NSA अजित डोवाल रिकाम्या खुर्चीशी बोलत नव्हते; बनावट फोटो व्हायरल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते एका खुर्चीवर बसलेले आहेत तर समोरची खुर्ची रिकामी आहे. दावा केला जात आहे की, अजित डोवाल रिकाम्या खुर्चीशी बोलत होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो एडिट केलेला आहे. मूळ फोटोमध्ये अजित डोवाल यांच्या समोरील खुर्चीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते.
काय आहे दावा ?
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तानमध्ये ज्या ‘अज्ञात हल्लेखोर’ची भीती सतत वाढत आहे, अजित डोवाल त्याच अनोळखी व्यक्तीशी बोलत आहेत.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमवर एका अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केला, असा तेथील युट्यूबरने काही दिवसांपूर्वी दावा केला होता. विषप्रयोगाची बातमी पसरल्यानंतर अजित डोवाल यांनीच त्या ‘अज्ञात व्यक्ती’ला ही कामगिरी सोपवली होती, असा कयास लावण्यात येऊ लागला.
मग व्हायरल होत असलेल्या फोटोचा दाऊद प्रकरणाशी काही संबंध आहे का? तर नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळले की, हा फोटो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरचा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अजित डोवाल यांच्या भेटीचा फोटो शेअर केला होता.
फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले होते की, “राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मुख्यमंत्रींशी 'वर्षा' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री. डोवाल यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.”
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे.
दाऊदवर विषयप्रयोग झाला का?
पाकिस्तानी युट्यूबरने दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा केल्यानंतर दाऊदच्या मृत्युबद्दल अफवा पसरू लागल्या. परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अनेक माध्यमांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेतील सुत्रांचा दाखला देत माहिती दिली की, दाऊदवर ना विषप्रयोग झाला ना तो मरणासन्न अवस्थेत आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. मूळ फोटोमध्ये अजित डोवाल यांच्या समोरील खुर्चीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:NSA अजित डोवाल रिकाम्या खुर्चीशी बोतल नव्हते; बनावट फोटो व्हायरल
Written By: Sagar Rawate
Result: Altered