राजस्थानमधील अत्याचारातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली का? असंबंधित व्हिडिओ व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे 13 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात 30 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस काही आरोपींना रस्त्यावरून नेताना आणि त्यांना लाठीने मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 

हा व्हिडिओ श्रीगंगानगर अत्याचार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात धिंड काढल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन (9049053770) वर पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील जुन्या घटनेचा असून त्याचा राजस्थानमधील श्रीगंगानगर प्रकरणाशी संबंध नाही.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस काही आरोपींना रस्त्यावरून मारत धिंड काढताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, 30 नराधमांनी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर राजस्थानमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी 30 पैकी 14 आरोपींना अटक करून भर रस्त्यात त्यांची धिंड काढली.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

फॅक्ट-चेक 

व्हिडिओच्या की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा व्हिडिओ जुना असल्याचे आढळले.

News18 Gujarat ने 19 मार्च 2026 रोजी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर केला होता. त्यामध्ये हा व्हिडिओ गुजरातमधील पाटण येथील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील चाणस्मा तालुक्यातील जिलिया गावात 15 मार्च 2026 रोजी रात्री 15 ते 20 जणांच्या जमावाने एका फार्महाऊसवर प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केला होता. 

हल्लेखोरांनी दगडफेक करून पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 18 जणांना अटक करून त्यांची धिंड काढली होती. अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – झी न्यूज

राजस्थान प्रकरणात काय कारवाई झाली?

राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, 13 वर्षीय मुलीला पाच दिवस बंदिवान ठेवून तिच्यावर 30 हून अधिक जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना अटक केली असून काही आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही हॉटेल्सवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. 

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील श्री गंगानगर येथील सामूहिक अत्याचार प्रकरणाचा नाही. तो गुजरातमधील पाटण येथे दंगेखोरांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा जुना व्हिडिओ आहे. त्यामुळे राजस्थानमधील घटनेशी जोडून हा व्हिडिओ शेअर केला जात असून दावा भ्रामक आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: राजस्थानमधील अत्याचारातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली का? असंबंधित व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *