अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रामाच्या मूर्तीचे डोळे हलताना आणि स्मितहास्य करताना दिसतात. दावा केला जात आहे की, अयोध्येतील रामाची मूर्ती भाविकांकडे पाहून जिवंतपणे हालचाल करते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून तयार करण्यात आला आहे. अयोध्यातील राम मंदिरातील मूर्ती डोळे किंवा चेहऱ्याची हालचाल करत नाही.

काय आहे दावा?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्ती अक्षरशः प्रसन्न होवून डोलू लागली. तसेच आपले 'रामलल्ला' दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडे पाहून स्मितहास्यही करत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘my heritage’ असे लिहिलेले आहे.

हा धागा पकडून सर्च केल्यावर कळाले की, माय हेरिटेज नामक वेबसाईटवर फोटो अपलोड केल्यावर त्या फोटोला हालचाल करतनाचा इफेक्ट देण्यात येतो.

डोळ्याची हालचाल किंवा मिचकावताना, डोक्याची हालचाल, चेहऱ्यावर हसण्याचा भाव इत्यादी गोष्टींमूळे फोटोमधील व्यक्ती किंवा मूर्ती सजीव हालचाल करतानाचा व्हिडिओमध्ये दिसतो.

ग्लोबल न्यूजच्या बातमीनुसार ‘माय हेरिटेज’ हे एक एआय तंत्र असून कोणत्याही फोटोला अॅनिमेट करु जीवंत असल्याचा भास निर्माण करू शकते. एखादी प्रिय व्यक्ती, पूर्वज किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या फोटोला या तंत्रा द्वारे सजीवा प्रमाणे हलचाल करताना व्हिडिओमध्ये दाखवले जाते.

https://youtu.be/tjBYSnoAWqg?si=KrcSP6cv5wsdr8AF

व्हायरल व्हिडिओ कसा तयार केला गेला ? 

फॅक्ट क्रेसेंडोने गाभाऱ्यातील राम मूर्तीचा फोटो माय हेरिटेज वेबसाईटवर अपलोड केल्यावर त्याने व्हायरल व्हिडिओ प्रमाणे ती क्लिप तयार केली.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, माय हेरिटेज वेबसाईटवर तयार केलेली क्लिप आणि व्हायरल व्हिडिओ एकच आहे.

मूळ पोस्ट – आर्काइव्ह

राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा

डीडी नॅशनलने अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते. यामध्ये कुठेही रामची मूर्ती डोळ्यांची हालचाल करत हसताना दिसत नाही.

https://youtu.be/O3cb4QQZi6Q?si=FlEpNGhbEpWdkm7l&t=2031

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळात अयोध्यमधील राम मंदिरातील भगवान रामची मूर्ती डोळ्यांची हालचाल करत हसत नाही. चुकीच्या दाव्यासह बनावट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अयोध्येतील राम मूर्ती हालचार व डोळ मिचकवतानाचा एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered