजरातमधील दगडफेकीचा व्हिडियो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या दंगलीसंबंधी सोशल मीडियावर फेक न्यूजचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, तो दिल्लीतील आहे. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या ओखला विधानसभा क्षेत्रातील हा व्हिडियो असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो अहमदाबाद येथे दोन […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियातील स्टेडियमचा व्हिडियो गुजरातमधील मोटेरा स्टेडियमच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचे विशेष आकर्षण ठरले ते गुजरातमधील मोटेरा स्टेडियम. अहमदाबाद येथे तयार झालेले हे नवे स्टेडियम 1.10 लाख प्रेक्षकसंख्येसह जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. सरदार पटेल स्टेडियम असे याचे अधिकृत नाव आहे. तर या स्टेडियमचा व्हिडियो म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये स्टेडियमधील लाईट शोचा दाखविण्यात आला […]

Continue Reading

दिल्लीत गोळीबार करणारा युवक अनुराग मिश्रा आहे का? वाचा सत्य

दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे.  समाजमाध्यमात मात्र एका व्यक्तीची छायाचित्रे पसरवत ही व्यक्ती अनुराग मिश्रा असल्याची माहिती […]

Continue Reading

FAKE NEWS: दिल्लीत गोळीबार करणाऱ्याचे नाव रोहित राजपूत नाही. तसा खोटा मेसेज व्हायरल

ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. एका तरुणाने यावेळी आठ गोळ्यादेखील झाडल्या. दिल्ली पोलिसांनी या तरुणास अटक केली असून, त्याच्या नावावरून सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. मीडियातील बातम्यांनुसार गोळी चालविणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद शाहरुख आहे. परंतु, काही व्हायरल पोस्टमध्ये या तरुणाचे नाव रोहित राजपूत असल्याचे […]

Continue Reading

जखमी शीख टेम्पो चालकाचे जुने फोटो दिल्ली दंगलीचे फोटो म्हणून व्हायरल. वाचा सत्य

पाठीवर मारहाणीचे वळ उमटलेल्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जातोय की, सीएए विरोधातील आंदोलकाला दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे हे फोटो आहेत. ही पोस्ट आतापर्यंत सुमारे 9 हजार वेळा शेयर करण्यात आली असून, गेल्या 24 तासांत सहा लाखांपेक्षा जास्त युजर्सपर्यंत ती पोहोचली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केल्यावर कळाले की, […]

Continue Reading

मराठवाड्यात बस चालकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडियो दिल्लीतील हिंसाचाराचा म्हणून व्हायरल

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये सध्या हिंसाचार सुरू आहे. यामध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता नऊपर्यंत गेली आहे. मृतांमध्ये एका पोलिस हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सांप्रदायिक व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला ऊत आला आहे.  अशाच एका व्हिडियोमध्ये बसचालकाला काही तरुण मारहाण करताना दिसतात. दिल्लीत सुरू असलेल्या दंगलीतील हा व्हिडियो असल्याचा दावा केला […]

Continue Reading

पनवेलमध्ये ‘लव्ह जिहाद’ पुकारण्यात आल्याचा दावा खोटा, वाचा सत्य

‘लव्ह जिहाद’बाबतचे रेट कार्ड असल्याचा दावा करत सध्या समाजमाध्यमात सांजा लोकस्वामी या दैनिकाचे कात्रण व्हायरल होत आहे. हे खरं आहे ..पनवेल मध्ये खूप मुस्लिम अटक केलेत..एक मोठ्ठं रॅकेट होत..पण अजूनही किती निरागस हिंदू मुली बळी गेल्यात त्यांना ..देशाबाहेर पाठवण्यात आले….अजूनही तुम्ही जागे होणार नाही.. तुमची मुलगी बहीण..जेव्हा जाईल तेव्हा डोळे उघडतील का… अशा माहितीसह स्मिता […]

Continue Reading

चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात का? वाचा त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

चॉकलेट न खाण्याविषयी अधूनमधून एखादा मेसेज व्हायरल होतच असतो. अशाच एका मेसेजमध्ये आपण खात असललेल्या चॉकलेटमध्ये 4 टक्के झुरळ असतात असे सांगितले जाते. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या “चोको” मध्ये 4 टक्क्यांपर्यंत झुरळ राहू देण्याचे परवानगी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) या संस्थेतर्फे देण्यात येते. झुरळामुळे फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी होते तसेच सर्दी, खोकला दमा असा त्रासदेखील […]

Continue Reading

बालवाडीतील मुलांसोबत खेळत असलेले हे खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. वाचा सत्य काय आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या बहुचर्चित भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावे एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती बालवाडीतील मुलांसोबत खेळताना दिसतो. मग त्यांचा एक साथीदार त्यांना घ्यायला येतो तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे “ट्रम्प” जमिनीवर लोळून-पडून विरोध करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरंच असे वागू […]

Continue Reading

नील आर्मस्ट्राँग यांनी धर्मांतर केले होते का? वाचा सत्य

चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता, माध्यमांनी आणि अमेरिकेने ही माहिती लपवली. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी याबाबतचे एक छायाचित्र ट्विट केले आहे, अशा माहितीसह वैभव पुरोगामे यांनी अशा माहितीसह एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी नील आर्मस्ट्राँग […]

Continue Reading

आमिर खान व तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल. वाचा सत्य

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावर तुर्कस्थानचे अध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानची बाजू घेतली होती. यानंतर नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानचा नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतरही एर्दोगान यांनी 14 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करताना कलम 370 हटविण्यासंबंधी पाकिस्तानसोबत उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.  असे असतानाही आमिर खानने नुकतीच एर्दोगान यांची भेट […]

Continue Reading

रतन टाटांनी JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी न देण्याचा निर्णय घेतला का? वाचा सत्य

टाटा ग्रुपचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना टाटा ग्रुपमध्ये नोकरीवर न घेण्याचा निर्णय घेतला, अशी धदांत खोटी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. भारतविरोधी घोषणांचा आरोप आणि शुल्कवृद्धीनंतरच्या आंदोलनामुळे जेएनयू विद्यापीठ चर्चेत राहते. येथील विद्यार्थ्यांप्रती समाजमाध्यमांत समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे […]

Continue Reading

हा बांग्लादेश युद्धातील बलात्कार पीडितेचा फोटो नाही. हा ‘कॉलरा’च्या रुग्णाचा फोटो आहे. वाचा सत्य

सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा करण्यात येत आहे की, बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बलात्कार झालेल्या आपल्या पत्नीचा मृतहेह घेऊन जाणाऱ्या पतीचा हा फोटो आहे. फेसबुक पोस्टमध्ये आवाहन करण्यात आहे की, बांग्लादेशमध्ये अशा अत्याचार पीडित शरणार्थींना भारत सरकार नागरिकत्व देणार आहे. त्यामुळे सीएए-एनआरसीला समर्थन करावे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता कळाले की, हा फोटो […]

Continue Reading

ही व्यक्ती समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनीही जीवंत आढळली आहे का? वाचा सत्य

एका जखमी अवस्थेतील व्यक्तीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात फार वेगाने पसरत आहे. ही व्यक्ती तामिळनाडूतील सिद्धार योगी असून ती तीनशे वर्षापुर्वी समाधीस्त झाली होती. वेल्लियूर मंदिराच्या नुतनीकरणासाठी माती खोदत असताना ते जीवित अवस्थेत आढळून आले. सिद्धार हे योगासनात बसलेले दिसून येतात. अशा माहितीसह हा व्हिडिओ समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोलाही हा व्हिडिओ याचा खरेपणा जाणून घेण्यासाठी […]

Continue Reading

अक्षरधाम मंदिराचे फोटो आयोध्यातील संभाव्य राम मंदिर म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आयोध्यातील विवादित रामजन्मभूमीचा वाद मिटला असून, कोर्टाच्या आदेशाने तेथे राम मंदिर बांधण्यात येणार आहे. हे मंदिर कसे असेल याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या संभाव्य मंदिराचे चित्र म्हणून सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे. परंतु, हा फोटो राम मंदिराचा नसून, दिल्लीस्थित अक्षरधाम मंदिराचा आहे. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे नाही तर बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांना मारण्यात येत आहे. पाहा सत्य

कोरोना व्हायरसचा (COVID-19) प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक देशांमध्येसुद्धा या विषाणुची लागण झालेली आहे. कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या एक व्हिडियो प्रचंड फिरत आहे. यामध्ये कोंबडयांना जमिनीत जिवंत पुरण्यात येत […]

Continue Reading

वृत्तपत्र कात्रणातील हा फोटो तृप्ती देसाई यांचा नाही, वाचा सत्य

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याविषयी म्हणून एक वृत्तपत्राचे कात्रण सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. तृप्ती देसाई ही महिला नाही आहे ही लेस्बिअन आहे ही समलैंगिक आहे एके काळी JNU मधे ही लेस्बिअन कपल समारंभात ही भाग घेत असत तिचा हा फोटो न्यूज पेपर मधला, अशी माहिती देत राहुल पोटे यांनी वृत्तपत्राचे हे […]

Continue Reading

RSS आणि भाजपविरोधात भारतीय जवानांनी घोषणा दिल्या का? पाहा ‘त्या’ व्हिडियोमागील सत्य

भारतीय जवानांच्या गणवेशातील काही तरुण भाजप व आरएसएसविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. ‘भाजप के लालो को, गोली मारो *** को’, ‘आरएसएस के लालों को, गोली मारो *** को’ अशा घोषणा या व्हिडियोमध्ये ऐकू येतात. यावरून सोशल मीडियावर दावा केला जातोय की, सीमेवरील जवानांनासुद्धा कळाले की, देशाचे दुश्मन कोण आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याविषयीचे हे वृत्तपत्र कात्रण खोटे

अवैध वेश्या व्यवसाय आणि अपहारप्रकरणी हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तीस शिक्षा बी. जी. कोळसे-पाटील यांना ५ वर्षे सक्त मजुरी असे शीर्षक असलेल्या बातमीचे कात्रण सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. विकास बोडस यांनीही हे कात्रण हीच ह्याची खरी ओळख  ! अन् हे म्हणे. ‘सन्माननिय’ ………… अशा ओळींसह पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. […]

Continue Reading

कंडोमचे जुने आणि असंबंधित फोटो शहीन बागेच्या नावाने केले जात आहेत व्हायरल. वाचा सत्य

दिल्लीतील शाहीन बाग येथे सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात काही दिवसांपासून महिलांची निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनाविषयी समाजमाध्यामांत अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. शाहीन बाग येथे कंडोमचा ढीग सापडल्याचा दावा सोशल मीडिया केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे पोस्टमध्ये? शाहीन बागेच्या […]

Continue Reading

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चार नवेगवेगळी दृश्ये दिसत आहेत. यातील पहिल्या दृश्यात हातात पिस्तूल घेऊन काही पोलीस अधिकारी चालताना दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात एक महिला बोलत असताना दिसते आणि आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेवटच्या दृश्यात एक महिला आक्रोश करताना दिसत […]

Continue Reading

पुलवामा हल्ल्याचा म्हणून 12 वर्षांपूर्वीचा जूना व्हिडियो केला जातोय शेयर. वाचा सत्य

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडियो म्हणून एक क्लिप सोशल मीडियावर फिरवली जात आहे. यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या ताफ्यावर एक आत्मघाती कार बॉम्ब स्फोट घडवून आणताना दिसते. हा व्हिडियो 14 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पुलवामा हल्ल्याचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे पोस्टमध्ये? मूळ व्हिडियो पोस्ट […]

Continue Reading

‘किस ऑफ लव्ह कॅम्पेन’चा फोटो तृप्ती देसाई यांचा म्हणून व्हायरल

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे म्हणून एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. आठवतंय का काही हीच ती अतृप्त(तृप्ती) अशी माहिती देत हिंदूराष्ट्र सेनेचा माऊली टोन्पे यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. हे छायाचित्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

