विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडला का? वाचा सत्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पर्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिर्वाद घेताना दिसतो. दावा केला जात आहे की, जेव्हा रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडत होता, तेव्हा त्यांनी रोहित […]

Continue Reading

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या सभेत लोक मोदी – मोदीचे नारे देत होते का ? वाचा सत्य

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सभेत राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भाषणादरम्यान लोक मोदी-मोदीचे नारे देतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की,व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये सभेत कोणीही नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा देत नव्हते. काय आहे दावा […]

Continue Reading

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते व मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेले आहेत. खाली दिलेल्या […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानीसाठी काम करतात’ असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

देशात मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा  निवडणूका पार पडणार आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या निमित्ताने छत्तीसगडच्या दौऱ्यावर गेले होते.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, “तुमचे मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात,”  दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी आपल्याच […]

Continue Reading

उंच कड्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागणारे गाव अरुणाचल प्रदेशातील नाही; चीनमधील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर पाठीवर लहान मुले आणि अवजड सामान घेऊन धोकादायक डोंगरावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अरुणाचल प्रदेशातील एका खेड्यात गावकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातील नसून, […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना समलैंगिक म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन गदारोळ सुरू आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही दिसले. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणीदेखील केली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे ज्याद्वारे दावा केला जात आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सावरकरांबद्दल अपशब्द वापरले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

मशिदीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती; बनावट फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मशिदीला भेट देताना डोक्यावर मुस्लिम टोपी घातलेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती. चुकीच्या दाव्यासह बनावट फोटो […]

Continue Reading

US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकाराला उत्तर देणे टाळले नव्हते; अर्धवट क्लिप व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका आणि इजिप्त दौरा पूर्ण करून भारतात परतले असून या दौऱ्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अशाच एख व्हिडिओमध्ये व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील मुस्लिम व इतर अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले असा दावा केला जात आहे.  […]

Continue Reading

Altered Video: चित्रपटामधील संभाषण शरद पवारांच्या दिल्ली बैठकीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल

सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये कटकारस्थान करत आहेत, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पवारांसह विरोधीपक्षांतील काही नेते मंडळी दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोलतो की, “निवडणूक जिंकण्यासाठी […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले नाही; खोट्या दाव्यासह टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले होते, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होते आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील चक्रीवादळ बनावट आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? चक्रीवादळाचा […]

Continue Reading

‘यूपीमध्ये भाजप सरकार आल्यास गुंडांचे राज्य येईल’ असे नरेंद्र मोदी म्हणाले नाहीच; वाचा सत्य

सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना म्हणतात की, “उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास दंगली, माफीया आणि गुंडांचे राज्य येईल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.  काय आहे दाव ? […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये “मोदी हटओ, देश बचाओ” अशी बनावट जाहिरात व्हायरल; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान 10 मे रोजी पार पडले. तत्पूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान “मोदी हटओ, देश बचाओ” असा संदेश देणारी जाहिरात व्हायरल झाली. दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही जाहिरात तयार केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताणळीअंती कळाले […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपर समर्थन केले का? वाचा सत्य

भारतात ईव्हीएम हा नेहमीच एक वादाचा विषया राहिलेला आहे. सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बैलेट पेपर नाव वाचून मतदान करतात, या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपरचे समर्थन करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

व्हीआयपी कंपनीने लव जिहादचा पुरस्कार करणारी जाहिरात केलेली नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, केरळमध्ये व्हीआयपी कंपनीने ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कार करणारी जाहिरात प्रसारित केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेच्या कपाळवरून टिकली काढून डोक्यावर ओढणी टाकतो. सोबत म्हटले जात आहे की, ईदनिमित्त व्हीआयपी कंपनीने ही जाहिरात तयार केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही; वाचा सत्य

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये ते खलिस्तानची मागणी करणाऱ्या अमृतपाल सिंहला कथितरीत्या समर्थन देत असल्याचे दिसते. व्हायरल क्लिपमध्ये ते पत्रकारांशी बोलताना अमृतपाल सिंहने खलिस्तानबाबत केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला.  शिंदे गटाच्या महिलांनी कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना कथितरीत्या मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट इशारा दिला की, “या पुढे […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

जुनी पेन्शन योजना परत लागू करावी यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी 14 मार्च रोजी बेमुदत संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “संपावर जातात आणि कर्मचाऱ्यांना काम न करता फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.” दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.  या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

नेपाळने गौतम बुद्धांचे छायाचित्र असलेल्या नोटा जारी केलेल्या नाहीत; बनावट फोटो व्हायरल

नेपाळ सरकारने तेथील शंभर आणि एक हजार रुपयांच्या नोटेवर गौतम बुद्धांचे छायाचित्र प्रकाशित केले, असा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहेत. काय आहे दावा ? व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, नेपाळ सरकारने गौतम बुद्धांचा सन्मान […]

Continue Reading

Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना […]

Continue Reading

ओवैसी कृष्ण भजन गातानाचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

‘एआयएमआयएम’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा कृष्ण भजन गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यासपीठावरून ते ‘अरे द्वारपालो’ गाताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.   पडताळणीअंती कळले की, हा व्हिडिओ बनावट आहे. ओवैसी यांच्या भाषणाला एडिट करून त्यात गाणे लावण्यात आले आहे.  काय आहे दावा […]

Continue Reading

आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे पोस्टर झळकले का? वाचा सत्य

कतारमध्ये सुरू असलेला फिफा विश्वचषक 2022 फुटबॉलऐवजी इतर गोष्टींसाठीच जास्त चर्चेत आहे. स्टेडियममध्ये कोणत्या वस्तू आणू शकता आणि कोणते कपडे घालू शकता यावरून गोंधळ सुरू आहे. या व्यतिरिक्त फुटबॉल सामन्यांदरम्यान राजकीय विधान करण्याचाही ट्रेंड दिसत आहे.  सोशल मीडियावर सध्या एक फुटबॉल प्रेक्षक भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर हातात घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल […]

Continue Reading

इंडोनेशिया जी-20 परिषदेत महिलेने ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर दाखवले होते का? वाचा सत्य

नुकतेच इंडोनेशियामध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यात आल्याचा दावा करणारा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला ‘गो बॅक मोदी’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेऊन उभी दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा फोटो बनावट आढळला. […]

Continue Reading

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये मुंडे यांचा फोटो घेऊन चालले. या फोटोवरून […]

Continue Reading

‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपची परंपरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच पक्षावर टीका करताना भाजप ‘तोडा आणि राज्य करा’ हे धोरण घेऊन चालणारा पक्ष असल्याचे म्हटले, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये काँग्रेसची प्रशंसा करताना ते म्हणतात की ‘जोडा आणि विकास करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा युवकांना होणारी मारहाण पाहतानाचा व्हिडिओ खोटा; वाचा सत्य

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते कार्यालयात बसून टीव्हीवर बेरोजगार युवकांना पोलिसांनी केलेली मारहाण पाहताना दिसतात. एवढेच नाही तर, हे पाहून ते हसतदेखील आहेत.  हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री चव्हाण यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी उलटा धनुष्यबाण पकडला नव्हता; बनावट फोटो होतोय व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दसरा मेळाव्यातील एक फोटो टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत केजरीवाल यांनी उलटा धुनष्यबाण पकडल्याचे दिसते. या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.    फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा फोटो एडिट केलेला आहे.   […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धामध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला का?

रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगभरातील देश रशियावर आर्थिक निर्बंध घालून आक्रमण थांबविण्याचे आवाहन करीत आहेत. यामध्ये भारताची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच अमेरिकेतील लोकप्रिय न्यूज चॅनेल सीएनएनच्या एका कथित बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे, की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धापासून […]

Continue Reading

FAKE NEWS: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळतानाचा हा फोटो नाही

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यात एक लक्षवेधून घेणारा फोटोदेखील शेअर होत आहे. क्रिकेट गोलंदाजाच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंद आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा एकत्र? काय आहे या फोटोचे सत्य?

महाविकास आघाडीच्या सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. तसेच, नारायण राणे यांनी मविआ सरकार पडणार असून मार्च महिन्यामध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजपचे महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा एकत्र बसलेले दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी […]

Continue Reading

FAKE: प्रियंका गांधी यांचा काँग्रेस पक्षचिन्हाची रांगोळी झाडतानाचा व्हिडिओ बनावट

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भेट देण्यासाठी मज्जाव करीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी एका रुममध्ये काँग्रेस पक्षाचिन्हाची रांगोळी झाडताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? वाचा ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर अण्णांवर सोशल मीडियावर टीका होत आहे. काहींनी तर अण्णा आणि जे. पी. नड्डा यांचा फोटो शेअर करीत दावा केला की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

‘ठाकुरांचे रक्त गरम असते’ असे योगी म्हणाले नाही; तो स्क्रीनशॉट बनवाट आहे

हाथरस प्रकरणामुळे जातीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच एक वादग्रस्त स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. आजतक वाहिनीचा भासणाऱ्या या कथित स्क्रीनशॉटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ “ठाकुरांचे रक्त गरम असते, ठाकुरांकडून चुका होतच असतात” असे म्हणाल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. योगी आदित्यनाथ यांनी असे विधान केलेले नाही. […]

Continue Reading