सोनिया गांधींच्या चेहऱ्याचे QR कोड काँग्रेसने जारी केलेले नाही; बनावट फोटो व्हायरल
काँग्रेसने 18 डिसेंबरपासून पक्षनिधी गोळा करण्यासाठी "डोनेट फॉर देश" नावाची पार्टी क्राऊड फंडिग मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी चेहरा असलेला क्यूआर कोडचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा क्यूआर कोड काँग्रेसने याच मोहिमेसाठी जारी केला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा क्यूआर कोड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल 'क्यूआर' कोड बनावट आहे. काँग्रेसने सोनिया गांधीचा चेहरा असलेले कोणतेही 'क्यूआर' कोड "डोनेट फॉर देश" या मोहीमेसाठी जारी केले नाही.
काय आहे दावा ?
युजर्स हा क्यूआर कोड शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “कालपर्यंत जे डिजिटल इंडियाची चेष्टा करत होते. आज तेच गाबडे डिजिटली भीक मागत आहेत. नोटबंदी केल्यानंतर पाकिस्तान भिकेला लागलं आणि आमदाराकडे 350 कोटी सापडल्यावर काँग्रेस!”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेले क्यूआर कोड काँग्रेसने जारी केलेला नाही.
काँग्रेसने 28 डिसेंबर 2023 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पक्षनिधीसाठी क्यूआर कोड शेअर केला होता. ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील महारॅलीत खुर्च्यांच्या मागे बारकोड लावण्यात आले आहेत. आपण हा बारकोड स्कॅन करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला रुपये 138, रुपये 1380, रुपये 13800, रुपये 138000 किंवा अधिक देणगी देऊ शकतात. या रॅलीत आलेल्या सर्व देणगीदारांमधून निवडलेल्या पाच जणांना राहुल गांधी स्वत: प्रमाणपत्र आणि पावत्या देणार आहेत.” अधिक माहिती आपण येथे वाचू शकतात.
खालील पोस्टमध्ये आपल्याला क्यूआर कोडवर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह दिसते.
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने काँग्रेसचे राष्ट्रीय संयोजक क्षितिज अद्यालकर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल होत असलेला क्यूआर कोड बनावट आहे, काँग्रेसने सोनिया गांधींच्या चेहऱ्याचे कोणतेही क्यूआर कोड जारी केले नाही.”
काँग्रेसच्या donateinc.net या वेबसाइटवर मूळ क्यूआर कोड पाहिला जाऊ शकतो.
खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की व्हायरल क्यूआर कोड बनावट असून मूळ क्यूआर कोर्डमध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल 'क्यूआर' कोड बनावट आहे. काँग्रेसने सोनिया गांधीचा चेहरा असलेले कोणतेही 'क्यूआर' कोड "डोनेट फॉर देश" या मोहीमेसाठी जारी केले नाही. चुकीच्या दाव्यासह हा क्यूआर कोर्ड व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:सोनिया गांधींच्या चेहऱ्याचे QR कोड काँग्रेसने जारी केलेले नाही; बनावट फोटो व्हायरल
Written By: Sagar Rawate
Result: Altered