ATM पिन उलटा टाईप केल्यास पोलीस येऊन लुटीपासून बचाव होतो का? वाचा सत्य

Representational Image: Photo: Pixabay प्लीज हे वाचा…ATM बद्दल थोडसं…पण खूप महत्त्वाचे…असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ATM चा पिन उलटा टाईप केल्यास एटीएम मशीनला कळते की, तुम्ही अडचणीत आहात.     त्यानंतर एटीएममधून अर्धेच पैसे बाहेर येतील. एटीएम मशीन बँकेला आणि पोलिसांना सुचना देईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही […]

Continue Reading

सुखोई विमानांनी हे त्रिशूल साकारले का? वाचा सत्य

महादेवाचे त्रिशूल सुखोई मिग विमानांनी साकारले होते, भारतीय हवाई दलाला सलाम, मजा आली, जयहिंद अशी माहिती देत समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी  सुखोई विमानांनी त्रिशूल साकारल्याचे हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या परिणामात आम्हाला […]

Continue Reading

शहीद भगतसिंग यांना 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली नव्हती. वाचा सत्य

दरवर्षी 14 फेब्रुवारीच्या आसपास ‘व्हॅलेंटाईन्स डे’ विरोधात अनेक मेसेज फिरत असतात. या दिवशी प्रेमदिन साजरा करण्याऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले जाते. तसेच 14 फेब्रुवारीलाच शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना इंग्रजांनी फाशी दिल्याचा दावा केला जातो. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, दुर्दैव […]

Continue Reading

कोरोना व्हायरसमुळे घरात कोंडून ठेवलेला माणूस आग लागली म्हणून बाहेर पडला का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरातून पसरण्यास सुरू झालेल्या या विषाणुवर अद्यापही इलाज सापडलेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणीदेखील घोषित केली. कोरोना व्हायरसबरोबरच त्याविषयी अनेक फेक न्यूजदेखील पसरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे […]

Continue Reading

जखमी पक्ष्याला वाचविण्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का? वाचा सत्य

वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यासाठी सुरतमध्ये जैन समाजाने हॅलीकॉप्टर मागवले होते, अशा माहितीसह एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. सुरतमध्ये खरोखरच अशी काही घटना घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य पडताळणी वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यात आल्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध […]

Continue Reading

ट्रकद्वारे विमानाचे लँडिंग करून 350 प्रवाशांचे जीव वाचवणारा हा व्हिडियो खरा नाही. ती जाहिरात आहे. वाचा सत्य

विमानात बिघाड झाल्यामुळे ते सुरक्षित उतरविणे अशक्य होते…विमानात 350 प्रवाशांचा जीव धोक्यात…वैमानिकाला सुचेना काय करावे…विमानतळावर तणावपूर्ण वातावरण…आणि सगळं काही संपले असे वाटत असतानाच एक साहसी ट्रकचालक वेगाने धावपट्टीवर येतो…विमानाचे पुढचे चाक तुटल्यामुळे लँडिंग होताच अपघात होणार हे स्पष्ट…पण ट्रकचालक मोठ्या हिंमतीने त्याची गाडी विमानासमोर नेतो आणि विमानाचे पुढील चाल ट्रकवर टेकवतो…आणि विमानाची सुरक्षित लँडिंग होते. […]

Continue Reading

वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बॉयलर चिकन खाऊ नये.(वाशी पोलिस स्टेशन.), असा संदेश सध्या समाजमाध्यमात वेगाने पसरत आहे. वाशी पोलिसांनी खरोखरच असा संदेश पाठवला आहे का,  नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे का, याची […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवर लाचार म्हटले का? वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले होते. यानंतर सोशल मीडियावर दावा करण्यात येऊ लागला की, अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा नाकारत त्यांना ‘लाचार’ म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय आहे दावा? केजरीवाल यांच्या कथित […]

Continue Reading

चीनमध्ये 30 हजार कोरोना व्हायरसबाधित रुग्णांना मारण्याची बातमी खोटी आहे. वाचा सत्य

कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या 30 हजार रुग्णांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चीन सरकारने सर्वोच्च न्यायालयात केल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. काही वेबसाईटने ही बातमी दिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सने ही बातमी पसरविली. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव सर्वदूर पसरत असताना ही बातमी नक्कीच भीती निर्माण करणारी आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केल्यानंतर ही बातमी खोटी […]

Continue Reading

वुहानमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी आकांत करत असल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इमारतींमधील नागरिक आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. “जीवाची भीक मागताना वुहानमधील लोक आपल्या घरातून ओरडत आहेत. मदत आणि उपचाराऐवजी त्यांना घरात […]

Continue Reading

मोदींमुळे आकाशातील पक्षी बेरोजगार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले का? विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

दिल्ली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या एका भाषणातील क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे निर्देश करीत म्हणतात की, या पक्ष्यांपाशी रोजगार नसण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या क्लिपची पडताळणी केली असता कळाले की, हा खोडसाळपणे एडिट केलेला व्हिडियो आहे. मूळ भाषणात राहुल गांधी […]

Continue Reading

Corona Virus : कोरोना व्हायरसला हे होमिओपॅथिक औषध प्रतिबंध करते का, वाचा सत्य

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल आहेत. कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे झाले वातावरण असतानाच समाजमाध्यमात यावर विविध उपाय सुचविणारे संदेश व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव सोनार यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक […]

Continue Reading

हा स्वामी समर्थांचा फोटो नाही. हे भगवान नित्यानंद स्वामी आहेत. वाचा सत्य

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा भक्त परिवार खूप मोठा आहे. आपल्या श्रद्धेय गुरुविषयी आदर आणि भक्ती म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो शेयर केले जातात. असाच एक कृष्णधवल फोटो स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो म्हणून सोशल मीडियावर पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो स्वामी समर्थांचा नसल्याचे समोर आले. काय आहे फोटोत? मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading

अमानतुल्लाह खान यांचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आमदार अमानतुल्लाह खान यांनी म्हटलंय की, ‘’अल्लाहने ठरवले आहे की, अत्याचार करणारे नष्ट होतील. आपण शरिया होऊ.’’ AAP चे अमानतउल्लाह खान हे आहेत केजरीवाल यांचा पक्ष आपचे विचार, आता तुम्हीच विचार करा सगळे अल्लाहच ठरवेल की तुम्हीही काही ठरवाल? […]

Continue Reading

मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे.  या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले […]

Continue Reading

शरद पवारांनी झोपडीत जेवण करताना बियर घेतली का? वाचा त्या फोटोमागचे सत्य काय आहे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार एक फेब्रुवारी रोजी शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका आदिवासी पाड्यातील झोपडीत जेवण केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केल्यानंतर याची बरीच चर्चा झाली. मात्र, शरद पवार झोपडीत जेवत असताना त्यांच्या टेबलावर बियर बॉटल दिसत असल्याचा एक फोटो सोशल […]

Continue Reading

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिली आणि सध्या संकटात असलेल्या देशासाठी दुआ मागण्याची मुस्लिमांना विनंती केली. आम्हाला तुमची मदत हवी आहे, असे ते म्हणाल्याच्या माहिती सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच मशिदीला भेट दिल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ […]

Continue Reading

राहुल गांधी यांचे अर्धवट वक्तव्य समाजमाध्यमात व्हायरल, वाचा सत्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील युवक केवळ हिंदूस्थानलाच नाही तर देशालाही बदलू शकतात, असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची बुध्दीमत्ता पाहा, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी खरोखर असे वक्तव्य केले होते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य […]

Continue Reading

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद होण्यासंदर्भात अमोल कोल्हे आणि शरद पवारांविषयी फेक न्यूज व्हायरल. वाचा सत्य

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. फेब्रुवारी अखेरीस ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका बंद होण्याविषयी सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.  दावा केला जात आहे की, शरद पवार यांच्या दबावामुळे ही मालिका होत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे […]

