हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार करण्यात आल्यामुळे रोहित शर्माचे चाहते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये हार्दिक पांड्या विमानतळावर असताना त्याच्याविरोधात घोषणा ऐकू येतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दोन्ही व्हिडिओ एडिट केलेले आहेत. मूळ व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याच्या विरोधात घोषणाबाजी केलेली नाही.

खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे.

व्हिडिओ क्र. 1

दोन्ही व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या चारचाकी वाहनातून उतरतो आणि “मुंबईचा राजा, रोहित शर्मा” अशा घोषणा ऐकू येतात.

कॅप्शन – “हार्दिक पांड्या समोर रोहित समर्थकानी केली जोरदार घोषणाबाजी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

मूळ व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे.

मिड-डेच्या बातमीनुसार, हार्दिक पांड्या 23 जानेवारी 2020 रोजी मुंबई विमानतळावर आला होता. या बातमीमध्ये कुठेही त्याच्याविरोधात घोषणा दिल्याचे म्हटलेले नाही.

मूळ पोस्ट – मिड-डे

व्हिडिओ क्र. 2

कॅप्शन – “रोहित शर्माच्या समर्थकांकडून हार्दिक पंड्या समोर घोषणाबाजी.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

सत्य –

मूळ व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे.

एनडीटीव्हीने 24 ऑगस्ट 2022 रोजी हाच व्हिडिओ शेअर केला होता. आशिया चषक स्पर्धेसाठी तो विमानतळावर आला होता.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, या ठिकाणी हार्दिक पंड्याचा विरोध करण्यासाठी कोणीही घोषणाबाजी केली नव्हती.

https://youtu.be/9VlWJ6ISAaE?si=VJAMFAmawhl5RkqE

मग या घोषणा केव्हाच्या आहेच ?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील रोहित शर्माच्या समर्थनात केलेल्या घोषणा चार वर्षांपूर्वीच्या आहेत.

https://www.youtube.com/shorts/eeLLwUCjgbo?feature=share

रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्यावर नाराज आहेत; परंतु त्याचा विरोध करण्यासाठी समर्थकांनी घोषणा दिल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले दोन्ही व्हिडिओ बनावट आणि जुने आहेत. चुकीच्या दाव्यासह जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रोहित शर्माच्या समर्थकांनी हार्दिक पांड्याच्या विरोधात घोषणा दिल्या का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered