
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली मोबाईलवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओ पाहतानाचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहात होता.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये विराट कोहली फोनमध्ये पाहत आहे आणि फोनमध्ये राहुल गांधी यांचा चेहरा दिसतो.
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहताना विराट कोहली.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, विराट कोहलीचा हा फोटो एडिट केलेला आहे.
विराट कोहली फोनमध्ये पाहतानाचा हा फोटो विराटगँग नामक फेसबुक पेजने 21 मार्च 2024 रोजी अपलोड केला होता. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जिओच्या जाहिरातीचे शूटिंग सुरू होण्याआधी विराट कोहली आराम करताना.”
या पोस्टमध्ये विराट कोहलीच्या फोनमध्ये राहुल गांधीचा चेहरा दिसत नाही.
खालील तुलनात्मक फोटोपाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून फोनमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहात नव्हता. मूळ फोटोला एडिट करून फोनमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. चुकीच्या दाव्यासह बनावट फोटो व्हायरल होत आहे.
उद्धव ठाकरेंच्या नावानेही फोटो व्हायरल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो वापरून हाच व्हायरल फोटो एडिट करून शेअर केला जात आहे.
खालील तुलनात्मक फोटोपाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडित करून फोनमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहतानाचा फोटो खरा आहे का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
