अकासा एअरच्या फ्लाइटमध्ये संस्कृत भाषेतील सुचनांचा व्हिडिओ बनावट; वाचा सत्य
अकासा एअरलाईन्सच्या विमानात प्रवाशांना संस्कृत भाषेतून सूचना दिल्या जात असल्याचा दावा करीत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ बनावट आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये अकासा एअरचे कर्मचारी सूचना देताना दिसतात. तसेच महिलेच्या आवाजात संस्कृतमध्ये सूचना ऐकू येते.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे.
समष्टी गुब्बी नामक युजरने संस्कृत स्पॅरो नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ 6 जून रोजी शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “या व्हिडिओमधील आवाज डब केलेला असून हा व्हॉईस ओव्हर आहे. कोणत्याही फ्लाइटमध्ये अशी सूचना करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ अकासा एअरच्या व्यवस्थापनाशी संबंधित नाही.”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
अकासा एअरचे ट्विट
अकासा एअर कंपनीने व्हायरल व्हिडिओची दखल घेत स्पष्ट केले की, “व्हिडिओमधील घोषणा डब केलेला असून ती आमच्या तर्फे जारी केलेली नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या इनफ्लाईटमधील सूचना ह्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये सांगितल्या जातात.”
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बनावट असून अकासा एअर फ्लाइटमध्ये संस्कृत नाही तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये सर्व सूचना संगितल्या जातात. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:अकासा एअरच्या फ्लाइटमध्ये संस्कृत भाषेतील सुचनांचा व्हिडिओ बनावट; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: Altered