Continue Reading

ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचा खोटा मेसेज व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जगभरात धोका निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसविषयी सध्या अनेक सजम-गैरसमज प्रचलित होत आहेत. सोशल मीडियावर आता मेसेज फिरत आहे की, ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला असून, त्यामुळे चिकन खाऊ नये. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज खोटा (FAKE) असल्याचे निष्पण्ण झाले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक तथ्य पडताळणी चीनमधील वुहान शहरातून […]

Continue Reading

डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का? वाचा सत्य

चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. केरळमध्ये तिघांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता एका छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा दावा करण्यात येत आहे. छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का, […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंवर टीका करणारा हा काँग्रेसचा नेता नाही. तो भाजपचा नेता शिवम त्यागी आहे. वाचा सत्य

भाजपसोबत युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यामुळे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर बराच गाजला. हा व्यक्ती काँग्रेसचा नेता अनिल उपाध्याय असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अनेक वेळा सिद्ध केले आहे की, अनिल उपाध्याय नावाचा कोणताही आमदार/नेता भाजप किंवा काँग्रेसमध्ये नाही. मग या व्हिडियोतील व्यक्ती कोण आहे? चला […]

Continue Reading

CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन्ही कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे फोटो आणि व्हिडियो पसरविले जात आहेत. तिरंगा जाळत असल्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सीएए आंदोलनामध्ये भारताचा झेंडा जाळण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे […]

Continue Reading

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे असे वक्तव्य केलंय का? वाचा सत्य

नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्यात यावे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उल्हास तावडे, कमलप्रसाद तिवारी आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive  तथ्य पडताळणी […]

Continue Reading

RAPID FC: जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना ‘युद्ध गुन्हेगार’ म्हटले नव्हते. वाचा सत्य

सोशल मीडियावरील सध्या पोस्ट पसरविली जात आहे की, नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार म्हटले होते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. पोस्टमध्ये नेहरुंच्या नावे एक पत्र शेयर करून म्हटलेय की, जवाहरलाल नेहरूने PM इंग्लंड ला पत्र लिहून शुभाष चंद्र बोस बाबतीत वार क्रिमीनल म्हणून संबोधले गेले. काँग्रेसचे पितळ उघडे पडले… फॅक्ट क्रेसेंडोने या पत्राची […]

Continue Reading

जामियातील ‘त्या’ विद्यार्थ्याला खरंच गोळी लागली आहे. ती लाल बॉटल पाण्याची होती. वाचा सत्य

एका अल्पवयीन मुलाने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनकर्त्यांवर 30 जानेवारी रोजी गोळी चालविली होती. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. मीडिया आणि पोलिसांच्या समक्ष झालेल्या या घटनेचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले. अशाच काही फोटोंमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातपाशी लाल रंगाची एक बॉटल दिसते. या फोटोंवरून दावा केला जात आहे की, या […]

Continue Reading

Coronavirus: चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्याचे हे रुग्णालय बांधले का?

चीनने कोराना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्यांचे रुग्णालय बांधल्याचे दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. या इमारतील पहिला मजला तर फक्त 16 तासांत उभारण्यात आला, असे म्हटले जात आहे.  या इमारतीत वीज, पाणी या सुविधासह रुग्णालयासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

कोरोना व्हायरस : इंडोनेशियातील मटण मार्केटचा व्हिडिओ चीनमधील म्हणून व्हायरल

केरळमध्ये एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. त्यातच समाजमाध्यमात याबाबत वेगवेगळी माहिती पसरत आहे. चीनमधील मटण मार्केटचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगेश पाखरे, संजीव कोळकुंभे, शैलेश पाटील […]

Continue Reading

Coronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्याचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता औरंगाबाद शहरातही पोहचल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक व्हायरल मेसेजमध्ये NEWS-18 LOKMAT ची बातमी म्हणून पसरणाऱ्या मेसेजनुसार, औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे दोन संशयिच आढळले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित एन-3 भागातील आहेत, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे मेसेजमध्ये […]

Continue Reading